भोला चित्रपट...भोळा प्रेक्षक.....
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about भोला चित्रपट...भोळा प्रेक्षक.....
- 21 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
अविभाज्य अमेझोनचा (Amezon Prime) सन्माननीय सदस्य म्हणून कंपनीने सुचना पाठवली की भोला सिनेमा आपण चकटफू बघू शकता.
हल्ली ही कंपनी सुद्धा भारी लब्बाड झालीयं.सिनेमे भाड्या ने(मुळ शब्द भाडे याचे ब.व.,घराचे भाडे,बसचे भाडे सारखे) किंवा विकतही देतात. पहिल्यांदा असे काही नव्हते.अ.प्रा वर पुर्व प्रकाशित २१ सरफरोश मी फुकट पाहीला पण आता मात्र पैसे मोजावे लागतात.(बरे झाले मी लवकर पाहीला)
साX, विपणन तज्ञ (Marketing Expert) सुद्धा एक भारीच जमात आहे.आपला ढोल आणी ग्राहकाचा बॅण्ड कसा जोरात वाजवायचा यांना बरोबर समजते.
खुल्या चित्रपटगृहाची सवय, बंद चित्रपटगृहांत बसवत नाही.आता अंतरजालावर सोईस्कर वाटते.