Skip to main content

छायाचित्रण

पुन्हा एकदा गॅस बर्नर...

लेखक मदनबाण यांनी शुक्रवार, 25/05/2012 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली शहरात ग्राहक पेठ भरतात्,खरेदीच्या विविध वस्तु यात विक्रीस ठेवलेल्या असतात. अगदी लोणच्या पासुन ते आराम खुर्ची पर्यंतं बरेच काही पहावयास मिळते. अशाच एका बाजार पेठेत माझे तिर्थरुप गेले आणि एक वस्तु त्यांना तिथे दिसली व उपयोगी वाटुन ती त्यांनी खरेदी केली. ती वस्तु म्हणजे एक जाळी असुन ती गॅस बर्नरवर ठेवतात, त्यावर वांगे,पापड इं. भाजणे सोपे जाते आणि बर्नरही खराब होत नाही. हाच बर्नर जाळी ठेवल्यावर कसा दिसतो, ते तुम्हाला दाखवण्याचा हा एक प्रयत्न आहे.

आयुष रिसॉर्ट

लेखक जागु यांनी शुक्रवार, 18/05/2012 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल गुरुवारी कंटाळा आला म्हणून ऑफिसला दांडी मारली. मिस्टरांना वेळ होता तसेच मुलीला, भाचे कंपनीला सुट्टी पडलेली. मग दिवस सार्थकी लावू म्हणून कुठेतरी फिरायला जायचा बेत आखत होतो. बेत करता करताच १ वाजला. रोज रोज आसपासची स्विमिंग पुल आणि गार्डन पाहून मुले कंटाळली होती मग म्हटल चला आज पनवेलला जाऊया आयुष रिसॉर्टला. जेऊन निघता निघता ३ वाजले. गाडी घेतली आणि बच्चे कंपनी सकट आमची स्वारी आयुष रिसॉर्ट कडे वळली. गेट मधून आत गेलो. गुरुवार असल्याने गर्दी आजीबात नव्हती हे पाहून अजून समाधान झाल. मिस्टरांनी जाऊन आधी तिथले चार्जेस भरले. तस ते महागडच आहे.

अबोली

लेखक जागु यांनी मंगळवार, 15/05/2012 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
अबोलीच्या नावातच शांत गुण आहे त्याप्रमाणे अबोलीची फुले पाहूनच शांत, प्रसन्न वाटत.

बेस्ट फ्रॉम वेस्ट

लेखक jaypal यांनी बुधवार, 09/05/2012 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
एका टिकाउ बायकोचा टाकाउ परंतु टिकाउ परकर घ्यावा. हा असा parkar1 नाडीच्या बरोबर अपोझिट साईडच्या ओपनिंगला चांगल्या टेलर कडुन कचकचीत टिकाउ टिप मारुन घ्या. आता या पोतडी मधे अपापल्या आवडीचे किंवा नावडीचे (किंवा पुर्वी सारखे ;-)अडगळीचे)सामान सवडीने भरा. म्हणजेच त्या परकराला गत वैभव प्रप्त करुन द्या. मी सध्या गहु भरुन ठेवले आहेत. parkar2 हा माझा पहिलाच प्रयत्न आहे.चुकभुल माफी असावी. सदर प्रयत्न आवडल्यास अजुन काही सुचवीन म्हणतो

उत्कल दिवस २०१२

लेखक अन्या दातार यांनी रविवार, 29/04/2012 02:33 या दिवशी प्रकाशित केले.
आय आय टी खडगपूरमध्ये मला देशाच्या विविध भागातील लोकांचा सहवास मिळाला. त्यांच्या चालीरिती, सण वगैरे जवळून बघायला मिळाले. अर्थात अन्य प्रांतात स्थायिक झालेल्या कुणालाही मिळू शकते. गेल्या महिन्यात मला अजुन एक असाच कार्यक्रम बघायला मिळाला, तो म्हणजे उत्कल दिबस (हो, पूर्व भारतात (बंगाल, ओडिशा, बिहार इ.) व चा उच्चार ब/भ असाच केला जातो) एका रुढार्थाने मागास राज्याचा स्थापना दिवस म्हणजे नक्की असणार तरी काय? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे; पण या कार्यक्रमाचा आयोजक माझा मित्रच असल्याने थोडेफ़ारतरी भव्य-दिव्य असणार याची कल्पना आधीच मिळाली होती.