लेखकआपला अभिजितयांनी रविवार, 07/12/2008 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
`वर्षा' बंगल्यावर मोठी लगबग सुरू होती. सगळ्या बंगल्याची रंगरंगोटी करण्यात आली होती. उत्साह ओसंडून वाहत होता. घरात चार वर्षांनी पाळणा हलला होता. बारशाचा कार्यक्रम अगदी झोकात, थाटामाटात होणार होता. सगळे नातेवाईक, पाव्हणेरावळे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले आप्तजन जमले होते. दिल्लीच्या विशेष पाहुण्यांना खास आमंत्रण होते. सगळे जण गटागटाने उभे होते. पहिला मान आपल्यालाच मिळावा, असा प्रत्येकाचा हट्ट होता.
बंगल्याचे सध्याचे मालक आले. आता ते घर सोडून जाणार होते. त्यामुळे पाळण्याला पहिला झोका देण्याचा मान त्यांचा होता. त्यांनी तो पार पाडला आणि ते बाजूला झाले.
लेखकचतुरंगयांनी शनिवार, 06/12/2008 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी सकाळी चमत्कारी ह्यांची 'भणंग २' ही गजल वाचून आमच्या मनात विचारांची गर्दी झाली आणि हे लगोलग हे विडंबन बाहेर पडले! ;)
उषःपान झाले सकाळी सकाळी
तुला 'छान' झाले सकाळी सकाळी
चवीला बिडी मस्त ओठात घेता
'धुरापान' झाले सकाळी सकाळी
'तिथे' पोचता पाहिले एकमेका
कसे ध्यान झाले सकाळी सकाळी
जरा 'वेग' आल्यावरी लोक सारे
गतीमान झाले सकाळी सकाळी
इसबगोल सर्वास उ:शाप झाला
बक:ध्यान झाले सकाळी सकाळी
म्हणालाच 'रंगा', तरी शेवटाला
समाधान झाले सकाळी सकाळी
चतुरंग
लेखकपाषाणभेदयांनी शनिवार, 06/12/2008 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
शेकडो वर्षांपूर्वी जो माणूस आपला संसार, आपलं वैयक्तिक आयुष्य, सुखसोयी-चैनी, अन्न, हास्य अशा सर्व भौतिक आणि ऐहिक गोष्टींचा त्याग करणा-या माणसाला 'संत' असं संबोधलं जायचं...
...
आता तसाच त्याग करणा-या माणसाला, 'आयटी प्रोफेशनल' म्हटलं जातं!
(वरील विनोद मी म.टा. वर वाचला व मि. पा. वर अनेक सद्द्स्य संगणक अभियंते असल्यामूळे येथे चिकटवण्याचा मोह आवरला नाही. संपादक महोदय योग्य तो न्याय करतीलच. )
लेखककपिल काळेयांनी शुक्रवार, 05/12/2008 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
चाल : चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटावर
मोत्याचा घास तुला भरविते
सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर
मुख्यमंत्री आता मी निवडिते. धॄ.
पदावर मुख्य नव्हता
पोलिसांना मंत्री नव्हता
मनी त्याचा सल नव्हता
पित्त्या बसवायचा होता
गुरहाळ चर्चेचे किती घालते ...... १
सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर
मुख्यमंत्री आता मी निवडिते. धॄ.
जन्तेला फाट्या मारिले
नवे नायक नाही दिले
पायांना कितीक खेचले
पछाड धोबी टाकले
डाव कुटील किती मी खेळते........२
सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर
मुख्यमंत्री आता मी निवडिते.
लेखकआपला अभिजितयांनी शुक्रवार, 05/12/2008 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
सर्दी-पडसं किंवा मध्यमवर्गीयांच्या दृष्टीनं तत्सम पातळीच्या गंभीर आजारावरच्या औषधासाठी एका डॉक्टर मित्राकडे गेलो होतो. मित्र या माणसाला काही पाचपोच नसावी, हे तर त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यानं ते वचन सार्थ केलं. सर्दी-पडशावरचं औषध राहू द्या, त्यानं माझ्या आकारमानालाच हात घातला.
"लेका, केवढा केंडासारखा वाढला आहेस?''
मित्रानं बॉंब टाकला. तोही साक्षात सहधर्मचारिणी सोबत असताना!
"बघा, मी तुम्हाला सांगत नव्हते? खाण्यावर काही कंट्रोल नाही. व्यायाम करायचा नाही.
लेखकमिंटीयांनी गुरुवार, 04/12/2008 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/4761http://www.misalpav.com/node/4794
समुद्राच्या फेसाळत्या लाटा खुणावत होत्या.......त्या फेसाळत्या लाटांमधे खेळण्यासाठी आम्ही मर्गस्थ झालो....
( क्रमशः)
हरिहरेश्वर समुद्राला खुप ओढ आहे आणि भरतीची वेळ आहे असं कळल्यामुळे जास्त पाण्यात जाण्याचं धाडस नाही केलं....लांबुनच त्या फेसाळत्या लाटांचा आनंद घेतला आणि थोडंफार पाण्यात खेळुन परतीच्या मार्गाला लागलो.........
लेखकपांथस्थयांनी सोमवार, 01/12/2008 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिस मधुन घरी येतांना इमारतीबाहेर काही मंडळी कुतुहलाने आकाशाकडे बघतांना दिसली. काय म्हणुन बघावे ते हि हसरी मुद्रा आकाशात झळकत होती....
हे काय आहे याचा तज्ञ मंडळींनी खुलासा करावा!
लेखकचेतनयांनी गुरुवार, 27/11/2008 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
जयश्री ताइंची कधीच नाही वाचुन आमची झोप उडाली आणि काय म्हणतात ते एक विडंबन पाडले (एक प्रयत्न)
http://misalpav.com/node/4738
का बंध रेशमाशी जुळले कधीच नाही
गात्रात कंप माझ्या भरले कधीच नाही
त्या सॉवळ्याच होत्या रात्री जागून माझ्या
वाह्यात वागणे मज जमले कधीच नाही
सलवार ही फुलांची मद झुलवीत येते
मज त्या लयीत झुलणे जमले कधीच नाही
डोळ्यात मोजलेल्या रात्री कितीक माझ्या
सत्यात भेटणे तुज जमले कधीच नाही
जखमा दिल्या नखाने, जपल्या बर्याच सार्या
का भाव तू दिलेले वठले कधीच नाही
पद सोडले सदा मी, सोडेन मी पुन्हा ते
का सोडणे तुला मज जमले क
लेखकचतुरंगयांनी बुधवार, 26/11/2008 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
काल रामदासांच्या 'काही कविता' वाचल्यापासून अस्वस्थ होतो, दोन समजल्या नाहीत म्हणून आणि दोन समजल्या म्हणूनही! आज त्यांच्या कवितेवरची त्यांची स्वतःची टिप्पणी आणि मुक्तरावांचे विवेचन बघून कविता समजल्याचा हर्ष झाला.