Skip to main content

छायाचित्रण

वरंधा घाट

लेखक येडाखुळा यांनी गुरुवार, 12/08/2010 00:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, वरंधा घाट माझा अतिशय आवडता...मागच्या वर्षी पावसाळ्यात शिवथर घळीत समर्थांच्या दर्शनाला गेलो होतो. भोर सोडल्यानंतर जो काही पाऊस सुरू झाला तो पुण्यात घरी परत येईतो चालू होता. पावसाळ्यात वरंधा घाटाचे सौंदर्य काय सांगावं?

पन्हाळा-

लेखक चिंतामणी यांनी सोमवार, 09/08/2010 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
कुठल्या वेळेस जाण्यास पन्हाळा हे छान ठिक़ाण आहे. उन्हाळ्यात जा, पावसाळ्यात जा किंवा थंडीत.

आशी कशी येळी वो माये.

लेखक बाबुराव यांनी शनिवार, 07/08/2010 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
ABCD0002 बहिणाबाय म्हणते- आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी. '' नीज न ये तर गीत म्हणावे अथवा झोके देत बसावे कोण करी हे जीवेभावे ती माझी आई ! " माय म्हणली की इथुन तिथून एकच नै का ? फोटू आवडला का ?

गोकाकचा धबधबा

लेखक चालु माणुस यांनी शुक्रवार, 06/08/2010 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
गोकाकच्या धबधब्याचे काही फोटो आहेत..... गोकाक हे गाव बेळगाव (कर्नाटक) पासुन ६० कि. मी. वर आहे..... येथील कापड गीरणी प्रसिध्द आहे.... पहिला फोटो.......धबधबा कोसळण्यापुर्वी.... दुसरा फोटो........धबधब्यावरील झुलता पुल........ तीसरा फोटो.......कोसळणारा धबधबा.....

मिपाकरांनो, आपली मदत हवी आहे

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 06/08/2010 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांनो, आपली मदत हवी आहे. एका व्यावसायिक संस्थेने कॉक्स अ‍ॅण्ड किंग्ज च्या प्रायोजनाने मुंबईत नोकरी करणार्‍या व व्यवसायाने वा नोकरीत प्रकाशचित्रण क्षेत्रात नसलेल्या हौशी प्रकाशचित्रकारांसाठी एक स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत अर्थातच गुणवत्तेवर आधारित अशा मान्यवर परिक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या चित्रांना परितोषिक दिले जाईल व एक पारितोषिक सर्वाधिक मते मिळविणार्‍या चित्रास दिले जाईल. काल मतदान सुरू झाले. एकुण मतदान पाहता असे लक्षात आले की केवळ नित्याच्या संपर्कातील परिचितांकडुन शे-पन्नास मते सहज मिळतील मात्र भरघोस मते हवी असतील तर हातपाय हलवावे लागतील.

प्लस व्हॅलीमधे... धो-धो पावसात...

लेखक विमुक्त यांनी सोमवार, 02/08/2010 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
प्लस व्हॅलीमधे उन्हाळ्यात गेलो होतो तेव्हाच ठरवलं होतं की आता पावसात इथे यायचं... एखादं चित्र काढताना चित्रकार आधी आराखडा तयार करतो आणि मग त्यात रंग भरतो... उन्हाळ्यातल्या प्लस व्हॅलीमधे आज एका महान कलाकाराने खूप सुंदर रंग भरले होते... धो-धो पाऊस होता... कड्यावरुन धबधबे सोडले होते... जागोजागी पाण्याचे ओढे खळाळत होते... दरीमधे धुकं अडकलं होतं... धरणीतून गवताचे कोवळे कोंब उगवले होते... जंगलातून सुभग पक्षी सुरात गात होते... सगळ्या सृष्टीत चैतन्य जाणवत होतं... तेरड्याच्या एखाद्याच फुलाला हे सगळं बघण्याची घाई झाली होती... कोवळ्या गवतातून मान वर करुन ते एकटचं हे सगळं अनुभवत होतं...

नळदुर्ग (उस्मानाबाद)

लेखक किश्या यांनी सोमवार, 02/08/2010 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
मि ह्या प्रचि खुप दिवसांनपुर्वी काठलेल्या आहेत, पण मला मा.बो. वर फोटो अपलोड करता येत नव्हते. पण आता काहि अडचन नाहि. मी एकदा कंपनीच्या कामासाठी नळदुर्ग ला गेलो होतो. त्या वेळेस वेळ होता म्हनुन हा किल्ला पाहन्यात आला. त्या वेळेस मला पोलिसांनी फार परेशान केल होत. (मी एकटाच होतो, म्हणुन त्यांना अस वाटलं कि मि कील्ला पाडतो कि कायं?