अवलिया
लेखनप्रकार
मास्तर मिपावर सदस्यांचा संताप पहात होते. सर्व प्रकारचा आक्रोश, वेदना, जळजळ बाहेर पडत होती. भगिनी समाज सुद्धा मागे नव्हता. काही चांगल्या सुचना पण पुढे येत होत्या. त्यावर साधक बाधक चर्चा होत होती. मास्तरना एक जाणवले की ह्या सर्व कोलाहलात त्यांचा मित्र अवलिया अभावानेच दिसत होता. गोंधळले मास्तर. त्यांनी अवलियाशी संपर्क केला. अवलियाने सर्व शांतपणे सर्व आरोप सहन केले. नंतर आपले म्हणणे पुढे मांडले. तो म्हणाला,
मास्तर , गांधीजींचे काय चुकले वा काय बरोबर ह्यावर आता मी काय करु शकतो का?
नाही.
५० कोटी दिले ह्यावर मी काय करु शकतो का- नाही
कुठली तरी मस्जिद पडली त्यामुळे दहशतवाद फोफाळला किंवा नाही- त्याचे मी काय करु शकतो- काही नाही.
मुख्यमंत्री वा गृहमंत्री ह्यानी आपली जबाबदारी पार पाडली नाही- ह्यावर मी काही करु शकतो- नाही
टाटाना अशा हल्ल्याची पुर्वसुचना दिली गेली होती त्यावर त्यांनी काहीही केले नाही-मी काय करु शकतो- काही नाही.
ह्या घटनेला बघुन काहीजण बंदूक उचलायची भाषा करु लागले आहेत. कीती खरे किती खोटे - माहीत नाही.
चिदंबरम आल्यानंतर ह्या परिस्थीतीत एकदम फरक पडेल अशा आशेवर बरेच जण आहेत्-त्याला मी काय करु शकतो.-काही नाही
मला एवढेच समजते की जे माझे रक्षण करायला धावले त्यांच्याकडे स्वःतचे रक्षण करण्याकरिता पुरेसी सामग्री नव्हती. सर्व समाजाला ग्रासलेल्या भ्रष्टाचाराचा हा आणखी एक पुरावा. त्याला मी काय करु शकतो? काही नाही.
ह्या सर्व काही नाही ला माझ्याकडे एक उत्तर आहे. आम्ही एक विचाराची मंडळी एकत्र येउन पोलिस महानिरिक्षकांना १०० बुलेट्प्रूफ जाकिटांची भेट देणार आहोत. १२ मॅग्नम गोळ्याना प्रतिकार करणारी. हा नविन पायंडा पाडताना समाजाने घेतलेला पुढाकार ह्या शिवाय कुठल्याही व्यक्तीला प्रसिद्धी मिळणार नाही हे बघितले जाईल. किंवा अशा कृतीने सर्व सिस्टीम बदलणार असा भोळा भाबडा समज पण नाही. पण ही बदलाची सुरुवात नक्की असेल.
मास्तर निरुत्तर झाले.
५ मिनिटे झाल्यावर त्यांनी "मला पण ह्या योजनेत धरा "असा निरोप पाठ्वला.
वाचकांनी वरील प्रकटन कथा म्हणुन वाचावी. कथानायकाचे मिपा सदस्याच्या आय डी शी साम्य ह्यावर आपापले तर्क लढवावेत. सर्व एक कविकल्पना आहे असे गृहित धरायला मास्तरांची हरकत नाही.
जाता जाता: एक गारुडी होता. त्याने आपली टोपली रस्त्यावर ठेवली. लगेच बघे जमा झाले. टोपली चे झाकण काढताच नागोबा बाहेर आले. लूंगी घातलेल्या गारुडयाने नागासमोर बसकण मारली. गारुड्याने आपल्या पूंगीवर "मेरे देश की धरती" चे गाणे वाजवायला सुरु केले. नाग डोलायला लागला. फुस्कारायला लागला. गारुडी खूश. बघ्याना सांगु लागला, "बघा कसा डोलतोय माझ्या तालावर". पण खरी परिस्थीती अशी होती तो नाग फुस्कारत नव्हता तर सुस्कारे सोडत होता. खेदाने मान हलवत होता.गारूड्याच्या महारोग्याच्या झडणार्-या बोटाप्रमाणे आकूंचित होणार्-या पौरुषाकडे बघुन. मनात म्हणत होता " आता मी तर म्हातारा झालो, माझ्याकडे विष सुद्धा नाही. पण माझ्या नविन दमाच्या पिढीच्या महाभयानक विषासमोर हा कसा टिकणार.
वाचन
4048
प्रतिक्रिया
0