Skip to main content

छायाचित्रण

सफर कलाडगड, कुंजरगड, भैरवगड आणि पाबरगडाची

लेखक बज्जु यांनी मंगळवार, 19/10/2010 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण आणि भाद्रपदातील पुजांच्या धावपळीमुळे ऒगस्ट आणि सप्टेंबरमध्ये म्हणजे जवळ्जवळ दोन-अडीच महिने ट्रेक झाला न्हवता. पित्रुपक्षात पंधरा दिवस आराम असल्याने आणि गिरीषला २ ऒक्टोबरला गांधीजयंतीची सुट्टी रविवारला जोडुन आल्याने लगेच कलाड्गड, कुंजरगड, भैरवगड, पाबरगड असा ट्रेक ठरवुन टाकला. ट्रेकला मेंबर दोनच मी आणि गिरीष साठे. दोघेच जण असल्याने अर्थातच बाईकने जायचे ठरले. २ तारखेला पहाटे लवकर निघायचे असल्याने १ ऒक्टोबरला संध्याकाळीच गाडीत पेट्रोल भरुन ठेवले आणि थोडेसे ड्रायफ़ुड घेऊन ठेवले होते. सॆका रात्रीच भरल्या.

दुचाकीवर चारपायी

लेखक सुत्रधार यांनी मंगळवार, 19/10/2010 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
दसर्‍याला दुचाकीवरुन जरा बाहेर पडलो आणि एक अविस्मरणिय द्रुष्य पहिल. 2V4

फिलाडेल्फीया

लेखक प्रभो यांनी शुक्रवार, 15/10/2010 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
दोन तीन विकांतापुर्वी फिलाडेल्फीया ला गेलो होतो...

दुर्गदुर्गेश्वर रायगड

लेखक योगेश२४ यांनी शुक्रवार, 15/10/2010 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
=========================================================== =========================================================== || रायगडावर खडे पसरले, शिवरायांच्या पायी हिरे माणके, ती आम्हाला, दुसरी दौलत नाही || =========================================================== ===========================================================

रांगोळी

लेखक मृत्युन्जय यांनी गुरुवार, 14/10/2010 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
शेणाने सारवलेले आंगण मागे पडुन त्याची जागा जशी विटा सिमेंटने घडलेल्या फरश्यांनी घेतली आणि ऐसपैस घराची जागा फ्लॅटने घेतली तसतशी रांगोळी हळुहळु लुप्त होत चालली आहे. तरी अजुनही काही गृहिणी (आणि काही बाप्येसुद्धा) ही कला टिकवुन आहेत. कामचलाउ का होइना रांगोळी प्रत्येक घरात कोणा ना कोणाल येत असतेच. अगदीच काही नाही तर छाप वापरुन वेळप्रसंगी वेळ निभावुन नेली जाते. रांगोळीचे प्रकारही तसे अनेक ठिपक्यांची रांगोळी, फुलांची रांगोळी, नक्षी, अक्षरभारती, फ्रीहँड, प्रसारभारती. आता तर पाण्यात रांगोळी काढण्याचे तंत्र आणि कलादेखील विकसित झाली आहे. सर्वांनाच सर्व प्रकारची रांगोळी काढता येइलच असे नाही.

हेमंत

लेखक मराठे यांनी बुधवार, 13/10/2010 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
सप्टेंबर जाउन ऑक्टोबर येतो न येतो तोच थंडी जाणवायला लागली आहे. थोड्याच दिवसांत घराबाहेर फिरायला जाणं मुश्किल होइल. पण काल आमचे ग्रह एकंदरीत बरे असावेत. काल बर्‍याच दिवसानी थोडा निवांत वेळ मिळाला होता, आणि मुख्य म्हणजे थंडी बेताची होती. ऑफिसमधून घरी येतानाच ठरवलं की आजचा दिवस फुकट घालवायचा नाही . घरी आल्या आल्या मुलाला व हीला घेउन बाहेर पडलो. (ऑफिसमधुन येउन चहा पिउन, खाउन मग जाउया म्हटलं की निघे-निघेपर्यंत काळोख पडतो हा मागच्या वेळेचा अनुभव होता.) "हेरिटेज पार्कमधे जाउया" छोट्याची फर्माईश आली. आणि पडत्या फळाची आज्ञा मानून गाडी त्यादिशेला वळवली.

पट्टा उर्फ विश्रामगडावर.....

लेखक प्रचेतस यांनी रविवार, 10/10/2010 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
नाशिकला एका खाजगी समारंभाचे बोलावणे आले व माझ्या डोक्यात बरेच दिवस मनात असलेला एक किल्ला करण्याचा प्लॅन भिरभिरू लागला. नाशिकला अर्थातच पुणे-मनमाड व्हाया नासिक रेल्वेनेच गेलो कारण २ घाटांतून दिसणारे सह्यपर्वताचे विलक्षण सौंदर्य. शनिवारी नाशिकला पोहोचलो. रविवारचा संध्याकाळचा समारोह आटोपला. तेव्हाच मामेभावाबरोबर सोमवार सकाळचा सिन्नर - घोटी दरम्यान असलेला पट्टा किल्ला पाहायाचा बेत आखून ठेवला. अर्थात इतरही गप्पागोष्टींबरोबर झालेल्या जागरणामुळे एकवेळ ट्रेक करणे रद्द करावे की काय असे वाटून गेले. पण किल्ला पाहायच्या ओढीमुळे आळसावर मात केली.

***जगदंबा ***

लेखक मदनबाण यांनी शनिवार, 09/10/2010 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
आज ठाण्याच्या टेंभी नाक्याला असणार्‍या देवीच्या दर्शनाला जाउन आलो, आणि देवीची प्रसन्न आणि मोहक मुद्रा टिपुन आलो... :) विशेष :--- हा धागा गणपा शेठला समर्पित केला आहे, कारण मी त्याला सांगितले होते की जेव्हा केव्हा मला शक्य होईल तेव्हा मी या देवीचे फोटो जरुर काढीन...आज तो योग आला.