विरंगुळा
(आड गल्लीतल्या काही कविता)
माझं हल्ली असंच होतं, रामदास ह्यांचं काही लिखाण वाचलं की मी अस्वस्थ होतो. रामदास ह्यांच्या 'अडगळीतल्या काही कविता' ही त्याला अपवाद नाहीत. त्यांच्या कवितांवर 'वा!
"ती काही उमेद हारत नाही ".....समस्यापुर्ती अथवा काव्यस्पर्धा ...!!!
नमस्कार मंडळी,
नुकताच "जागतीक प्रेमदिन उर्फ व्हॅलेंटाईन डे" मोठ्ठ्य जोशात पार पडला ( हे वाक्य माझ्याबद्दलच आहे असे काही नाही). बहुतेक सर्वांनी आपापल्या "प्रिय अथवा प्रियेला" शुभेच्छा देताना अथवा पटवताना अनेक काव्ये रचली असतील अथवा इंटरनेटवरुन ढापुन परस्पर तिच्यापर्यंत पोचवली असतील, ह्यात एक वेगळीच मज्जा असते नाही ?
अश "प्रेमरसाने" ओथंबुन भरलेल्या कविता गाऊन दाखवण्याची तर वेगळीच नशा ...!
असो. आपला आज "तो विषय" नाही ...
सध्या आम्ही एका वेगळ्याच समस्येने त्रस्त आहोत.
तो व मी - लफडा अनलिमिटेड.
तो- अरे बाबा खुप सुखी आहेस रे.
मी- कारे असं का वाटलं तुला ?
तो- तुझं लग्न झाले नाही ना त्यामुळे.
मी- अच्छा.. म्हणजे ज्याचे लग्न नाय झालं तो सुखी ?
तो- नाय तर काय.. परवाची गोष्ट तो व्ही-डे काय विसरलो घरात महाभारत चालू आहे, तीने मला धुतला.
मी- तु व्ही- डे विसरलास लेका ? चांगले केले धुतला ते.
तो- अरे कामाच्या रगाड्यात विसरलो त्यात काय येवढे..३६४ दिवस प्रेम व्यक्त करतोच ना मी काही ना काही तरी करुन.
मी- काय झालं व्यवस्थीत सांग.
तो- शनिवारी सकाळी तीने मला हसून चहा दिला बेड वरच.
मी- मग, तु काय केलं.
तो- नेहमी पेक्षा त्यात साखर जास्त होती, म्हणून मी म्हणालो साखरेचे भाव खुप वाढले आहेत..
एक संवाद !
सर, नमस्कार ! ओळखलं का ?
असे म्हटल्याबरोबर..मनातल्या मनात कुसुमाग्रजांच्या कवितेची आठवण झाली. पण याचे कपडे काही कर्दमलेले वगैरे नव्हते. अगदी टापटीप होता.त्यामुळे मी जरा स्वत:शीच ओशाळलो.
आम्ही नेहमीप्रमाणे एसटी स्टँडवर एस्टीची वाट पाहात होतो. गजबजलेल्या स्टँडवर लोकांची ये-जा चाललेली होती. आणि माझ्या समोर एक तरुण त्याच्या पत्नी सोबत उभा होता. मी त्याच्या चेह-याकडे पाहिले, ओळखीचे कोणतेच चिन्ह त्याच्यात दिसत नव्हते. पण नेहमीचे गुळगुळीत वाक्य फेकुन दिले.
पूर्वी भेट झाल्यासारखी वाटते ! पण नेमके सांगता येईना आपण कुठे भेटलो ते!
सर, तुमच्या लक्षात कसे राहील?
भेट तुझी-माझी स्मरते...
वैधानिक इशारा : हा लेख राजकारणाविषयीचे (जरा अतीच सविस्तर) विडंबन असून, राजकारण न आवडणार्या व्यक्तींनी त्याकडे न फिरकणेच त्यांच्या आरोग्यासाठी उपकारक राहील.
मीडियावाले हल्ली "टीआरपी'साठी वाट्टेल त्या बातम्या देत सुटले असल्याचा आरोप खराच आहे की काय, अशा शंकेला पुरेपूर वाव मिळण्यसारखंच मीडियाचं वागणं आहे. कोणत्याही साध्या भेटीतून, चर्चेतून, वक्तव्यातून ब्रेकिंग-एक्स्कुझिव्ह न्यूज शोधण्याचा प्रयत्न करण्यातूनच मीडियाची विघ्नसंतोषी, मतलबी वृत्ती ठायीठायी जाणवू लागली आहे. मध्यंतरी राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली.
लागण व्हॅलेंटाईनची!
मंडळी, दरवर्षीप्रमाणेच ह्याही वर्षीच्या व्हॅलेंटाईनला पाच वर्षांपूर्वीची एक गोष्ट आठवली. सहाजिकच चेहेर्यावर हसू पसरलं. चतुरंग हसण्याचं कारण न विचारते तरच नवल.
तर त्याचं असं झालं २००४ सालची गोष्ट. आमच्या धाकट्या बंधूराजांच्या लग्नानिमित्त मी मुलाला घेऊन पुण्याला गेले होते. रंगरावांना कामातून (नेहेमीप्रमाणेच) सुट्टी मिळाली नव्हती त्यामुळे ते अमेरिकेतच होते.
आता माझं माहेर हे लग्नघर झालेलं त्यामुळे सहाजिकच गडबड, धावपळ चालू होती. नवर्यामुलाला प्रथेप्रमाणे कमितकमी रजा मिळाली होती! मानाची मोठी करवली असल्याने सगळे महत्त्वाचे निर्णय माझ्याकडेच सोपवले होते.
ठकीचा संसार
सर्व मिपाकरांना माझा नमस्कार.
मिपावरील हा माझा पहिलाच प्रयत्न आहे,त्यामुळे काही चुकले तर,सांभाळून घ्या,चुकले तर सल्ला द्या ही विनंती.
मागच्या आठवड्यात 'पवार पब्लिक स्कूल्,भांडुप' येथे श्री. विलास ना.
वाळणताई डे
[एका चीनी प्रवाशाच्या डायरीतले संदर्भ- त्याने २० व्या शतकात भारतखंडाचा प्रवास केला होता- त्यातील एका प्रसंगाचे हे मराठी भाषांतर]
दुनिया झुकती है, झुकानावाला पाहिजे असे संत लखोबा लोखंडे ह्यानी म्हंटले आहेच. मल्टीनॅशनल कंपन्यांनी वात्सायनाच्या भारतदेशाला प्रेम करायला शिकवले. आम्ही *सांस्कृतिक आक्रमण* वगैरे म्हणतात ते हेच असे बरेचदा लोकांना सांगुन पाहिले पण फुकटचे सल्ले लोकांना नको असतात असे सिद्ध झाल्यामुळे ते थांबवले. त्यांनी आम्हाला मोराल पोलिसींग करतोस असे म्हणून एक बेक्कार लूक दिला.
माय व्हॅलंटाईन
माय लास्ट व्हॅलंटाईन !
कशी आहेस तु ? आनंदात आहेस ना ? मला विसरली आहेस ना आता नक्कीच ? असे अनेक प्रश्न मला विचारायचे आहेत गं. पण त्या प्रश्नांना तुझ्या पर्यंत कसे पोहचवू ! चल हरकत नाही मी पाहतो आहे ना तुला ह्यातच आनंद आहे ! तुला जाणवत नसेल की मी तुझ्या आसपास आहे.. माझं मन तुझ्याच आसपास घुटमळत आहे... !
कित्येक वर्ष झाली मला तुला काही गिफ्ट देऊन पण.. तुला आठवतं का ? आपला लास्ट व्हॅलंटाईन डे ? नेहमी प्रमाणेच मी आलो होतो तुझ्या जवळ... पण आपल्या बाबांना आसपास पाहून नजरेच खुणवले होते... नंतर .. कसं विसरु ते मी ! तु दिलेले एकएक गिफ्ट माझ्या घरी अजून ही असेल. ... ती कोमजलेली फुलं..
मिसळपाव