बालपणी तुम्हीही धावला असाल ह्यांच्या पाठी. त्यांच सौंदर्य न्याहाळायला कधी गंमत म्हणून कधी हातात धरलेही असाल.
चतुर पकडायचा त्याला दोरा लावुन ठेवायचा किंवा त्याचे पंख धरुन त्याच्या पायाने त्याला एखादा छोटा खडा उचलायला लावायचा. तो लगेच उचलायचा. टाचणीलाही दोरा लावायचा मग ती मंद गतीने उडताना पहायचे. चतुर मला तेंव्हा हेलिकॅप्टर सारखाच वाटायचा. त्याच ते डोक हेलमेट घातल्या सारख वाटायच. फुलपाखराला पकडले की त्याचा रंग बोटांना लागायचा. बर्याच वेळा पिवळ्या पंखावर ऑरेंज ठिपके असलेले फुलपाखरू सापडायचे. परवा दिसला होता पण फोटो काढायला थांबला नाही तो. अजुन एक दिसला होता.