Skip to main content

चित्रपट

ओपनहायमर नोलन‌ कलाकृती

लेखक Bhakti यांनी सोमवार, 24/07/2023 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
D यापुढे ओपनहायमर -नोलन हे नाव पुरे आहे सिनेमांच्या पुस्तकात सुवर्ण अक्षरांनी कोरण्यासाठी. अमेरिकन प्रोमिथियस: द ट्रायम्फ अँड ट्रॅजेडी ऑफ जे. रॉबर्ट ओपेनहायमर हे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ जे.

सिनेमाच्या गोष्टी भाग ६

लेखक साहना यांनी शुक्रवार, 23/06/2023 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा चित्रपट एक भारतीय चित्रपट आहे आणि तो सुद्धा मिथुनदाचा. मिथुन म्हणजे गरिबांचा अमिताभ अशीच इमेज आहे. गुंडा, लोहा, आणखीन अनेक बी ग्रेड सिनेमांचा सम्राट मिथुन ह्याला मुख्य चित्रपट क्षेत्रांत सुद्धा चांगले यश लाभले. मिथुन मध्ये अभिनय क्षमता होती ह्यांत शंकाच नाही. गुरु मधील रामनाथ गोयंका ह्यांची भूमिका माझी विशेष प्रिय मिथुन भूमिका आहे. मिथुन ह्यांचा गुडिया हा चित्रपट जास्त लोकांनी पहिला असेल असे मला वाटत नाही. हा १००% आर्ट सिनेमा होता. ह्याचा प्रीमिअर सुद्धा १९९७ मध्ये टीव्ही वर झाला. तेंव्हा सहारा नावाचा चॅनल होता त्याच्यावर.

कथा सिनेमाच्या भाग ५

लेखक साहना यांनी मंगळवार, 20/06/2023 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या लेखमालेत एक विशेष चित्रपटाची कथा आम्ही पाहणार आहोत. भारतीय चित्रपटांत अनेक वेळा चित्रपटाची नावे हि जुन्या गाण्यावरून ठेवली जातात. उदाहरणार्थ "प्रेम रतन धन पायो", "एक में और एक तू", "मेरी प्यारी बिंदू" इत्यादी. हॉलिवूड मध्ये सुद्धा हि प्रथा पाहायला मिळते. कधी कधी चित्रपट जुन्या गाण्याला लोकप्रिय करतो तर कधी उलटपक्षी होते. आजचा चित्रपट अश्याच एका गीताच्या नावावरून आहे. "स्टॅन्ड बाय मी". (चित्रपट मुद्दामहून पाहण्यासारखा आहे) चित्रपटांच्या श्रेणी असंख्य आहेत. स्त्री प्रधान, पुरुष प्रधान इत्यादी आणि त्यांत सुद्धा लहान मुले असली तर "coming of age" हि एक वेगळीच श्रेणी आहे.

कथा सिनेमाच्या भाग ४

लेखक साहना यांनी सोमवार, 19/06/2023 02:27 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.youtube.com/watch?v=eChcpHv5_eU विशेष धन्यवाद.: विविध लोकांनी मला शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे असे सांगितले आहे. त्यांचे आभार. शुद्धलेखन किंबहुना त्याचा अभाव ही समस्या माझ्या लेखनात नेहमीपासूनच आहे आणि ती दूर करण्याचा खूप प्रयत्न मी करीन. माझी लेखन प्रतिभा दुर्दैवाने माझ्या इच्छाशक्तीची गुलाम नाही. हनुमानाच्या सुप्तशक्ती प्रमाणे त्याला ट्रिगर लागतो. हा ट्रिगर मिळाला कि अचानक झटका आल्याप्रमाणे डोक्यांत विचार येतात आणि मी लिहायला बसते.

सरगम - एक आठवण

लेखक अरिंजय यांनी शनिवार, 17/06/2023 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
"सरगम" अनेक दिवसांनंतर, जवळपास चार महिन्यांनंतर अप्पाच्या हॉटेल वर चहा प्यायला गेलो होतो. तिथे कायम हळू आवाजात गाणी चालू असतात‌. अप्पासोबत गप्पा मारत चहा पित असताना अचानक "सरगम" चित्रपटातलं "कोयल बोली ..." चालू झालं. सरगम - ८० च्या काळात अफ्फाट गाजलेला चित्रपट आणि अफाटच्या अफाट गाजलेली गाणी. अन् उगाचंच त्या काळात आम्ही बघितलेल्या सरगमची आठवण झाली. लातूरात सरगम लागला होता तो सिंध टॉकीज ला (शिंद टाकी - आता इतिहासजमा झाली). सिंध टॉकीज, त्या काळातल्या इतर चित्रपटगृहासारखीच साधी. तीन वर्ग असायचे - उंचावर बाल्कनी, खाली फर्स्ट क्लास आणि एकदम पडद्यासमोर सेकंड क्लास.

गोष्टी सिनेमाच्या - भाग ३

लेखक साहना यांनी शुक्रवार, 16/06/2023 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
डेव्हिड लिंच ह्या अवलिया अमेरिकन दिग्दर्शकाबद्दल मी कधी तरी विस्ताराने लिहीन. कारण हि व्यक्ती आहेच तशी प्रतिभाशाली. डेव्हिड लिंच ह्यांनी अमेरिकन टीव्ही वर ट्वीन पिक्स नावाची एक मालिका आणली. मैलाचा दगड वगैरे विशेषणे आम्ही काही महत्वाच्या घटनांना वापरतो. पण ट्वीन पिक्स हा टीव्ही कलाक्षेत्रांतील मैलाचा दगड नव्हता तर डेविड लिंच ह्यांनी थिल्लर डेली सोप चा डोंगर फोडून त्यावर कथानक, चरित्र निर्माण ह्यांचा डांबर टाकून जो जबरदस्त एक्सप्रेस वे बनवला तो थेट आम्हाला आजच्या नेटफ्लिक्स, प्राईम इत्यादींच्या दुनियेत घेऊन आला.

गोष्टी सिनेमाच्या - भाग २

लेखक साहना यांनी शुक्रवार, 16/06/2023 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्टी सिनेमाच्या - भाग २ नॉस्टॅल्जिया म्हणजे भूतकाळाच्या आठवणीत रमणे एक विशेष भावना आहे. सर्वच लोकांना ह्या भावनेचा अनुभव असला तरी काही लोकांना भूतकाळाविषयी विशेष आत्मीयता असते. आपले जुने प्रेम, घर ह्यांच्याबद्दल लोकांना आत्मीयता तर असतेच पण काही लोकांना अत्यंत साध्या साध्या गोष्टींची आठवण सुद्धा येऊन भावना आवरता येत नाहीत. एखाद्या अगरबत्तीचा सुगंध, फुलांचा वास, किंवा माजघरातील दिव्याच्या वातीची आठवण, एखादे पक्वान्न आणि अत्यंत सध्या सरळ गोष्टी ह्या भावना ट्रिगर करू शकतात. असो, ज्यांना अनुभव आहे त्यांना १००% ठाऊक आहे कि मला काय म्हणायचे आहे.

गोष्टी सिनेमाच्या - भाग १

लेखक साहना यांनी गुरुवार, 15/06/2023 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्टी सिनेमाच्या - भाग १ लहानपणी शांता शेळके ह्यांची चित्रपट विषयक काही पुस्तके मला कुणी वाचायला दिली होती. त्यांत माझ्या आठवणी प्रमाणे काही इंग्रजी चित्रपटांचा सारांश दिला होता. हे अनेक चित्रपट जुने होते आणि ग्रामीण भागांत (आणि शहरांत सुद्धा अनेक ठिकाणी) कुठे केबल आणि इंटरनेट नसल्याने त्या काळी मला बघता आले नाहीत. पण तरुणपणी ते सर्व चित्रपट मी आवर्जून पाहिले. शांता शेळके ह्यांनी मला इंग्रजी चित्रपट न पाहता सुद्धा चित्रपटांची आवड लावली असे म्हणू शकते. त्या काळी हॉलिवूड चित्रपटांची एक डिक्शनरी यायची त्यांत शेकडो चित्रपटांची माहिती येत असे, म्हणजे ३-४ वाक्यांत चित्रपटाची कथा आणि एक रेटिंग.

३००० वर्षांचा विरह

लेखक साहना यांनी मंगळवार, 13/06/2023 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
ऍमेझॉन वर हा चित्रपट आहे. जिन्न हा विषय आम्हाला बहुतेक करून अल्लाउद्दीन च्या दिव्यामुळे ठाऊक आहे पण जिन्न हि संकल्पना इस्लाम मधील खूप लोकप्रिय संकल्पना आहे. इस्लामच्या अनुसार जिन्न हे दुसर्या जगांतील जीव आहेत आणि मानवा प्रमाणेच ते सुद्धा अल्लाह चे अनुसरण करणारे किंवा काफिर असू शकतात. जिन्न मानवाला दिसत नाहीत पण मानवीय जीवनात कधी कधी त्यांचा हस्तक्षेप होऊ शकतो. इस्लाम मधील बहुतेक संकल्पना ह्या इस्लाम पूर्व गोष्टीचे rehashing आहेत त्याच प्रमाणे जिन्न सुद्धा इस्लाम पूर्व आहे पण इस्लाम जगभर पसरला म्हणून ती सुद्धा पसरली आणि इंग्रजीत त्याला लोक जिनी ह्या नावाने ओळखू लागले.