Skip to main content

चित्रपट

आज, 24 मार्च 2022, आपल्या सर्वांना, "गाॅडफादर डे" च्या शुभेच्छा...

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 24/03/2022 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
50 वर्षांपुर्वी, आजच्याच दिवशी, द गाॅडफादर, हा अविस्मरणीय सिनेमा प्रदर्शित झाला ... काही काही चित्रपट, एखादी लाट तयार करतात. द गाॅडफादर, हा पण असाच. चित्रपट परिक्षण, हा माझा प्रांत नाही. कारण, चित्र, नाटक, सिनेमा, अभिजात संगीत हे व्यक्तीसापेक्ष असते. माफिया, हा शब्द माहिती पडला तो, ही कादंबरी वाचतांना आणि संघटित गुन्हेगारीचे, भारतातील स्वरूप देखील समजत गेले... बाबू रेशीम, मन्या सुर्वे, इत्यादी समकालीन गुन्हेगारांपेक्षा, दाऊद इब्राहीमच साम्राज्य का उभारू शकला? ह्याची थोडीफार कल्पना, ही कादंबरी वाचतांना येतेच येते.

झुंड

लेखक सोत्रि यांनी शनिवार, 05/03/2022 19:49 या दिवशी प्रकाशित केले.

झुंड सिनेमा नागराजने त्याच्याच कामाने उंचावलेल्या अपेक्षांची उंची गाठण्यात कमी पडतो. मी फारच अपेक्षा ठेवून गेलो होतो आणि त्यामुळे निराशा पदरी पडली असे खेदाने म्हणावे लागतंय. पण ह्याचा अर्थ सिनेमा फसलाय का? तर अजिबात नाही. जे काही 'स्टोरी टेलींग' नागराजला करायचे आहे ते काम नागराजने व्यवस्थित केले आहे. पण सिनेमा बघताना काहीतरी कमी पडतंय असं सतत वाटत राहतं.

दिल का रिश्ता

लेखक पाटिल यांनी सोमवार, 21/02/2022 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
दिल का रिश्ता. इसवी सन- २००३ जय मेहता- अर्जुन रामपाल टीया- ऐश्वर्या रॉय जयचा बाप- परेश रावळ अनिता- ईशा कोप्पीकर टीयाची आई- राखी सुरूवात. जय आफ्रिकेतून आंघोळ वगैरे करून घाईगडबडीत त्याच्या मुंबईतल्या घरी येण्यासाठी निघतोय. आणि त्याचवेळी रावळपापा लंडनहून घराकडे निघालेत. रावळपापा अत्यानंदाने घरात घुसून मीच आधी पोचलो अशी आरोळी ठोकतात. परंतु जय त्यांच्याआधीच पोचलेला असतो. दर वर्षी एका विशिष्ट दिवशी जयच बापाच्या आधी घरी पोचत असतो, हे आपल्याला त्यांच्या संवादातून कळते. दुर्दैवाने रावळपापांची फ्लाईट लंडनला दोन तास लेट झाल्यामुळे पापांचा चान्स याही वेळी हुकलाय..! पण काय हरकत नाय बरं का पापा..

२ प्रेमी प्रेमाचे..!

लेखक पाटिल यांनी रविवार, 06/02/2022 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
२ प्रेमी प्रेमाचे इसवी सन २०१५ यश = स्वप्नील जोशी प्रिया = गिरीजा ओक यशचा बाप =अरुण बक्षी पहिल्या सीनमध्ये प्रिया तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला जाते, तेव्हा तो दुसऱ्याच एका मुलीशी प्रेमालाप करत असतो. प्रिया हळवी आहे, मृदू आहे. हे दृश्य पाहून तिचा दिल दुखतो. ती तडकाफडकी बॅग भरून ते शहर सोडते आणि खुशी नावाच्या मैत्रीणीकडे रहायला जाते. कारण शेवटी असं आहे की तुम्ही तुमच्या इंपल्सेसवर जगता ना! तुमच्या मनात आलं की बॅगा भरता आणि शहरं सोडता..! जॉबचा किंवा पोटापाण्याचा वगैरे प्रश्नच कुठे उपस्थित होतो !

सध्या मी काय पाहतोय ? भाग ९

लेखक मदनबाण यांनी रविवार, 23/01/2022 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
पुष्पा द राइज पार्ट 1... युट्युबवर वेगवेगळी गाणी शोधताना / पाहताना अचानक या चित्रपटातील नुकतेच अपलोड झालेले स्वामी स्वामी हे तेलगु भाषेतील गाणे पाहण्यात आले होते. त्या नंतर या चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यात आला. अल्लू अर्जुन ची मुख्य भुमिका असलेला हा चित्रपट पाहण्या सारखाच असे तो ट्रेलर पाहुन वाटले.

*भारतीय चित्रपटात सर्वप्रथम*

लेखक srahul यांनी मंगळवार, 11/01/2022 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
*भारतीय चित्रपटात सर्वप्रथम* आता पर्यँत जी भारतीय चित्रपटाची वाटचाल झाली त्याला मुकपटा पासून धरलं तर १०० वर्षे पूर्ण होऊन गेली , बोलपटा पासून धरलं तर साधारण ७५ वर्षे पूर्ण होऊन गेली. या काळात प्रतिथयश लोकांनी या क्षेत्रात नवे नवे प्रयोग केले.या अस्थिर व्यवसायात रुळलेली वाट सोडून नवा रस्ता बनवणे हे जोखमीचे काम.पण तरी सुद्धा काही जिद्दी लोकांनी हे आव्हान स्वीकारलं आणि तो धोका पत्करला. काही यशस्वी झाले , काही अपयशी झाले.

धोखेबाज

लेखक srahul यांनी शनिवार, 08/01/2022 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
धोखेबाज राज कपूर च्या मनातील कलाकार सदा सर्वदा जागा असे , याची साक्ष देणारे बरेच किस्से आहेत , त्यातील आठवलेला आणि मी ऐकलेला किस्सा शेअर करतो . ख्वाजा अहमद अब्बास पटकथे वर आधारित सिनेमाच्या गडबडीत राज कपूर होता . कथेचा नायक परिस्थिती वश होऊन म्हणा किंवा आपल्या अडचणी मुळे हताश होऊन थोडी लांडी लबाडी करतो , आणि नंतर त्याची सद्सद्विवेक बुद्धी जागी होते आणि तो परत नेहमीच्या चांगल्या मार्गावर येतो. असं कथानक होतं. राज कपूर ने या सिनेमाचं नाव ठरवलं होतं , “ धोखेबाज “. पण का कुणास ठाऊक , त्याला स्वत: ला हे नाव खटकत होतं. नकारात्मक वाटत होतं .

तुम मेरे हो

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 29/12/2021 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात इच्छाधारी नाग हे एक स्वतंत्र प्रकरण आहे. जुन्या ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट नागिनपासून ते आजपर्यंत इच्छाधारी नाग - नागिणींवर अनेक सिनेमे आले. इच्छाधारी नाग - नागिण सिनेमातून टीव्हीच्या चॅनलवरही आले आणि चांगले चार-पाच सीझ्न होईपर्यंत चालले. इतकंच नाही तर अगदी एलओसी ओलांडून पाकिस्तानातही गेले आणि तिथल्या टीव्हीसिरीयलमध्येही हिट झाले. आपल्याकडे वैजयंतीमाला, रीना रॉय यांची इच्छाधारी नागिण हिट झाली खरी पण ती खर्‍या अर्थाने गाजवली ती श्रीदेवीने.

जंगल (२०१७)

लेखक चिमी यांनी सोमवार, 20/12/2021 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या बाबांना survival story based सिनेमे आणि डॉक्युमेंटरीजची भारी आवड. बाबांजवळ बसून The Edge, The Poseidon Adventure सारखे कित्येक सिनेमे मी रात्री जागू जागू पाहिलेले. पुढचे २-४ दिवस त्यातले अस्वल किंवा भेसूर चेहरे स्वप्नात येऊन दचकवून परत जागरण घडवायचे तो भाग वेगळा. कितीही घाबरीफाईड झालं, तरी परत पुढचा सिनेमा बघायला मी मोठ्या उत्साहाने तयार असायचे. कारण बाबांच्या मागे लपून बसून तर बघायचे असायचे. तेव्हा सर्वांत सेफ जागा म्हणजे बाबांच्या मागे. तिकडे टीव्हीवर एखाद्या अस्वलाने किंवा मगरीने कोणावर तरी हल्ला करण्यासाठी आ.. केला की दुसरा आआआं.. माझा असायचा.

कारखानिसांची वारी

लेखक देशपांडे विनायक यांनी गुरुवार, 16/12/2021 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
  मला हा सिनेमा आवडला याचे कारण या सिनेमात एक वाक्य आहे. हे वाक्य ऐकून ४८ वर्षापुर्वी मला मिळालेला सल्ला  आठवला. सल्ला न मागता मिळालेला नव्हता त्यामुळे न ऐकण्याचे कारण नव्हते. मी तो अमलात आणला आणि सुखी झालो.        त्या काळी कुटुंब नियोजनावर खूप चर्चा होत असे. फॅमिली प्लॅनींग बद्दल कुतूहल होते. कॉपर टी बद्दल ,मी कटिंग ला गेलेल्या सलून मधे चाललेली चर्चा ऐकणे अशक्य झाल्याने ती थांबवण्याची विनंती करावी लागली.