सर्व राजकिय आजोबांना जाहीर पत्र
लेखनप्रकार
आदरणीय राजकीय आजोबा,
स.न.वि. वि.
मला ठाउक आहे की, देशाला बलाढ्य बनविण्यासाठी तुम्ही ' अथक परिश्रम ' ( ? ) घेतले आहेत. मला याचीही कल्पना आहे की
'खुर्ची' साठी तुम्हाला घामाचा एक एक थेंब गाळावा लागतो. मला याचीही कल्पना आहे की, टीकांचे सुरुंग झेलताना, तुमच्या शरिराच्या चिंधड्या चिंधड्या होतात, तरीही काहीच झाले नाही असे भाव तुमच्या चेहेर्या वरच्या स्मित हास्याने तुम्ही दर्शवता.
निवडणुकीच्या वेळी तुम्हाला घसा फुटेस्तोवर लोकांना अश्वासने द्यावी लागतात, तेव्हा कुठे तुम्ही निवडुन येता.किती त्रास होत असेल नाही?....
तुमचे हायकमांड, भारतिय लोकमनाच्या संवेदने पेक्षा स्वतःला शहाणे समजतात्. त्यांचे आदेश प्रामाणिकपणे पाळण्यासाठी तुमचा एवढा वेळ जातो कि मोठ्या शहरातील छोट्या छोट्या घटनांकडे बघायला तुम्हाला वेळ कसा मिळेल ?.... मग देश खड्ड्यात का जाइना ? नाहीतर अतिरेक्यांच्या घश्यात का जाइना..? तुमचा नाइलाज होतो!
भारताला शक्तीशाली बनविण्याची, लोकांसाठी काम करण्याची तुमच्या मनातली प्रबळ इच्छा मला दिसत्येय .. पण कस आहे ना..
तुमच शरीर आता तुम्हाला साथ देत नाहीये.. तुम्ही व्रुद्ध झाला आहात ... थकला आहात.. निष्कामी आणि निष्क्रिय झाला आहात..
तुम्हाला सुचत नहीये नेमक काय करायच ते! पण आजोबा, आहो ! भारत अजुन तरुण आहे हे तुम्ही ध्यानी ठेवल पाहिजे... म्हणुन मी सर्व राजकीय आजोबांना कळकळीची विनंती करतो की आपण आता आपापल्या खुर्चीतुन निव्रुत्त व्हावे आणि अनुभवी म्हणुन आमच्या पाठीशी उभे रहावे व भारताचे नेत्रुत्व युवकांकडे सोपवावे..!
सर्व भारतियांच्या सक्षीने आम्ही 'युवक ' अशी शपथ घेतो की, " भारत बलाढ्य , महाशक्तीशाली झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि यापुढे एकाही भारतियाच्या केसालादेखिल धक्का लागु देणार नाही , जर तसा कुणी प्रयत्न केल्यास याद राखा..! ! !
जय हिंद..!!!!!!!!!!!
आपला युवा नातु
वाचने
2007
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
या वरुन
मस्त
हा प्रश्न
राजकीय आजोबा