Skip to main content

विरंगुळा

कर्णधारांची दैनंदिनी

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शुक्रवार, 21/11/2008 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मि.प. करांना धाडसी गुप्तहेराचा नमस्कार. पॉंटिंग नावाच्या वाचाळ प्राण्याने सुनिल गवासकर ह्यांच्या वर केलेल्या टिकेविषयी आपण वाचले असेलच. बर्‍याच मान्यवरांनी ह्या विषयावर भाष्य टाळले. परंतु काहि माजी भारतीय कर्णधारांच्या दैनंदिनीत मात्र ह्या विषयी बरेच लिहिलेले आढळले. ह्या काहि निवडक प्रतीक्रिया , फ़क्त मि.पा. सभासदांसाठि. बिशन सिंग बेदी :- ओये होये मुंडे मे बडा दम हैगा ! बर्‍याच वर्षानी का होइना पण कोणीतरी त्याला आरसा दाखवल बरे झाले. देवदूत कसला असुर आहे तो ! ह्याला येव्हडे सावरुन घेतले पण शेवटि काय ? ह्यांच्या हाथाखाली आम्हाला खेळायला लावले.

एका `अभिनयसम्राटा'चा अंत!

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 20/11/2008 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.indiaprwire.com/downloads/200711295895-3.jpg नि षेध! त्रिवार निषेध!! "देशद्रोही'वरील बंदीनं केवळ अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गळा घोटलेला नाही, तर एका उदयोन्मुख अभिनयसम्राटाचा, भावी सुपरस्टारचा आणि प्रतिभावंत कलावंताच्या उमेदीचा गळा घोटला आहे. एका जातिवंत कलाकाराच्या अभिनयसामर्थ्याच्या पाठीत खंजीर खुपसला आहे... "इसके कहने पे मैं मुंबई छोड दूँ...उसके कहने पे मैं दिल्ली छोड दूँ...क्‍यूँ?

प्रतिसाद वाद विवाद संवाद

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी बुधवार, 19/11/2008 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
या काव्यासाठी प्रेरणा {आधीच अवांतरः}हे विडंबन नाही{अवांतर संपलं} हे जीवन आहे नश्वर हे जगत आहे नश्वर आधार एकच असतो नाम त्याचे (विसोबा) खेचर आयई असो वा फाफॉ क्लिक मिपालाच मिळत असते लेखाकडून प्रतिसादाची वाट चालत असते प्रतिसादातून माणसांची ओळख होऊन जाते त्यांची असलेली ओळख सदा मित्र नामे रहाते मैत्रीतूनच रट्टे-कट्टे स्त्रावित होत जातात मगच त्यातून संवाद आकार घेत जातात आता मिसळ हापसण्यातच वैराग्य माझे संपले पण अवांतराचे बीज डोक्यात माझ्या उरले आता व्यस्त अदिती संगणकाशी जाईल प्रतिसाद द्या वर क्लिक करुन पुन्हा शांत राहिल.

पाककृती : कट्टावृत्तांत

लेखक कोलबेर यांनी बुधवार, 19/11/2008 02:15 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी ही पाककृती अतीशय सोपी आणि हमखास प्रतिसाद देणारी आहे. साहित्य : साहित्य हे तुम्ही भारतात आहात की परदेशात ह्यावर अवलंबुन आहे. भारताता असाल तर एक मोबाईलफोन आणि (किमान) तीन-चार मित्र/मैत्रिण. परदेशात असाल तर एखादा ओळखीचा/जवळापासचा कुणीही आणि एक कॅमेरा. कृती: इथेही तुम्ही देशातच असाल तर अतीशय सोपी कृती आहे. पूर्व तयारी :मोबाईलचा वापरकरुन ३-४ मित्रांना शनिवारी रात्री कुठेतरी जेवायला जायचा प्लॅन करायचा. जेवणाआधी मद्यपान/धुम्रपान केल्यास असात्विक कट्टा होतो मद्यपान आणि धुम्रपान टाळल्यास सात्विक कट्टा होतो. प्रत्यक्ष कृती: झालं!!

खेळ दोन ओळींचा - २

लेखक राघव यांनी मंगळवार, 18/11/2008 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
खेळ मागल्यावेळी सारखाच.. एक ओळ मला सुचली ती अशी - खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव ..... पुढची ओळ काय होऊ शकेल ते आपल्याला सुचतंय तसं प्रतिसादात लिहायचं. हि कविता नाही. त्यामुळे फक्त दोनच ओळी असणारेत. अट एकच, वर लिहिलेल्या पहिल्या ओळीशी निगडीत अशीच दुसरी ओळ असायला हवी! मागल्यावेळी तर भन्नाट डोकी चाललेली.. यावेळी बघुयात कसे काय जमते ते! मुमुक्षु :)

सिंग इज किंग

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 15/11/2008 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ :- पंतप्रधानांच्या बंगल्यातील मिटींग हॉल विषय :- हिंदु दहशतवाद पात्रे :- (हिरव्या कोचावर) अबु आझमी, शबाना आझमी (हिरव्या साडीमध्ये), जावेद अख्तर, अमर सिंह, मुल्लायम सिंह यादव, दिलिप कुमार. (भगव्या कोचावर) लालक्रुष्ण अडवाणी, शत्रुघ्न सिन्हा, नरेन्द्र मोदी, सुषमा स्वराज, उद्धव ठाकरे. (समोर इटलीहुन मागवलेल्या कोचावर मनमोहन सिंह, सोनीया गांधी, राहुल गांधी, विलास राव देशमुख, शरद पवार, आर. आर. पाटिल) शबाना दिदी :- (ईकडे तिकडे बघत ) हुश्श.... दिलीप कुमार :- उमममम क्या हुआ मोहतरमा ??

संस्मरणीय निसर्ग!

लेखक वर्षा यांनी शनिवार, 15/11/2008 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
परवा गप्पांच्या ओघात विषय पूर्वी, शाळा-कॉलेजात असताना पाहिलेल्या जाहिरातींकडे वळला. जाहीरातींची उजळणी करुन विषय मालिका...त्यांची शीर्षकगीतं..त्यातील कलाकार असा प्रवास करत करत चित्रपटांपर्यंत आला. चित्रपटांचंही दळण व्यवस्थित दळून झाल्यावर एका क्षणी विषय अचानक शैक्षणिक, शास्त्रीय कार्यक्रमांकडे वळला आणि मग थेट कंट्रीवाईड क्लासरुम पासून टर्निंग पॉईंटपर्यंत आठवणींना उजाळा देत देत विषय नॅशनल जिऑग्राफिक, डिस्कव्हरी पर्यंत येऊन पोचला. केबल नव्हता तेव्हा रविवारी लागणार्‍या National Geographic सिरीजवर समाधान मानलेलं असायचं.