नमस्कार दोस्त हो!
छोट्या भाचीशी खेळताना बालगीतांचा विचार डोक्यात घोळू लागला. आपल्या मराठीत बालगीतं, बडबडगीतं यांची बर्यापैकी रेलचेल आहे. तशीच ती इंग्लिश मध्येही आहे. सध्या तर या इंग्लिश नर्सरी र्हाईम्स जागोजागी ऐकायला मिळतात.... अर्थ कळो अथवा नाही..... काय आहे, मराठी शाळाच कमी होतायत ना.....
असो. पण आज मराठी-इंग्लिश वादाचा दिवस नाही आणि हा तसा या लेखाचा विषयही नाही.....
महाजालात शोधता शोधता १९४१ सालचं एक अप्रतिम रत्न गवसलं आणि तुमच्या बरोबर वाटून घेतल्याशिवाय राहिलं नाही.... काही सेकंदातच मी हे गाणं गुणगुणू लागलो....
'एला फिट्झराल्ड' रॉक्स......