मदवल माया थोली ले..
काव्यरस
डिस्क्लेमर: ही कविता माझी नाही. कुणाची ते माहित नाही. कुणास माहित असल्यास सांगावे. तसेच काही शब्द चुकले असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कारण लहान असतांना केव्हातरी पाठ झालेली आहे. मला वाटतं याचे कमीत कमी एक आणखी कडवे आहे.. पण काही केल्या आठवत नाहीये.
***
संदर्भः ही कविता म्हणजे कृष्णाच्या एका गोकुळातल्या बोबड्या बोलणार्या मित्रानं मांडलेली भोळी पण प्रेमळ तक्रार आहे. त्यामुळे अगोदर बोबड्या बोलीतच लिहितो. खाली समजण्यासाठी साध्या भाषेत लिहिलेले आहेच! जमले तर माझ्या (भयानक) आवाजात इस्निप्स वर टाकून इथे लिंकेनच! ;)
***
दाय बा तित्ना, अता मी उत ना, थंदत तुजी नाही बली ले..
तिती तिती उपताल थांदू दोविंदा, मदवल माया थोली ले..
एतदा हली, दवल्याधली दहीदुध थाया देलो ले..
थालेत दोपाल पलून देले मला पतलून थेवलं ले..
थेवलं तं थेवलं.. बुदुबुदु माल्लं.. मद मी मुलुमुलु लल्ला ले..
तिती तिती उपताल थांदू दोविंदा, मदवल माया थोली ले..
एतदा हली, दमुनातिली पानी प्याया देलो ले..
थालेत दोपाल पलून देले मला धत्लुन देल्लं ले..
देल्लं तं देल्लं.. तोंदले फुतले.. ताते लुतले.. मद मी मुलुमुलु लल्ला ले..
तिती तिती उपताल थांदू दोविंदा, मदवल माया थोली ले..
================
जाय बा कृष्णा, आता मी उठं ना, संगत तुझी नाही बरी रे..
किती किती उपकार सांगू गोविंदा, मजवर माया थोडी रे!
एकदा हरी, गवळ्या घरी दही-दूध खाया गेलो रे..
सारेच गोपाळ पळून गेले मला पकडून ठेवलं रे..
ठेवलं तं ठेवलं.. बुदुबुदु मारलं.. मग मी मुळुमुळु रडलो रे..
किती किती उपकार सांगू गोविंदा, मजवर माया थोडी रे!
एकदा हरी, यमुनातीरी, पाणी प्याया गेलो रे..
सारेच गोपाळ पळून गेले मला ढकलून दिलं रे..
दिलं तं दिलं.. टोंगळे फुटले.. काटे रुतले.. मग मी मुळुमुळु रडलो रे..
किती किती उपकार सांगू गोविंदा, मजवर माया थोडी रे!
राघव
वाचने
3615
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
त्युत!
थान तविता! आवल्ली! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
अलेच्चा!!! बगायची ल्हायलीच होती... थान आहे.
बिपिन कार्यकर्ते
कसली गोड कविता आहे! :)
कविता गमतीशीर.
वरील काही प्रतिक्रियांमधे काही अन्-इंटेन्शनल कॉमेडीजसुद्धा आहेत :-)
बहुतेक हा काव्यप्रकार "नामदेवाचा बोबडा" ह्यातला आहे.कुत्ना थमाल रे थमाल अपुल्या गायी.अशी काहीशी सुरवात असलेला नामदेवांचा बोबडा आठवतो आहे.
हुश्श!!! खाली नीट बोलीतली कविता टाकलीय.. मला वाटले मोकलाया दाही दिशा पार्ट टू आली की काय??
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
In reply to हुश्श!!! by मस्त कलंदर
तुम्ही एका महान जालिय कवीचा अपमान करताय... मोकलाया ही फारच उच्च होती.
बिपिन कार्यकर्ते
सर्वांचे मनापासून आभार!
राघव
थविता एकद्म गोगोद आनि मत्थ आहे, आव्ल्ली
पुष्करिणी
छान रे राघवा..
तात्या.


अले वा... चान !!! :)
मदनबाण.....
"Life is like a coin. You can spend it any way you choose, but you can only spend it once."
Lillian Dickson
थो थ्वित!