Skip to main content

धर्म

सोमप्रदोष

लेखक धोंडोपंत यांनी मंगळवार, 18/09/2007 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, या महिन्यातील दोन्ही प्रदोष हे सोमप्रदोष आहेत. शिवभक्तांसाठी या दिवसाचे महत्व फार असल्याने मुद्दाम येथे देत आहोत. भाद्रपद शुक्ल पक्ष प्रदोष - दिनांक २४ सप्टेंबर २००७ , सूर्यास्त १८.४७ , सूर्योदय २५ सप्टेंबर -०६.२९ भाद्रपद कृष्ण पक्ष प्रदोष - दिनांक ८ ऑक्टोबर २००७, सूर्यास्त १८.२१, सूर्योदय ९ ऑक्टोबर - ०६.३२ मुंबईचे सूर्योदय सूर्यास्त दिले आहेत. त्यानुसार निषिथकाल काढून घ्यावा. आपला, (शैव) धोंडोपंत { धोंडोपंत कुणाशीही कोणत्याही विषयावर वाद घालत नाहीत. त्याचप्रमाणे ज्योतिष विषय वगळता कोणत्याही विषयावर भाष्य करीत नाहीत.

गणपती बाप्पा मोरया!

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 15/09/2007 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
गणपती बाप्पा! १४ विद्या, ६४ कलांचा अभिषिक्त राजा! सर्वांना गणेशोत्स्वच्या अनेकोत्तम शुभेच्छा! हा आम्हा गरीब, कोकणातून पोटापाण्याकरता मुंबईला आलेल्या चाकरमानी मुंबईकरांचा "लालबागचा राजा!" मुंबईकरांचं आराध्य दैवत! लालबागच्या राजाचा विजय असो.. आपला, (लालबागच्या राजाचा भक्त!) तात्या.