आज संध्याकाळीच सातार्याजवळच्या ठोसेघर धबधब्याला भेट देऊन आलो. पूर्वी एकदा गेलो होतो तेव्हा रस्ता खूप खराब होता. पण आता चांगला आहे. हा रस्ता सज्जनगडाजवळून हिरव्यागार डोंगरा मधुन जातो.
जाताना सज्जनगड तसेच उरमोडी धरणाचंही दर्शन होतं.
रस्त्यापासून धबधबा थोडा आत आहे.पण तिथपर्यंत जाण्यासठी आता चांगल्या पायर्या बांधल्या आहेत. सतत पाऊस पडत असल्याने आम्हाला जरा जपूनच जावं लागलं. मुख्य धबधब्याच्या वरच्या बाजूला एक लहान धबधबा आहे. त्याचे हे फोटो..
मुख्य धबधब्याच्या ४ धारा आहेत. त्यांचं मनोहारी दर्शन घेताना आणि पडणार्या पाण्याचा नाद ऐकताना आपल्याला तिथून हलावसं वाटत नाही. पावसापासून कॅमेरा जपावा लागत असल्याने फार फोटो काढता आले नाहीत. पण जे पाहिलं ते असं..
लेखनविषय:
मिसळपाव
मस्त
मस्त
सुंदर.... छान..... हिरवळ....
खरच गालिचे
In reply to खरच गालिचे by रेवती
धन्यवाद
वाह!
जबरदस्त!!
सुंदर फोटो अमोल