Skip to main content

पाउस आला पाउस आला

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 25/07/2010 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
पाउस आला पाउस आला
घंटा वाजली सुटली शाळा पाउस आला पाउस आला || दप्तराचे मोठे ओझे झाले वह्या पुस्तके भिजून गेले खांद्यावरतून फेकून देवू भरभर सारे घरी पळा पाउस आला पाउस आला || पुर आलेल्या ओढी जावू पुलावरूनी पुर पाहू उगाच जावूनी काठावरती ओढ पाण्याची पाहू चला पाउस आला पाउस आला || छत्री बित्री नकाच घेवू चिंब भिजाया घरीच ठेवू चिखलाचे सारे पाणी खेळा पाउस आला पाउस आला || * मिपा वरील हे माझे २०० वे टंकन होते. म्हणजे २/३ लेख उडालेले आहेत. तरीही हा २०० वा लेख/कविता होती. आपण प्रेमाने लेख/कविता वाचल्यात. वेळात वेळ काढून प्रतिक्रिया दिल्यात. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. - पाषाणभेद (दगडफोड्या) २५/०७/२०१०
काव्यरस

वाचने 2323
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

व्वा छान ! आज खरोखरच पाउस सुरू आहे.