मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अर्थकारण

शेयर मार्केट (बेसिक) भाग -३

दशानन ·
लेखनविषय:
पुढील भागात आपण ट्रेडिंगचे दोन प्रकार आहेत एक ऑफलाईन ट्रेडिंग व एक ऑनलाईन ट्रेडिंग ते समजावून घेऊ. मागील..

शेयर मार्केट (बेसिक) भाग -२

दशानन ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मागील भाग -१ ******** मागील भागात आपण शेयर्स म्हणजे काय हे पाहीले आता आपण ह्या भागात डिमेट अकाउंट कसे उघडावे व त्यासाठी काय काय करावे व काय पहावे ह्याची माहीती घेऊ. तुम्हाला जर शेयर विकत घेणे असेल अथवा आयपीओ मध्ये शेयर साठी निवेदन करणे असेल तर तुम्हाला एक डिमेट अकाउंटची गरज असते, ते तुम्ही कुठल्याही ब्रोकरकडे आपले ड्रेडिंग अकाउंट तथा डिमेट अकाउंट ओपन करु शकता.

शेयर मार्केट (बेसिक) भाग -१

दशानन ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रस्तावना : - मराठी भाषे मध्ये शेयर मार्केट विषयी जास्त माहीती उपलब्ध नाही आहे ती माहीती सरळ साध्या भाषेत देण्याचा प्रयत्न ह्या लेख मालिकेतून मी करणार आहे, ज्यांना जास्त माहीती आहे त्यांनी प्रतिसादामध्येच ती माहीती द्यावी जेणे करुन नवीन व्यक्तीला माहीतीचा उपयोग करुन घेता येईल. मी काही सर्व काही माहीती आहे व माझीच माहीती आहे ह्या आवेशामध्ये लिहीत नाही आहे जर कुठे चुकत असेल तर जाणकारांनी योग्य तो प्रकाश टाकावा ही विनंती. ह्या लेख माले साठी मी दैनिक भास्कर / टिव्ही -१८ व माझा काही वर्षाचा अनुभव ह्यांची मदत घेत आहे.

रोगप्रतिबंधाच्या धोरणातला प्राधान्यक्रम

धनंजय ·
लेखनप्रकार
स्वाईन फ्लूच्या संदर्भात जो धागा निघाला, त्याच्या प्रतिसादात हा उपविषय निघाला. त्याबद्दल हा वेगळा धागा काढत आहे. त्या धाग्यात श्री. नितिन थत्ते यांनी विचार केला की वेगवेगळ्या रोगांना पायबंद घालण्यासाठी काय प्राधान्यक्रम द्यावा? हा प्रश्न खरोखर गुंतागुंतीचा आहे, आणि भावनिकही आहे. प्राधान्यक्रमासाठी काही निकष पुढीलप्रमाणे १. मृत्युदर : ज्या प्रमाणात रोग घातक (मृत्यूचे कारण) असतात, त्या प्रमाणात प्राधान्यक्रम असावा, असा एक विचार कित्येकांना सुचतो.

म्युचल फंडा बाबत माहिती देणारे संकेतस्थळ

सदानंद ठाकूर ·
म्युचल फंडाचे प्रकार, म्युचल फंडात गुंतवणूक का करावी, योजना कशी निवडावी थोडक्यात म्युचल फंडाबाबत विस्तृत माहिती देण्यासाठी मी मराठी मध्ये एक नवीन व याप्रकारचे पहिलेच संकेतस्थळ बनविले असून या ठिकाणी आपण सभासदत्व घेऊन आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकता तसेच म्युचल फंड गुंतवणुकी संदर्भात प्रश्न विचारू शकता व चर्चेतही सहभागी होऊ शकता. येथे टिचकी मारून आपण संकेतस्थळावर जाऊ शकता. तुमचा सहभाग आम्हाला सुधारणा करण्यास मदतच करेल. सदानंद

पारध झालेला तो पारधी - २

श्रावण मोडक ·
सहजकाकांनी व्य. नि. मलाही केला होता. तो धागा खूप पुढं गेल्यानं हा नवा धागा काढतोय. मूळ धागा
---
सहजरावांचे म्हणणे - सक्तीने पुनर्वसन, दारुधंदे बंद करुन उपजीवीकेचे इतर प्रकल्प, लहान मुलांचे सक्तीचे शिक्षण, तरुणांचे संघटन, दीर्घकाल प्रबोधन, विविध योजना यांचा पाठपुरावा केल्याशिवाय त्यांचे गुन्हेगारी विश्व इतक्यात सुटेल असे वाटत नाही. पोलीस व पारधी समाजातील दोन्ही बाजुने पारध्यांना योग्य न्याय देण्याकरता जिल्हे/प्रांतवार संघटना करुन प्रयत्न.

पुस्तक परिचय (तेलाविषयक)

सुचेल तसं ·
लेखनप्रकार
नुकतीच जेष्ठ पत्रकार गिरीश कुबेर ह्यांची दोन पुस्तकं वाचली. दोन्ही पुस्तकं खूप आवडल्यामुळे त्यांचा अल्पसा परिचय देण्याचा प्रयत्न करत आहे. १. हा तेल नावाचा इतिहास आहे: काळं सोनं असं ज्याला संबोधलं जातं त्या तेलाचा मनोरंजक इतिहास ह्या पुस्तकात मांडला आहे. अमेरीकेत पहिली तेलविहीर खणल्यानंतर अल्पावधीतच तेलाची मागणी प्रचंड वाढली. अमेरीकेतील उद्योगपती जॉन डी. रॉकफेलर (थोरले) ह्यांनी सुरु केलेली स्टँडर्ड ऑईल कंपनी, तेलातून मिळालेल्या प्रचंड नफ्यामुळे बलाढय बनली आणि तिची मक्तेदारी निर्माण झाली.

शताब्दी - अर्थशास्त्राच्या प्रकाशनाची

विकास ·
लेखनप्रकार
(इमेल वरून एका आलेल्या आणि त्या इमेलच्या वेधक मथळ्यामुळे सुदैवाने वाचल्या गेलेल्या एका लेखाचे हे स्वैर आणि संक्षिप्त भाषांतर.) १८९१ साली म्हैसुरच्या महाराजाने राणि व्हिक्टोरीयाच्या सन्मानार्थ "व्हिक्टोरीया ज्युबिली इन्स्टीट्यूट" नामक एक वास्तू म्हैसुरमधे बनवली. विविध संस्कृतीतील वास्तुशास्त्रांचे मिश्रण केलेली ही इमारत वेगळ्याच घाटणीतील तयार केली गेली आहे. या वास्तू मधे अनेक भुर्जपत्रांवरील लेखन विविध ठिकाणाहून आणून साठवले गेले होते. त्या काळात त्याला ओरीएंटल रिसर्च लायब्ररी म्हणायचे आता तीला ओरीएंटल रिसर्च इन्स्टीट्यूट म्हणतात.

वाचलंच पाहिजे असं काही- अलिप्त द्रुष्टिकोनातून

नानबा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भारत हा शेतिप्रधान देश आहे. आपली अर्थव्यवस्था ७०% शेतिवरच अवलंबून आहे. पण एखाद्या अर्थ तज्ज्ञाच्या नजरेने पाहिले तर अर्थशास्त्राचे अजुनही बरेच पैलु असतात. अशाच काही पैलूंवर प्रकाश टाकणारं पुस्तक म्हणजे नामांकित अर्थ तज्ज्ञ, २००४ ते २००९ या काळात भारताचे अर्थ मन्त्री राहिलेले आणि सध्याच्या युपिए सरकारमध्ये ग्रुहमन्त्री असणार्‍या पी. चिदंबरम यांच "अलिप्त द्रुष्टिकोनातून" हे पुस्तक. पुस्तकाच्या मुखप्रुश्ठावर पी. चिदंबरम यांचं अतिशय प्रसन्न हसरं चित्र आहे. आणि "चांगले अर्थशास्त्र प्रत्येकासाटीच चांगली कामगिरी करणारे असते" ही टॅग लाईन आहे. चिदंबरम यांनी एन्.डी.ए.

आपण सारे कोट्याधीश!..... नाही होणार!

आनंद घारे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
१५०० अब्ज डॉलर!' या विषयावर कांही दिवसांपूर्वी मिपावर बराच काथ्या कुटला गेला होता. त्यात बहुतेक सदस्यांनी त्यांना वाटणारी मनस्वी चीड, सात्विक संताप, टोचणारी खंत, तसेच मत्सर, असूया वगैरे आपल्या मनातील भावनांना वाचा फोडली होती. मात्र कांही मोजके सकारात्मक प्रतिसादसुध्दा आले होते. त्यांतल्या दोन प्रातिनिधिक प्रतिसादांत असे लिहिले होते. "१. स्वीस बॆंकेतले पैसे काढून सर्व उधार्‍या (जागतिक बॆंकेच्या कर्जासहीत ) देऊन टाकू आणि शिल्लक पैशातून, सार्वजनिक सुविधा, बेकारी, इतर प्रश्नांची सोडवणूक करायची." "२.