Skip to main content

विरंगुळा

आनंदाची बातमी..! :)

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 01/03/2009 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
एक निवेदन... कळवण्यास अत्यंत आनंद होतो आहे की मिपावर शुद्धलेखन विषयक लेखांवरील, चर्चांवरील बंदी आता उठवण्यात आली असून मिपावर एक शुद्धीचिकित्सक विभाग सुरू करण्यात आला आहे.. :) माननीय मिपाकर सतिशराव हे या विभागाचे प्रमूख असतील व तात्या त्यांच्या हाताखाली त्या विभागातील एक दुय्यम क्लार्क म्हणून काम पाहील! :) सतिशरावांनी प्राणिपात कोटि कोट आणि मोकलाया दाहि दिश्या या दोन कविता मिपावर लिहून तात्याच्या कानफटात मारली आहे आणि शुद्धलेखन विषयक झणझणीत अंजन समस्त मिपाकरांच्या डोळ्यात घातले आहे.

?

लेखक शितल यांनी रविवार, 01/03/2009 01:20 या दिवशी प्रकाशित केले.
तू एक स्वप्न आहेस की सत्य? हा तुझा आभास का तुझी जाणीव करून देणारा अलगद स्पर्श? मनाला काहीच उमजत नाही ... आणि शरीरालाही. सगळे विसरून वर्तमानात जगायचे, तरी घुसमट होते. मनाच्या कोपर्‍यात, खोल कुठेतरी एक साद ऐकू येत आहे. आवाज ओळखीचा वाटतोय पण आज तर माझाच आवाज मीच विसरले आहे! तुझ्या सादाला प्रतिसाद द्यायला टाळतेय... का? कारण तू सत्य का तुझा मृत्यू सत्य? ... शरीर म्हणते तू आज जगात नाहीयेस, मन म्हणते तू मला सोडुन कुठे ही दूर नाही... फक्त माझ्यासाठी... मृत्यू नंतरही माझ्याजवळ.
Taxonomy upgrade extras

बोंबलाया दाहि दिश्या

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 28/02/2009 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
सखारामजी गटणेजी ह्यांनी दिलेल्या जाहिर आव्हानास हे आमचे प्रत्युत्तर ! निसतला ग्लास ओन्जलितुन तो मल कुन्वित आहे वस घेत्तो मोकले की मी अत्ता ओकलो आहे एकु द्या मज शिविगल त्य्य काउन्तरच्या खुर्चितु नी मद्यगन्ध मोहक एक्दा भर्उद्या मला शावसतुनि रत्रिच्य तिमिरत होति फुन्क्लि जी धुरादे घामबिन्दु होउअन भेतलि मज उमलत्या नाकासवे ग्लासतुन बात्ल्यातुन मदिरेची ही स्पन्दने उतुन्ग लाथा देती मज ही आच्मने हलूच ते ग्लास चुम्बनि जाती मित्रचे तातवे औओथ अओल्या पाकल्याचे धुन्द होउअन थरथरावे अव्हेरले ते गुजरात मी की मद्यबंदीचे पाश होते क्शितिजासही माझ्ह्य

फेड...

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी शनिवार, 28/02/2009 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
"राजू...." आक्काची किंचाळी रात्रीच्या घट्ट काळोखाला चिरत गेली. इतका गाढ झोपलो होतो तरी देखिल धडपडून उठलो मी. अशा वेळी सहसा उठलो तरी मला १-२ मिनिट काही सुधरत नाही. पण आक्काच्या आवाजात असा काहीतरी विलक्षण थरार होता की मी झोपलो होतो की नव्हतो असं वाटावं इतका लख्ख जागा झालो. मी अंथरूणातून उठणार एवढ्यात आक्का परत ओरडली... "राजू... ये रे लवकर... तो आला बघ परत. मला हाक मारतोय. राजू, नंदा... अरे कुठे आहात रे सगळे... तो घेऊन जाईल मला... त्याला समजवा... आम्ही काही घेतलं नाही कोणाचं... का असा छळवाद मांडला आहेस रे तू?" आक्काचा नुसता आकांत चालला होता. काय चाललंय काही कळत नव्हतं.

माउंट रेनियर . .

लेखक सुक्या यांनी शनिवार, 28/02/2009 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
माउंट रेनियर : भौगोलिक स्थान: वाशिंग्टन राज्य, उत्तर अमेरिका. अधिक माहीतीसाठी इथे टिचकी मारा. मागे बर्‍याच दिवसापुर्वी माझ्या घरापासुन जवळच असलेल्या या निद्रीस्त ज्वालामुखी ला भेट द्यायचा योग आला. वर्षाचा बहुतेक काळ हा ढगांच्या चादरीखाली झाकलेला असतो.

स्थलांतरे - घाऊक आणि किरकोळ

लेखक सुनील यांनी शनिवार, 28/02/2009 05:29 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणची गोष्ट आहे. कुठल्याशा सुटीत एका कौटुंबिक सहलीसाठी लोणावळ्याला जाणे झाले होते. विविध स्थलदर्शनांच्या यादीत "कार्ले" येथिल लेण्यांचा समावेश होताच. तेथिल एकविरा देवीच्या मंदिरात गेल्यावर माहिती कळली की, ही कोळी समाजातील लोकांची देवता. मला कुतुहल वाटले. कोळी समाज हा समुद्रकिनार्‍यावरील. मग त्यांची देवता अशी समुद्रकिनार्‍यापासून इतकी दूर, अगदी घाटापलिकडे देशावर कशी? वडिलधार्‍यांना विचारले पण कोणाकडेच समाधानकारक उत्तर नव्हते. आजही नाही. अनेक अनुत्तरीत प्रश्नांच्या ढिगार्‍याखाली ते कुतुहल आजदेखिल पडून आहे! मिपावर मराठीच्या अनेक बोलींतील लेखन वाचायला मिळते. त्यात एक आहे आगरी बोली.

निर्बलता

लेखक शिवापा यांनी शुक्रवार, 27/02/2009 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी स्पष्ट आठवते. टेकडीचा रस्ता. उतरलेली उन्हे. तुझा हात, विस्कटलेले केस ओलेते डोळे अणि तापलेले श्वास. काही क्षणांचा प्रवास. दरम्यानचे वाढलेले अंतर मनाच्या इच्छा, मिठीच्या अपेक्षा. पण आपण ठरलो नदीचे दोन किनारे. आज इतक्या दिवसानंतर डोळे न्याहाळाताहेत खिडकीच्या झरोक्यातून आत येऊ पहाणार्या आंब्याच्या डहाळीला. हि फांदी मी कितीतरी वेळा तोडली असेल. पण काहि दिवसांनतर ती पुन्हा हिरवी होते. परत एकदा घरात डोकावन्याकरीता आतुर. मग विशाद वाटतो. किती निरंतरता आहे तिच्या प्रयासात आणि किती निर्बलता होति माझ्या प्रयासात.

काही ग्राफिटीज् - 'पण अंतिम नाही.'

लेखक राज-निती यांनी गुरुवार, 26/02/2009 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
सरकार गरीबांना डोक्यावर 'छप्पर' देणार, जर मतदारांनी 'कौल' दिला तर. 'चोर-पोलिस' हा आता खेळ राहिला नाही , ही एक 'वास्तवता' आहे.