Skip to main content

विरंगुळा

तो चावला मघाशी ह्यांना अशा ठिकाणी

लेखक बेसनलाडू यांनी शुक्रवार, 06/02/2009 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
तो चावला मघाशी ह्यांना अशा ठिकाणी झटक्यात हाय गेली लागून आणिबाणी अडवून मीच धरले होते किती दमाने (फ्रेश्नर घरात नाही, भरपूर ओत पाणी!) गुत्त्यात राहुनी मी शुद्धीत राहणारा बेहोश विश्व भवती, बेताल बोलगाणी दररोज एक काढा साइट् नवी मराठी इतिहास थोर घडवा, बनवा तिला निशाणी! प्रतिसाद हा कुणाचा आहे कुणास पत्ता? (खोटी मिठास वाणी; खोटे छदाम, नाणी) बोके चलाख, सोदे गुरकावले कशाला? येता पुढ्यात माऊ गातात गोड गाणी प्रेरणा: मी बोचलो म्हणाले

या टोपीखाली दडलंय काय?! :)

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 05/02/2009 23:30 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरीकेतले साहित्य संमेलन, महाराष्ट्राचे २५ लाख, संमेलनाचे मराठी संस्थळ, तात्यासारख्या यकश्चित माणसाला फोन! आखिर मामला क्या है भाई?! :) कुणीतरी अशी पटापट गंमत आम्हा सांगेल काय, या टोपीखाली दडलंय काय? या मुगुटाखाली दडलंय काय? या संमेलनाखाली दडलंय काय? :) अजून काही दिवसांनी येणारे प्रश्न - मारुती कांबळेचं काय झालं? तात्या अभ्यंकरचं काय झालं? चांगला माणूस होता बिचारा! :) सख्या रे घायाळ मी तात्या! असो... आपला, तात्या फुले.

`तारे' जमीं पर नव्हे, जमीनदोस्त!

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 05/02/2009 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
कित्ती हुशार आहे हो तुमची मुलगी! किती छान नाचते, हावभाव करते, समज तरी किती आहे तिला वयापेक्षा!! :) या आणि असल्या प्रशंसेने आम्ही (आणखीनच) फुगलो होतो. त्यातून भर पडली, सारेगमप सुरू झाल्यानंतर तिच्या आणि मुग्धा वैशंपायनच्या तुलनेची. "सेम टू सेम मुग्धा हं!' :S अशा कॉंप्लिमेंट्‌स मनस्वीला घडोघडी, जागोजागी मिळू लागल्या. "अगं मुग्धा, मला ओळखलंस का?' असं थेट विचारणाऱ्या अनोळखी बायकाही ठिकठिकाणी भेटू लागल्या. जणू या बया गेल्या जन्मी मुग्धाच्या आयाच होत्या आणि आता नव्या जन्मात मुग्धानं मनस्वीचं रूप घेतल्यानंतर त्या तिला जुनी ओळख दाखवू पाहत होत्या!

वादळ (अंतिम)

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 05/02/2009 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
( काही वर्षापूर्वी, सांगलीला आमच्या सोसायटीच्या गणेशोत्सवातील कार्यक्रमात सादर करण्याकरिता एक एकांकिका मी लिहिली होती. ती कथा रूपाने इथे लिहित आहे. मुंबईमध्ये १९९३ साली बॉम्ब स्फ़ोट झाले आणि त्यानंतर उसळलेल्या हिंदुमुस्लिम दंगली..याची पार्श्वभूमी कथेला आहे.) आधीचा भाग.. वादळ (वैभवने थर्मासमधली कॉफी ओतून मगात घेतली आणि त्याच्या नेहमीच्या खुर्चित बसून पुस्तक वाचू लागला. कितिवेळ गेला कोणास ठाऊक... अचानक..दारावर थाड थाड आवाज आला...."दरवाजा खोलो... प्लिज दरवाजा खोलो....

नीलकांतकी चल पडी! :)

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 05/02/2009 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरीकेत होणार्‍या साहित्य संमेलनाशी निगडीत मिपावर या आधीच बराच काथ्याकूट झाल्यामुळे खालील मजकूर कदाचित कुणाला मस्करी वाटू शकेल. परंतु तसे नाही. जरी मौजमजा, विरंगुळा सदरात टाकली असली तरी ही सत्यघटना आहे. देवकुळेकाकांचा नंबर आता आमच्या भ्रमणध्वनिवर आहे खरा परंतु घाईगडबडीत त्यांना मिपावर चाललेली चर्चा वाचा आणि जमल्यास खुलासा करा असे सांगायला विसरलो..! पुन्हा फोन करून सांगू की काय?! :) राम राम मिपाकरहो, आत्ताच आम्हाला आमच्या भ्रमणध्वनीवर, अमेरीकेत होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाच्या संदीप देवकुळेंचा दूरध्वनि आला होता.

शेराला सव्वाशेर

लेखक ब्रिटिश यांनी गुरुवार, 05/02/2009 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
आर शित्याला पोलीसांनी धरलाय. जाम मारतान बग. बारक्या बातमी झेउन आला. शित्या. सिताराम म्हात्रे. यकदम झोलर मानुस. आखोंशे सुरमा नीकालनेवाला. तो न्हेमी म्हानायचा ' ऊधारी ने वलखी वाडतात'. गणा पाटलाची दोन येकर जमीन त्यान सात जनांना ईकलीवती. दुनीयेची ऊधारी आंगावर. यकदा माजे घरी दोगा जनांना झेउन आला. माज घर तस रोडटच हाय. वटीवर बसवल न घरात आला . आयला म्हनला 'लांबन आल्यात पावनं. गुळपानी दे. पाच मिन्ट बसतील न जातील.' गेला मागल्या दारानं. धा मीन्ट जाली पंदरा मीन्ट, पावनं ऊटाया मागनात. आय म्हनली 'बाबांनो क काम हाय क तुमच ?' तर म्हनल क 'शित्याला पाटवा.

वादळ..

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 05/02/2009 01:57 या दिवशी प्रकाशित केले.
( काही वर्षापूर्वी, सांगलीला आमच्या सोसायटीच्या गणेशोत्सवातील कार्यक्रमात सादर करण्याकरिता एक एकांकिका मी लिहिली होती. ती कथा रूपाने इथे लिहित आहे. मुंबईमध्ये १९९३ साली बॉम्ब स्फ़ोट झाले आणि त्यानंतर उसळलेल्या हिंदुमुस्लिम दंगली..याची पार्श्वभूमी कथेला आहे.) "अरे अजिंक्य, सगळीकडे हेच चालू आहे. न्यूज वर, पेपरात, रेडीओवर.. बाहेर तर हिंदुमुस्लिम दंगल उसळली आहे... देव जाणे काय होणार आहे..? आपण आपल्या गावापासून इतक्या लांब. आई-बाबांचं काय झालं असेल? त्यांना किती काळजी लागून राहिली असेल. टेलिफोन बूथ सुद्धा बंद आहेत." वैभव अजिंक्यशी बोलत होता.

सेव्हन पाउंडस् - एक अस्वस्थ करणारा अनुभव.

लेखक मुशाफिर यांनी गुरुवार, 05/02/2009 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
विशेष सुचना: ज्यांनी अजून 'सेव्हन पाऊंडस्' हा चित्रपट पाहिला नसेल आणि ज्यांना तो पाहण्याची ईच्छा असेल, त्यांनी वाचताना ह्या लेखाखालील अवांतर टिपा श़क्यतो वगळाव्यात. तसेच, माझा चित्रपट समिक्षा लिहिण्याचा कोणताही हेतू नाही. केवळ एक चांगला अनुभव इतरांबरोबर वाटून घ्यावा, म्हणून हा प्रपंच! ************************************************************** गेल्या वर्षीचे शेवटचे दोन आठवडे खरचं खुप छान गेले. मला आणि माझ्या अर्धांगिनीला आपापल्या कामांमधून बर्‍यापैकी वेळ मिळाला होता. कुठेही फिरायला न जाता घरीच सुट्टी साजरी करावी, असे ठरल्यामुळे मी एकदम खुशीत होतो.

((प्रवाह..आणि उत्तर))

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 04/02/2009 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजूची "प्रवाह..आणि उत्तर" वाचली आणि लगोलग विडंबनाचे प्रवाही उत्तर स्फुरले ते असे.. काव्य अनावृत्त मात्रा आणि वृत्त शिष्य हा प्रवृत्त झाला पहा कविबुद्धी नाठी हाणावीच काठी विडंबना साठी लगोलग 'धुकट सकाळ' फुकता 'फुकट' 'चिकट' बिकट' होत जाई तोतयांचे बंड विचारती गुंड 'चतुरंग' पुंड गेला कोठे? कविता 'म्हणजे' वाघाचे हो पंजे कशाला पाहिजे वृत्त छंद विसरा 'खोबार' 'शाळा' झाली फार प्यावा थंडगार सोमरस काव्य 'हलकट' करी खटपट नाना पाठोपाठ अवलिया आवडती नार आहे 'बुधवार' टाकावी चिक्कार सायंकाळी कवी किती जण? कवितांचे तण उपटण्या मन आतुरले 'केसूपंथी' खाज व

उत्साहाचं भरीत!

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 04/02/2009 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
`मिपा'वर सातत्याने येत असलेल्या पाकक्रुतीच्या प्रकारांपासून प्रेरणा घेऊन आपणही अनुभवलेला एखादा पाकक्रुतीचा प्रकार इथे टाकावा, असं वाटलं. तोच हा प्रयत्न. ------------ उत्साहाचं भरीत! साहित्य ः प्रचंड उत्साह, चवीपुरता चटपटीतपणा, शोभेपुरता रंगेलपणा आणि बचकाभर ऊर्जा. कृती ः प्रथम प्रचंड उत्साह शरीर आणि मनभर घुसळून घ्यावा. अंगात सर्वत्र भिनवून घ्यावा. वाटल्यास आपल्या पूर्वानुभवाचाही त्यासाठी वापर करावा. मग त्यात चवीपुरता चटपटीतपणा चांगला मिसळून घ्यावा.