निसर्गाच्या कुंचल्यातून...

लेखनविषय:
लेखनप्रकार
की वेस्ट, फ्लोरीडा ... अमेरिकेमधील दक्षिण टोकावरील एक प्रसिद्ध किनारा पर्यटन स्थळ. थोडेफार आपल्या गोव्यासारखे छोटेखानी... सागरी क्रिडा प्रकार, पब्स, महागडी रीसॉर्ट्स, किनार्‍यावरील सुर्यस्नान, दिवसभर गळ टाकून मासेमारी असे अगदी अमेरिकन माणसाच्या सुट्टी उपभोगाची सगळी परीमाणे जिथे जुळतात असे टूमदार गाव... गेल्या डिसेम्बर मधे इकडे ३ दिवसांसाठी गेलो होतो. जाण्याअगोदर सवयीनुसार गूगल आणि बीन्गच्या 'भिंगातून ' प्रेक्षणीय स्थळांची यादी तयार केली..

पुन्हा एकदा सरसगड, ता. सुधागड (पाली), जि. रायगड

लेखनप्रकार
पुन्हा एकदा सरसगड, ता. सुधागड (पाली), जि. रायगड मागे एकदा पाली -रायगड येथील सरसगडावर गेलो होतो. यावेळी मुलगा अनंत व भाचा शुभम आणि भाची आर्या यांनी सरसगडावर येण्याचा फारच आग्रह केला. मागील पावसाळा संपल्यानंतर सरसगडावर त्यांना घेवून जाणे झाले. त्याची काही छायाचित्रे.

प्राणी, पक्षी आणि निसर्ग..

लेखनप्रकार
राम-राम मंडळी.. म्हटलं मिपावर जरा मी काढलेले काही फोटो डकवावेत. ही छायाचित्रे वेगवेगळ्या ठीकाणी काढलेली आहेत. तसेच पिकासामध्ये एडीट करुन छायाचित्रांमध्ये थोडी छाया (शॅडो) टाकलेली आहे.. (हॅ हॅ, उगाच आपला पाचकळ इनोद..) सुरुवात करतो काझिरंगातील गेंड्यांपासुन.. थोड्या रोमँटीक मुडमध्ये होते हे सकाळी सकाळी. रात का नशा असेल.. त्यांच्या जवळच्या पाण्याकडे बरोबर पाहीलतं, तर तुम्हाला पुरुष-प्राण्यांचा रोमान्सबद्दलचा अ‍ॅटीट्युड कळून येईल..

कॅमेरा vs कॅमेरामन

फोटोग्राफी हा माझ्या अगदी जिव्हाळ्याचा विषय, स्वतःला जरी तांत्रिक ज्ञान आणि त्यातली कला अवगत नसली तरी चांगल्-वाईट कळण्या इतपत फोटोग्राफी कळते (असा माझा अंदाज). National Geography, Discovery अशा संस्थाळांवर नियमित फोटो पाहणे, तसेच आंतरजालावर विविध निष्णात फोटोग्राफर्स चे काम पहाणे याचा तर व्यासंगच जडलाय. मिपावर देखील बरीच गुणी फोटोग्राफर मंडळी आहेतच, त्यांच्या "कलादालन" या विभागात मी नित्यनियमाणे भेट देत असतो.

शिशिराची चाहूल

लेखनविषय:
लेखनप्रकार
पाने गळू लागली आणि झाडांवर पक्षी दिसू लागले. म्हणजे पाने कमी झाल्यामुळे ते झाडावर येत आहेत असे मला म्हणायचे नाही तर पाने कमी झाल्यामुळे ते दिसू लागले. फुले गळाल्यामुळे फुलातले किडे खाणारे छोटे पक्षी गायब झाले आणि त्याची जागा घेतली झाडांच्या टणक शेंगा खाणार्‍या पक्षांनी. मैनांनी, आणि पोपटांनी. अर्थात एकदा त्यात एक हळद्याही घुसला होता. त्याचा सुंदर पिवळा रंग बघताना भान हरपते. त्याचाही फोटो टाकला आहे. पोपटांना चेहरा असतो आणि त्यावर भाव उमटतात हे आपल्याला हे फोटो बघितलेत तर उमगेल.
Subscribe to छायाचित्रण