लेखकमृत्युन्जययांनी सोमवार, 26/07/2010 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी उटीला जाण्याचा योग आला. तिथे गेल्यावर प्रमुख आकर्षणात बोटॅनिकल गार्डन आणि रोझ गार्डन अश्या २ बागा बघायला सांगण्यात आले. होटेल पासुन बोटॅनिकल गार्डन जवळ असल्यामुळे प्रथम तिथे मोर्चा वळवला आणि वातावरण असे काही सुरेख होते आणि हिरवळ (म्हणजे गवत फक्त) एव्हढी काही अप्रतिम होती कि २-३ तास तिथेच लोळुन काढले. त्यानंतर मित्रांना रोझ गार्ड्न मध्ये जाण्यात फारसा उत्साह नव्हता. पण तिथे गेल्यानंतर रोझ गार्डन चुकवले असते तर केव्हढ्या मोठ्या आनंदाला मुकलो असतो ते कळाले.
लेखकअस्मीयांनी शुक्रवार, 23/07/2010 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
हरिहरेश्वर....कोकणातील निसर्गरम्य तीर्थस्थान
एका बाजूला हिरव्यागार वनश्रीने नटलेला डोंगर तर दुसर्या बाजूला स्वच्छ व निळा समुद्र तसेच नारळी पोफळीच्या बागा..
लेखकमराठमोळायांनी सोमवार, 19/07/2010 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी.
मागच्या वर्षी जानेवारीमधे दिवे आगर ला जाण्याचा अचानक बेत ठरला आणी आम्ही तीन मित्र निघालो. "अरे अचानक कुठे जाताय? रहायला जागा मिळणार नाही, सगळीकडे बुकींग फुल असतं" असं म्हणुन २-३ जणांनी टांग दिली तरी आम्ही तीन जण निघालोच.
लेखकयेडाखुळायांनी बुधवार, 14/07/2010 01:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी,
थोडा का होइना, पाऊस झाल्यामुळे आम्ही कोरीगड किंवा कोराईगड येथे नुकतेच जाऊन आलो.
तिथली काही छायाचित्रे येथे डकवत आहे.
लोणावळ्याच्या पुढे अॅंबी व्हॅलीला जो रस्ता जातो त्या रस्त्याने जात राहिले की पेठ शहापूर हे गाव लागते. तेच पायथ्याचे गाव आहे.गड चढायला अगदीच किरकोळ आहे.
लेखकबज्जुयांनी शुक्रवार, 02/07/2010 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
पदरगड उर्फ़ कलावंतीणीचा महाल
आतापर्यंत भिमाशंकरला १५-१६ वेळा गेलो असेन. एका वर्षीतर एकाच महिन्यात सलग ३ शनिवार-रविवार भिमाशंकरला गेलो होतो घरच्यांना शंका पण यायला लागली हा भिमाशंकरी मुलगी आणतो की काय घरात? असो. पण भिमाशंकरला चिकटुनच असलेल्या पदरगडावर जायचा योग काही आजवर आला नव्ह्ता. गेल्या रविवारीच मी आणि गिरीश साठे कुठे जायच कुठे जायचं असा विचार करत होतो आणि दोघेही एकदम बोललो पदरगड. ठरल तर मग पदरगड फ़ायनल, कोणीही नाही आलं तरी आपण दोघच जाऊ पण तेवढ्यात तात्या आणि पराग भावे सुध्दा येतो बोलले. शनिवारी संध्याकाळीच खाण्याचं सामान घेतलं. रविवारी पहाटे ५.०० ला मारुती ऒम्नीने निघालो.