Skip to main content

छायाचित्रण

एम - २२

लेखक मस्तानी यांनी मंगळवार, 26/10/2010 02:06 या दिवशी प्रकाशित केले.
एम २२ हे एका रस्त्याचं नाव आहे. अमेरिकेच्या मिशिगन राज्यातला ११६ मैलांचा एक रस्ता. या हेमंत ऋतूमध्ये ज्याचा भाव भलताच वधारतो असा हा एक रस्ता. ऐकून होतो काल-परवा पर्यंत पण आता मात्र प्रत्यक्ष अनुभव घेवून आलोय की या एका रस्त्याबद्दल इतकं का बोललं जात. आठवड्याभराची काम संपवून शुक्रवारी रात्री मुलाच्या स्काउट पथकाबरोबर आयोजित कार्यक्रमाला गेलो होतो. नेमकी कोजागिरीची रात्र त्यामुळे चंद्र असा काही दिसत होता की वाह !

युपीतल्या ह्या पदार्थाचे नाव काय?

लेखक शानबा५१२ यांनी रविवार, 24/10/2010 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महीन्यात युपीला गेलो होतो,गंगाकीनारी गाईडच्या आग्रहास्त्व एक मिठा पान व हा पदार्थ खाल्ला.पान खालल्याचा पश्चाताप झाला पण हा पदार्थ अप्रतिम होता. ह्यात बटाट्याची भाजी कचोरीसारख्या आकाराच्या गोळ्यात भरलेली होती,थोडे मसाल्याचे पाणी व त्यात शिजवलेले चणे होते.ह्या सर्वांवर थोडीशी लालसर पावडरसारखी चटणी.हे सर्व वेगवेगळ्या भांड्यात असत व देताना मिक्स केल जात. मी ताबा ठेउन तीन रुपयाची एकच थाळी(?) खाल्ली पण आता ह्याचे नाव माहीती करायचे आहे. माहीतीगारांनी कृपया मदत करावी.

साद सागराची

लेखक योगेश२४ यांनी शुक्रवार, 22/10/2010 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाचा वाढता तडाखा, लोकलचा नको नकोसा वाटणारा प्रवास, उन्हामुळे अंगाची होणारी काहिली!!! काय करावे????? चला तर आज तुम्हाला पुण्या-मुंबईपासुन जवळच असलेल्या समुद्रकिनार्‍याची भटकंती करून आणतो. :) कसला विचार करताय???? चला सुरुवात मुंबईपासुन करूया आणि थेट सिंधुदुर्गापर्यंत जाऊन येऊया.

I bet तुम्ही कधी हे पाहीले नसेल - भाग ५

लेखक शानबा५१२ यांनी गुरुवार, 21/10/2010 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
कालचा तो फोटो कदाचित आपण पाहीला असावा,'धुर' असेल अस वाटत खरं,पण नाही तो धुर नव्हता.उत्तर मजेशीर आहे,उत्कंठा व ज्ञान वाढवणारे,पण जाउ दे तुम्हाला नाही ऐकायच तर आम्ही का बोटांना त्रास द्यावा? असो,तर आज हे गणपती बघा,साध्या पीओपीने बनवले आहेत्,मग एवढे चमकतायत का?? (obviously फ्लॅश कींवा लाईट मारली नव्हती,नाही तर त्यात खास काय राहील? पण तुम्हाला जे खरे वाटेल ते मत बनवुन घ्या)