Skip to main content

धर्म

एका धर्मांतराची कथा

लेखक arunjoshi123 यांनी सोमवार, 14/10/2013 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न होऊन दोन दिवसही लोटले नव्हते तोवर बायको म्हणाली, "मुझे और एक शादी करनी है।" "English please, " मी म्हणालो. बायकोच्या बोलण्याचा न पटण्याजोगा अर्थ निघायला लागला कि मी तिला इंग्रजीत बोलायला सांगतो. मुद्दा असा होता कि दिल्लीतलं आमचं लग्न तिच्या घरच्यांना मान्य नव्हतं. म्हणजे नातं मान्य होतं, विधी मान्य नव्हते. तर अजून एकदा तिकडच्या पद्धतीने लग्न करावं लागणार होतं. आपल्याकडे आंतरजातीय विवाहाला विरोध करायला लोकांना फार मजा येते.

दुर्गे दुर्घट भारी... एक विचार.

लेखक प्यारे१ यांनी शुक्रवार, 11/10/2013 03:45 या दिवशी प्रकाशित केले.
गणेश विसर्जन झालं की पितृपक्ष येतो. तो संपला की लगेच प्रतिपदेला घटस्थापना होते नि आपण देवीची उपासना सुरु करतो. देवीच्या उपासनेची सुरुवात कधी झाली, का झाली, कशी झाली ह्याबाबत मला माहिती नाही. इतिहासकारांचा विषय आहे तो. असो. पुराणांमध्ये कुठंतरी सांगितल्याप्रमाणं महिषासुर नावाचा राक्षस प्रचंड मातला होता नि त्यानं सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली.

'लोकायत' विचारचर्चा

लेखक प्रास यांनी गुरुवार, 19/09/2013 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
माधव : असे आश्रय ज्ञानाचा। निःश्रेयसरूपी पुरूषार्थाचा । धनी माझ्या नमस्काराचा । शिव सृष्टीकर्ता।। १ पावले जे दर्शनसागरापार। करवली जनयोग्य ईप्सितार्थप्राप्ती अपार। असे सर्वज्ञ विष्णु गुरूवर । मम आश्रयदाता।। विचित्रपुष्पांसम शास्त्रांचा हा सर । गहन, दुस्तर तरी आनंद देई फार। अवलोकावा दूर ठेऊनि मत्सर । होई आल्हाददाता। पुरूष क्र. १ : नमस्कार माधवराव! माधव : नमस्कार बुवा! काय म्हणता? पुरूष क्र.

झगमगाटात हरवलेले . . . . .

लेखक तुमचा अभिषेक यांनी शनिवार, 07/09/2013 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षीच्या गणपती आधी लिहिलेला लेख.. इतरत्र प्रकाशित.. आजही लागू आहेच म्हणून इथेही टाकत आहे. ....................................................................................... परवा श्रावणातला शेवटचा सोमवार होता. बायकोने शिवमंदीरात जाण्याचा आणि मलाही नेण्याचा बेत माझ्याही नकळत दुपारीच बनवला. फोनवरच मला तसे कळवण्यात आले. त्याच दिवशी नेमके ऑफिसमध्ये काम जरा जादा असल्याने संध्याकाळी एक्स्ट्रा थांबावे लागणार होते.. त्यानंतर पुन्हा मंदीर.. वैताग नुसता डोक्याला.. पण नकार देण्याचा पर्यायच नव्हता..

कहे कबीरा (१)

लेखक शरद यांनी बुधवार, 04/09/2013 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
कहे कबीरा (१) संत कबीरावर तीन लेख लिहण्याचा विचार आहे. पहिल्या लेखात कबीराचे चरित्र, दुसर्‍यात त्याचे विचार व तिसर्‍यात काही भजने/दोहे यांचा परिचय पहिला भाग लिहणे फार सोपे आहे. अगदी सोपे. मी काहीही लिहले तरी बिघडत नाही कार॒ण आज आपल्याला कबीराबद्दल काहीही विश्वसनीय माहिती नाही !

कृष्णलीला..

लेखक किसन शिंदे यांनी गुरुवार, 29/08/2013 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे दोन-चार स्पीकर्स तर कुठे दहा फुटांच्या डॉल्बीच्या अजस्त्र भिंती.. कुठे पाच-दहा हजाराचं शुल्लक बक्षीस तर कुठे एक कोटीचं.. कुठे भगव्या टि-शर्टमधल्या कार्यकर्त्यांचा घोळका तर कुठे पांढर्‍या... कुठे गोविंदा रे गोपाळा तर कुठे मच गया शोर सारी नगरी रे.. कुठे चार-पाच थरांचा तर कुठे विश्वविक्रमाशी बरोबरी करणार्‍या नऊ-दहा थरांचा थरार.. कुठे हाता-पायावर निभावतं तर कुठे जिवाशी जातं.. कुठे मानाची तर कुठे जगातली सर्वात मोठी.. कुठे हिंदी तारे-तारका तर कुठे मराठी.. कुठे लावणीतलं या रावजी तर कुठे हिंदीतलं चिकनी चमेली.. उत्तराखंडमधली मोठ्ठी नैसर्गिक आपत्ती..पुरोगामी महाराष्ट्राला हादरवणारी दाभोळकर

विश्व स्वधर्मसूर्ये पाहो

लेखक नरेंद्र गोळे यांनी बुधवार, 21/08/2013 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
खूप खूप वर्षांपूर्वी मानवी जीवन हे पृथ्वीच्या सीमित भूभागावरच स्थिरावलेले होते. उपजीविकेच्या शोधात मानवाने मग नवनव्या भूप्रदेशांचा शोध घेतला. कालांतराने सबंध पृथ्वीचा शोध लागला. आज पृथ्वीवरचे बहुतेक सर्व भूभाग, त्यांवरील चराचरांसह ज्ञात झालेले आहेत. ज्याकाळी मानवी जीवन हे पृथ्वीच्या सीमित भूभागावरच स्थिरावलेले होते, तेव्हा आपले पूर्वज उत्तरेला असलेल्या हिमालय पर्वतापासून तर दक्षिणेला असलेल्या हिंदी महासागरापर्यंतच पृथ्वीचा सर्व विस्तार असल्याचे मानत असत.

रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (चार)

लेखक संजय क्षीरसागर यांनी शनिवार, 10/08/2013 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
महाराज अधिक देखणे तरी निरंतर पाहणे योगिराज विनवणें मन आले ॐ मयी । (श्री ज्ञानेश्वर महाराज) फक्त समोर पाहण्यानं तुम्ही मनाच्या चकव्यातनं बाहेर पडू शकता! ____________________________________ ज्ञानेश्वर महाराजांच्या चित्तदशेशी एकात्मता साधून, अत्यंत शांतपणे; त्यांनी वर्णन केलेली ही काव्यात्मक प्रक्रिया समजावून घेऊ. मनाची तीन प्रमुख अंग आहेत : दृक, वाक आणि श्राव्य. या अभंगात महाराज दृक प्रक्रियेविषयी सांगतायत.

अमृत वाणी

लेखक राजा सोव्नी यांनी रविवार, 04/08/2013 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
संत राज प.पु अनंत स्वामी ,तासगावकर ,यांची अमृत वाणी शारीरिक मिलन क्षणिक सुख देते,मनोमिलन सदैव सुख देते. मन खंबीर असेल तर गंभीर रोग सुद्धा बरा होतो. देवास कधी मंदिराच्या गाभाऱ्यात शोधू नका ,तो मनाच्या गाभाऱ्यात सापडेल निसर्ग सर्वात मोठा गुरु आहे ,निसर्गाशी जवळीक साधा मनावर ताबा ठेवण्यास शिका,कोणत्याही संकटास सामोरे जाता येईल . भगवी वस्त्र,. जटा ,भस्म लावून काही होत नाही,मनाची निर्मलता असावी लागते . प्रेमानीच प्रेम मिळते ,रुपया पैशांनी नाही मना पासून जोडलेली नाती कायम असतात,रुपया,पैशांची नाती टिकत नाहीत .