Skip to main content

छायाचित्रण

भटकंतीतली काही क्षणचित्रं

लेखक जिप्सी यांनी गुरुवार, 26/08/2010 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
आरंभी वंदिन गडांचा राजा :- राजगड राजगड :संजीवनी माची राजगड :- धुक्यात हरवलेला बालेकिल्ला ५ पांडवांचा डोंगर

सफर - किल्ले तोरणा

लेखक येडाखुळा यांनी मंगळवार, 24/08/2010 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो, गेल्या शनिवारी मी किल्ले तोरणा येथे जाऊन आलो. एकदम मस्त ट्रेक झाला माझ्या जुन्या मित्राबरोबर.. तोरण्याची माहिती सर्वांना असेलच तरीही जुजबी ओळख करून देतो. शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी हा गड घेतला. कानद खोर्यातला हा सर्वात उंच किल्ला. ( आणि कदाचित पुणे जिल्ह्यातला सुद्धा..चू.भू.देणे घेणे ) पूर्वी हा किल्ला आदिलशाही अंमलाखाली होता आणि अगदीच दुर्लक्षित अवस्थेत होता. म्हणजे राजांच्या ताब्यात आल्यावरच याचं भाग्य उजळलं असं समजायला काही हरकत नाही. अतिशय उंच आणि बेलाग किल्ला आहे हा.

शिवनेरीवर....महाराजांच्या जन्मस्थळी

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 23/08/2010 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
माळशेज घाटात जाउन आलो. तिथून येतांना सीतेवाडी-गणेशखिंड मार्गे १९ किमी असलेल्या जुन्नरला आलो. गणेशखिंडीतूनच दिसणारा शिवनेरी आता त्याच्या कोरीव लेण्यांसह पूर्णपणे समोरच उभा ठाकला होता. शिवनेरी....एक बळकट, बुलंद, अभेद्य किल्ला....जवळजवळ २००० उन्हाळे, पावसाळे, हिवाळे पाहीलेला, सातवाहनांचे राजकुल अंगाखांद्यावर मिरवणारा. नंतर चालुक्य, राष्ट्र्कूट, यादव अश्या राजवटी पाहिलेला नंतर मात्र ३०० वर्षांच्या काळरात्रीत झाकोळून गेलेला. एका दिवशी हळूच भोसल्यांचे सुनेचे, जाधवरावांच्या लेकीचे पाउल गडावर पडले.

गोकाकचा धबधबा

लेखक चालु माणुस यांनी शनिवार, 21/08/2010 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
गोकाक एक निसर्ग रम्य ठीकाण........ मी काढलेले धबधब्याचे काही फोटो देत आहे. हा धबधबा मनाला फारच भुरळ पाड्णारा आहे. येथे july व august महीन्यात भेट द्यावी... धबधबा प्रेमीनी पाहिलाच पाहीजे असा हा गोकाकचा धबधबा..... धबधबा कोसळण्यापुर्वीचा खडकाळ भाग....... धबधब्यावरील झुलता पुल....

सोबत....

लेखक किल्लेदार यांनी गुरुवार, 19/08/2010 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
मला नेहमी वाटतं की मी घरात एकटा नाही. म्हणून काल रात्री फोटो काढून पाहिला................... Bhoot upload copy"