Skip to main content

चारोळ्या

चार चारोळ्या

लेखक स्वप्नयोगी यांनी शुक्रवार, 29/05/2009 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या आठवणींना कधीच माझ्या वेदनांची नसते गालावरच्या आसवांना मात्र तुझ्या आठवणींची सय असते. ****** तो ढग बघ कसा बरसण्यासाठी आतुरलाय तुझ्या चिंब गालावरुन ओघळला म्हणुन थेंबसुद्धा आनंदलाय ****** सुंदर गुलाबांना तुडवत माणसं नाकासमोर चालतात पण घरात शोभेसाठी तीच माणसं 'कॅक्टस' लावतात. ****** निळंशार आकाश चमचमत्या चांदण्या आकाशात चंद्रसुद्धा तुझ्यासाठी थांबलेला अवांतर:- ही चारोळी नाही आता चार दिवस सुट्टी घरी चाललोय!!!!!!!!!!!!!!

अर्थ

लेखक स्वप्नयोगी यांनी शुक्रवार, 22/05/2009 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या शब्दांना अजुन तरी काहीच अर्थ नाही. जोपर्यंत त्या गीताला तुझ्या ओठांचा स्पर्श नाही.

क्षितिज

लेखक स्वप्नयोगी यांनी गुरुवार, 21/05/2009 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यात अन् माझ्यात फक्त एका क्षितिजाचं अंतर आहे, 'जवळ असून दूर अन् दूर असूनही जवळ आहे.'

गजरा.....

लेखक उदय सप्रे यांनी गुरुवार, 21/05/2009 या दिवशी प्रकाशित केले.
गजरा..... लांब वेणी * उदास वाटते (* किंवा मोकळे केस उदास वाटतात) केसांत फुले माळ गं जरा ! चेहेर्‍यामागेही सौन्दर्य आहे डोकावून हळूच सांगेल गजरा !
Taxonomy upgrade extras

यातना

लेखक स्वप्नयोगी यांनी बुधवार, 20/05/2009 या दिवशी प्रकाशित केले.
ओठावर हळूच येणारे शब्द जेंव्हा माघारी वळतात खरं सांगतो तुला मी तेव्हा मनाला फार यातना होतात

कविता

लेखक स्वप्नयोगी यांनी मंगळवार, 19/05/2009 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी आठवण माझी कविता, नजरेसमोर तू शब्द गुंफताना.

कळ्या

लेखक स्वप्नयोगी यांनी सोमवार, 18/05/2009 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी आठवण कधी पाउल न वाजवता येते, कधी थैमान घालते तर कधी कळ्या फुलवते येथे.

श्रेय

लेखक स्वप्नयोगी यांनी रविवार, 17/05/2009 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या या कवितेचे सारे श्रेय तुझे कवितेचा आशय तू शब्द मात्र माझे

ओझं

लेखक स्वप्नयोगी यांनी शनिवार, 16/05/2009 या दिवशी प्रकाशित केले.
चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चालणं नसतं, उंच भरारी घेणार्‍याला आभाळाचं ओझं नसतं.

काव्य

लेखक स्वप्नयोगी यांनी शुक्रवार, 15/05/2009 या दिवशी प्रकाशित केले.
प्रीतीच्या ओसंडलेल्या पेल्यातुन थोडी प्रीत खाली सांडते मी तरी काय करु ? त्यालाच जग काव्य म्हणते.