मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माहिती हवी आहे.( दिल्लीतील हॉटेल बद्दल)

अमोल केळकर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नमस्कार, मला आपणाकडून एक मदत पाहिजे आहे. माझे आई-बाबा ( वय सत्तरीच्या पुढे) नोव्हेंबर मधे दिल्ली, जालंदर ,चंदिगड, अमृतसरला जाणार आहेत. आईला जालंदरला तिच्या लेखनाबद्दल पुरस्कार मिळाला आहे. तिकडची रहाण्याची सोय आयोजकांनी केली आहे . मात्र दिल्ली, चंदिगड त्याढिकाणी रहाण्याची सोय असलेली चांगली हॉटेल्स ( महाराष्ट्र मंडळ वगैरे ) माहित नाहीत . ज्यांना काही यासंबंधी माहित असेल तर कृपया माहिती द्यावी . धन्यवाद अमोल केळकर

वाचने 3390 वाचनखूण प्रतिक्रिया 17

अविनाशकुलकर्णी 29/09/2010 - 13:01
Maharashtra Mandal Dehli Local Market Place,Services,Shopping in ... - Maharashtra Mandal Dehli Find information about famous / popular Local ... Pahar Ganj. Delhi. 23583683, 65356943 ... No.10, Vijay Mandal En, DDA Market ... www.buzzintown.com/.../local--Maharashtra%2BMandal%2BDehli.html - Cached इथे बघा

In reply to by पाषाणभेद

परिकथेतील राजकुमार 29/09/2010 - 13:07
आईचे अभिनंदन. अन पुरस्कार कसला मिळाला, कोठे जायचे आहे पुरस्कारासाठी ते सांग की चोरा.
+१ हेच बोल्तो ! केळकर भारी लबाड आहात हो तुम्ही ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

अमोल केळकर 29/09/2010 - 14:16
' पंजाब साहित्य अकादमीचा ' पुरस्कार - साहित्य सेवे बद्दल मिळाला आहे. १३ - १४ नोव्हेंबर ला जालंदरला देण्यात येणार आहे. http://www.ujjwalakelkar.blogspot.com धन्यवाद :) अमोल

In reply to by अमोल केळकर

शुचि 29/09/2010 - 19:21
नक्की पहाते अनुदिनी. मी चाळली. आपल्या मातोश्री कर्तुत्ववान साहित्यिक दिसतात. त्यांची अनुदिनी वाचायला आवडेल. त्यांचे अभिनंदन.

गणेशा 29/09/2010 - 17:25
आपल्या आई चे हार्दिक अभिनंदन. - दिल्ली मध्ये काही दिवस कंपणी तर्फे होतो मी २००८ मध्ये. जुन्या कंपणीतील मित्र तेथेच असेन दिल्लीला .. फोन नं देतो घेवुन . काही हेल्प लागली आनखिन ही तर करेन तो हेल्प.

रेवती 29/09/2010 - 18:54
Address: International Youth Hostel, 5-Nyaya Marg, Chanakyapuri, New Delhi - 110021 Telephone:91-11-26116285, 91-11-24101246