Skip to main content

छायाचित्रण

तु आणि मी (मिसळपाव स्टाईल!)

लेखक इंटरनेटस्नेही यांनी शुक्रवार, 24/09/2010 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिसळपावच्या इतिहासात प्रथमच खफ वरील साहित्य इथे प्रकाशित करतो आहे. आपण धाग्याचा खफ अनेकदा झालेला पाहिला असेल पण ही अशी ही पहिलीच वेळ असावी की आम्ही खफचाच धागा करुन एक प्रकारे बॅकवर्ड इंटीग्रेशन केले आहे. तरी कोणत्याही पुर्वग्रहदुषित नजरेने आमच्या सदर धाग्याचा आस्वाद घ्यावा आणि प्रतिक्रियांचा पाऊस त्यावर पाडावा ही न्रम विनंती. हे साहित्य आमचे एकट्याचे नसुन आमच्या ह्या योजनेत अभावितपणे सहभागी झालेल्या श्री नावातकायआहे, श्री भेन्डिबाजार, श्री कुक, श्री स्वानंद व सौ.

माझ्या बागेतील फुले

लेखक जागु यांनी बुधवार, 08/09/2010 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
हा आहे सोनटक्का. ह्याचे मुळ आल्यासारखे असते. एक रोपटे किंवा मुळ लावले तरी ह्याच्या बाजुला त्याची पिल्ले भराभर तयार होतात. मोहक सुगंधाने सोनटक्का स्वतःकडे आकर्षीत करुन घेतो. बाजारात पानात बाधुंन ह्याची फुले विकायला येतात पण बरेचदा ही अर्धवट उमललेलीच दिसतात. सोनटक्क्यामधे पिवळा रंगही असतो. पिवळ्या रंगाचे फुल आकाराने थोडे छोटे असते. हा आहे डेलीया माझ्या बागेतील नविनच पाहूणा. आमच्या जवळच्याच नर्सरीतुन घेतला. ह्यामध्ये मला पिवळा किरमिजी रंगही दिसला.

भर पावसात खंडाळ्याच्या घाटात...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 06/09/2010 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
काल रात्रीपासुन पावसाने धुमाकुळ घातलेला. खरेतर कालच म्हणजे शनीवारीच कुठेतरी छान कोकणसाईडला बाईक काढायची आणि मनसोक्त भटकायचे असा आमचा बेत होता. पण अस्मादिक नुकतेच मलेरियाच्या भेटीला जावुन आल्याने सौभाग्यवती भर पावसात बाहेर पडायला तयार नव्हत्या. शनिवारची संध्याकाळ त्या वादावादीतच गेली आणि रवीवारी सकाळी ... "ठिक आहे, चल जावूया कुठेतरी! पण पावसात फार भिजायचे नाही, रेनकोट घालूनच निघायचे!" अशा सशर्त सहमतीनंतर रवीवारी दुपारी ११.३० च्या दरम्यान आम्ही घर सोडले. पाऊस जवळ जवळ नव्हताच, त्यामुळे रेनकोट (विंडशिटर) बॅगेतच होते. बाईक काढली आणि पनवेलच्या मार्गाला लागलो.

ठोसेघर धबधबा

लेखक उपेन्द्र यांनी रविवार, 05/09/2010 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
आज संध्याकाळीच सातार्‍याजवळच्या ठोसेघर धबधब्याला भेट देऊन आलो. पूर्वी एकदा गेलो होतो तेव्हा रस्ता खूप खराब होता. पण आता चांगला आहे.