मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धर्म

वारी !!!

किल्लेदार ·
में महीना पूर्ण भरात आहे. तळपत्या सूर्याखाली सगळंकाही भाजून निघतंय. हिमालयाच्या अगदी कुशीतलं उखीमठसुद्धा उन्हाच्या तडाख्यातून सुटलेलं नाही. चराचरांचा विधाता, देवांचा देव महादेवही कदाचित एवढ्या काहीलीनं त्रस्त झालांय. त्यामुळं दरवर्षीप्रमाणं भोलेनाथ आपल्या “समर हॉलिडे होमकडे” निघायची तयारी करू लागतात. भल्या पहाटे सगळं उरकून, वारी उखीमठातल्या ओंकारेश्वरामधनं मध्यमहेश्वर मंदिराकडे निघते. सगळ्यात पुढे मुख्य पुजारी घोड्यावर स्वार होऊन आणि त्यापाठोपाठ “डोलीचे” भोई भोलेनाथांना खांद्यावर घेऊन घाटातून झपझप चालू लागतात.

तत्वज्ञान अनुत्तर भिषक्को भगवान बुद्ध आणि अन्य प्रज्ञावंत (ऐसी अक्षरे -२५)

Bhakti ·
अतत्वज्ञान अनुत्तर भिषक्को भगवान बुद्ध आणि अन्य प्रज्ञावंत हे संशोधक डॉ .बी. आर जोशी अगदीच छोटेखानी पुस्तक वाचले. भारतीय तत्त्वज्ञान परंपरांपैकी एकाही तत्त्व‌ज्ञानाचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी जन्म पुरेसा नाही, हे पुन्हा पटले.

धामणस्करांची 'वोक' कविता

माहितगार ·
काही मराठी संत कवींनी शृंगार आणि अहंकारपती रचनांचा उपयोग आधी शृंगारीक रंजनाच्या जाळ्यात ओढून षडरीपूंच्या धोक्यांपासून श्रोत्यांना सावध करण्यासाठी केलेला आहे. परवा मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट वाक्ये धाग्यावरील विवीध मिपाकरांचे प्रतिसाद वाचत वाचत अस्मादीकांची गाडी मारवाजींच्या प्रतिसादांपर्यंत पोहोचली. त्यांच्या सुरवातीच्या प्रतिसादांवरून आठवले ते 'जनतेच्या' महाविद्यालयातील पदव्यूत्तर वाणीज्यचे 'बिझनेस कम्युनीकेशन' विषयाचे रिटायरमेंटला आलेले एक प्राध्यापक. वर्गात मुख्यत्वे मुलींची बहुसंख्या होती.

शिवरायांचे औरंगजेबास पत्र (काल्पनीक)

OBAMA80 ·
हे पत्र पूर्णपणे काल्पनीक असून त्यात कोणालाही दुखविण्याचा, धार्मिक तेढ वाढविण्याचा अथवा कोणावरही टीका करण्याचा उद्देश नाही याची सूज्ञ वाचकांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती. ******************************* हे आलमगीर, बऱ्याच वर्षानंतर तुम्हांला पत्र लिहीण्याचा योग आला. तुम्ही हिंदूवर लावलेल्या जिझीया करासंदर्भातील तुम्हांला लिहीलेल्या पत्रानंतर बहुतेक आत्ताच योग आला. आता हे पत्र २१ शतकात लिहीत आहे तेव्हा या पत्राची भाषा देखील मराठी आहे. तुमच्या आयुष्याची शेवटची कित्येक वर्षे तुम्ही महाराष्ट्रात घालविल्यामुळे कदाचित तुम्हांला ही भाषा अवगत झाली असेल अशी अपेक्षा करतो.

व्हॉट इज अ ट्रु इंटेलिजन्स ?

प्रसाद गोडबोले ·
हां तर प्रश्न अतिषय सरळ, साधा आणि सोपा आहे - व्हॉट इज अ ट्रु इंटेलिजन्स ? एक खरी बुध्दी म्हणजे काय ? (भाषांतर हा एक नाजुक प्रकार आहे . कारण वेगवेगळ्या भाषांमध्ये असलेल्या शब्द आणि अर्थ ह्यांचे मॅपिंग हे १:१ असेलच असे काही नाही. अर्थात कोणत्याही एका भाषेतील शब्द अन्य कोणत्याही भाषेत अनुवादित करता येतीलच असे नाही. अर्थात इंटेलिजन्सला बुध्दी असे अनुवादित करणे हे तितकेसे योग्य नाही. पण तुर्तास ते असो.) आता आपण आपल्या आजुबाजुला आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा उदय उत्कर्ष पहात आहोत. चॅट जी.पी.टी.

व्याकरण , बुध्दी , चैतन्य ||ॐ||

प्रसाद गोडबोले ·
सिध्दांत : व्याकरण हा बुध्दीच्या असण्याचा पुरावा आहे, आणि बुध्दी हा चैतन्य असण्याचा पुरावा आहे. उप सिध्दांत १ - व्याकरण हा बुध्दीच्या असण्याचा पुरावा आहे, उप सिध्दांत २ - बुध्दी हा चैतन्य असण्याचा पुरावा आहे. उप सिध्दांत १ - व्याकरण हा बुध्दीच्या असण्याचा पुरावा आहे, व्याकरण नाही रे , भाषा , भाषा हा बुध्दीच्या असण्याचा पुरावा आहे. हां इट्स इंटरेस्टिंग , Language is a structured system of communication that consists of grammar and vocabulary. अर्थात भाषा हा अक्षरे , शब्द , वाक्ये, एकुणच शब्द सञ्चय आणि त्याला अर्थ जोडणारे व्याकरणाचे नियम ह्यांचा समुच्चय आहे . आणि ह्यातही शब्द सञ्चय म्हणजे क

पुणे जिल्ह्यातील प्राचीन मंदिरे

vcdatrange ·
१. बाणेश्वर गुहा मंदिर बाणेर गाव, बाणेर हिंदू लोककथेनुसार, ही गुहा पांडवांसाठी लपण्याची जागा होती. काही इतिहासकारांच्या मते हे मंदिर ८ व्या शतकात राष्ट्रकुटांच्या काळात बांधले गेले होते. हे गुहा मंदिर पुण्यातील सर्वोत्तम प्राचीन मंदिरांपैकी एक आहे जे भगवान शिव यांना समर्पित आहे. https://maps.app.goo.gl/B7J4R9P3pxg1mNyk9 २. पाताळेश्वर गुहा मंदिर या मंदिराची खासियत म्हणजे ते पूर्णपणे बेसाल्ट खडकापासून कोरलेले आहे. ८ व्या शतकात बांधलेले, या मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग आहे. मंदिराची वास्तुकला, वर्तुळाकार मंडप आणि भव्य खांबांसह, देशाच्या सुरुवातीच्या दगडी कोरीव परंपरेची झलक दाखवते.

साधो यह तन ठाठ तँबूरे का - कबीर

प्रसाद गोडबोले ·
साधो यह तन ठाठ तँबूरे का काल एका सांस्कृतिक कार्यक्रमाला जाण्याचा योग आला. तिथे कबीरांची एक अप्रतिम रचना सादर केली गेली - "साधो यह तन ठाठ तँबूरे का" . ऐकता क्षणी मनाला भावली ही रचना !

श्री अमृतानुभव अध्याय सातवा - अज्ञान खंडन

प्रसाद गोडबोले ·
१. अमृतानुभव - अध्याय पहिला - शिवशक्तीसमावेशनमन - https://www.misalpav.com/node/44374 २. श्री अमृतानुभव अध्याय दुसरा - श्रीगुरुस्तवन - https://www.misalpav.com/node/44416 ३. श्री अमृतानुभव अध्याय तिसरा - वाचाऋणपरिहार - https://www.misalpav.com/node/46057 ४. श्री अमृतानुभव अध्याय चौथा- ज्ञानाज्ञानभेदकथन - https://www.misalpav.com/node/48807 ५.श्री अमृतानुभव अध्याय पाचवां - सच्चिदानंदपदत्रयविवरण - https://www.misalpav.com/node/48797 _________________________________________
श्री अमृतानुभव अध्याय सातवा - अज्ञान खंडन
अज्ञानखंडन - अमृतानुभवातील सर्वात प्रदीर्घ अध्याय !

चार आर्यसत्ये - एक चिंतन

प्रसाद गोडबोले ·
प्रस्तावना : १. हा लेख नेहमीप्रमाणेच स्वान्तःसुखाय आहे. इथे कोणाला काहीही पटवुन द्यायचे धोरण नाही कि कोणाचे काहीही मत खंडन करावयाचा विचार नाही. त्यामुळे तुम्हाला लेख पटला काय की न पटला काय मला काहीही फरक पडत नाही. २. हा लेख लिहिताना जमेल तितकी तथ्ये आणि संदर्भ वापरण्याचा प्रयत्न केला आहे तथापि काही तथ्येच चुकीच्या शब्दात उधृत केलेली असतील तर आपण जरुर माझ्या निदर्शनास आणुन द्यावीत ही नम्र विनंती ! ३. हा लेख बहुतांशपणे माझ्या वैयक्तिक जीवनातील अनुभवातुन आलेल्या चिंतनांवर आधारीत आहे. तुम्हाला आलेले अनुभव , तुमचे चिंतन , तुमचा अभ्यास , तुमचे आकलन भिन्न असु शकते !