Skip to main content

विरंगुळा

(( म्हणजे ))

लेखक छोटा डॉन यांनी मंगळवार, 03/02/2009 07:29 या दिवशी प्रकाशित केले.
"ओढ" म्हणजे काय ते १ आयडी उडवल्यावर लगेच दुसरा काढल्याशिवाय समजत नाही. "विरह" म्हणजे काय ते आपला आयपी ब्लॉक केला गेल्याशिवाय समजत नाही. "गेम" म्हणजे काय ते हिट्स वाढवुन सर्व्हरवर ताण आणल्याशिवाय समजत नाही "पराजय" म्हणजे काय ते तरीसुद्धा संकेतस्थळ चालु असल्याचे पाहिल्याशिवाय समजत नाही "दु:ख" म्हणजे काय ते आपला पानभर प्रतिसाद क्षणात उडवल्या गेल्याशिवाय समजत नाही. “सुख" म्हणजे काय ते दिवसातुन एकदातरी आंतरजालावर गजाल्या केल्याशिवाय समजत नाही. आधारीत : - म्हणजे आणि (म्हणजे) वास्तविक पाहता काव
Taxonomy upgrade extras

म्हणजे...

लेखक शितल यांनी सोमवार, 02/02/2009 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
"ओढ" म्हणजे काय ते  जीव लावल्याशिवाय समजत नाही.  "विरह" म्हणजे काय ते  प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही.  "प्रेम" म्हणजे काय ते  स्वत: केल्याशिवाय समजत नाही "पराजय" म्हणजे काय ते शत्रु कडुन हारल्याशिवाय समजत नाही "दु:ख" म्हणजे काय ते अपेक्षाभंग झाल्याशिवाय समजत नाही. “सुख" म्हणजे काय ते स्वत: मध्ये शोधल्या शिवाय मिळत नाही.
Taxonomy upgrade extras

शिंडीबाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! ईथे द्या

लेखक शंकरराव यांनी रविवार, 01/02/2009 06:48 या दिवशी प्रकाशित केले.
शिंडीबाई क्रॉफर्ड २० फेबूरवारी २००९ ला ४३ व्या वर्षात पदार्पण करीत आहे मान्यवर मिपकरां तर्फे शिंडीबाईंना शुभेच्छा, भावना, कविता, लेख ह्या धाग्यामर्फत पोहोचाव्या ह्या हेतूने हा खटाटोप... शिंडीबाईंना तात्याने निमंत्रण धाड्ले आहे. त्यांचा नजीकच्या काळात मुंबई दौरा होण्याची शक्यता आहे... (सदर कर्यक्रर्माचे आमंत्रण तात्या लवकरच सर्वांनां ?? देईल ) ... ह्या धाग्यावरील शुभेच्छांचे सूंदर पुस्तक, एक नउवारी व कुंकवाचा करंडा शिंडीबाईंना भेट म्हणून दिला जाईल ;-) (अधिक भेटवस्तू सुचवाव्या) शिंडीबाई कोण ? ?

तुला पिताना पाहिलं की.......

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 31/01/2009 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा प्रेरणास्त्रोत अनंतसागर ह्यांची तुला हसताना पाहिलं की....... तुला पिताना पाहिलं की कोरड्या ग्लासाला पालवी फुटते आणि दिवसभर कोरडी असणारी सुरई दुथडी भरुन वाहू लागते तुला पिताना पाहिलं की भरलेल्या ग्लासात वसंत अवतरतो चखण्याची चाहूल लागण्या आधीच चमचा काटा फुलवून नाचतो तुला पिताना पाहिलं की त्या बर्फालाही पाझर फुटतो सोडा तर चोहिकडे सप्तरंग उधळीत फिरतो तुला पिताना पाहिलं की टेबल हसू लागतात सर्व खुर्च्या जणू तुझ्यासाठीच गाणे गातात तुला पिताना पाहिलं की तो शेजारचा टेबलवाला तुझ्या पिण्यावर जळू लागतो आणि तु मात्र मदिरेच्या प्रेमात चिंब होऊन भिजू
Taxonomy upgrade extras

आमच बी क्वाश्चुम डिजाइन

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शनिवार, 31/01/2009 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
आमच बी क्वास्चुम डिझाईन
तर काय सांगत व्हतो मी. हां आमी कापड घाल्तो ती सोताच उन थंडी वारा पाउस या पासुन सौरक्षन व ल्वॊकांच लज्जा रक्षन याच्यासाटी. आता कापडाच्या आत समदीच मान्स भोंगळी असत्यात म्हनून काय भोंगळ फिरायच? आता यकदा आमची प्यांट लाग्ली गळायला. पट्टा घालायला लागला. लै़च वैताग यायला लागला. मंग आमी ती प्यांट घालन सोडुन दिल. दुसरी प्यांट घालायला लाग्लो. तसे आमी कंच्या बी प्यांटवर कंचा बी शर्ट घालतोय. कापडं घालतोय ह्य काय थोडयं का? काही दिवसांनी ही प्यांट टाईट व्हायला लाग्ली.

कुणी घर सांगता का घर?

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 30/01/2009 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
परवा भांडारकर रस्त्यावरच्या रणजित हॉटेलला जायचं होतं. तसा कार्यक्रमांनिमित्त अनेकदा गेलो असेन तिथे. पण अजूनही ते प्रभात रोडला, की भांडारकर रोडला, हे अजून आठवत नाही. ते शोधताना आधी प्रभात रोड, मग भांडारकर, असे करत राहिलो. अखेर कार्यक्रम संपल्यानंतर पोचलो. तसा कार्यक्रम बुडवून फार काही नुकसान नव्हते, पण केवळ माझ्या वेंधळेपणामुळे तो बुडाला, हे महत्त्वाचे. :S पत्ते शोधण्याची आणि लक्षात ठेवण्याची आमची ही नेहमीची बोंब! पुण्यात आता बारा वर्षे होतील, पण अजूनही लोखंडे तालमीपासून भरत नाट्य मंदिराला कसे जायचे, हे पक्के नाही सांगता येणार मला!

मन कसे वेडे-पिसे

लेखक पल्लवी यांनी बुधवार, 28/01/2009 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
मन कसे वेडे-पिसे कधी हसे कधी रुसे कल्लोळात भावनांच्या कधी अलगद फसे ! मन कसे वेडे-पिसे कधी असे कधी तसे बोलघेवड्या मनात मूक आठवांचे ठसे ! मन कसे वेडे-पिसे स्वप्नं जुनी जाळितसे शांतावल्या चितेवर स्वप्नं नवी रचितसे ! मन कसे वेडे-पिसे सप्तरंगी वस्त्र जसे शुभ्र-सुखाच्या सोबती दु:ख काळे शोभतसे ! मन कसे वेडे-पिसे मोरपीस नाजुकसे आठवांच्या झोतासवे कृष्णामाथी डुलतसे ! मन कसे वेडे-पिसे जणु नभ पोकळसे जाता धरु नाठाळास हाती येते कवडसे ! ~पल्लवी~
Taxonomy upgrade extras

एक सकाळ - मुंबईतली आणि अमेरिकेतली

लेखक आनंद घारे यांनी मंगळवार, 27/01/2009 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
गेले सोळा आठवडे अमेरिकेत राहून नुकताच मी मायदेशी परत आलो. साहजीकच मला अमेरिका कशी वाटली असे लोक विचारतात, त्याचे उत्तर काय द्यावे याचा विचार पडतो. तिकडे ज्या गोष्टी चांगल्या वाटल्या त्यांना त्या चांगल्या आहेत असे कोणी म्हंटले की "तंकडचं सगळं लय भारी हाय हे आयकून आमाला आत्ता कंट्टाला आला हाये!" अशी प्रतिक्रिया एकाद्याकडून येते किंवा त्याचा बादरायण संबंध आपली संस्कृती, अस्मिता वगैरेशी जोडून राष्ट्राभिमान, देशभक्ती, धर्मनिष्ठा वगैरेवरले बौध्दिक दुसरा कोणी सुरू करतो.

(ही 'तिची' माझीच आहे गोष्ट अन...)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 27/01/2009 02:35 या दिवशी प्रकाशित केले.
अनिरुद्ध अभ्यंकरांची 'ही तुझी माझीच आहे गोष्ट पण...' ही सुंदर गजल कालपासून मनात रुंजी घालत होती आणि आज शेवटी समर्पक शब्द सापडताच आम्ही कान पकडले!
Taxonomy upgrade extras