Skip to main content

विरंगुळा

खाज!

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 15/01/2009 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
'माज!' वाचल्यावर 'खाज' सुटली नाही तर रंग्या कसला? तेव्हा सादर आहे .. कालचा 'गजकर्ण' थोडा आज आहे , आणि त्याची फार मोठी 'खाज' आहे ॥ कोणत्या वैद्याकडे मी जात नाही, आपल्या वैदूगिरीचा माज आहे ॥ आणि त्याची फार मोठी 'खाज' आहे ॥ कालच्या 'पेल्यातले' तात्पर्य थोडे, अन उद्याचा 'बेवडा' अंदाज आहे॥ आणि त्याची फार मोठी 'खाज' आहे ॥ घोरण्याचा ध्यासही आहे कधीचा, अंगणातच घोंगडी अन 'बाज' आहे॥ आणि त्याची फार मोठी 'खाज' आहे ॥ तोंड मी कोठे कधी लपवू पाहातो ना जनाची वा मनाची 'लाज' आहे ॥ आणि त्याची फार मोठी 'खाज' आहे चतुरंग
Taxonomy upgrade extras

ती संध्याकाळ

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 13/01/2009 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
तु बोललीस ते मी ऐकले नाही मी बोललो काही ते तू ही ऐकले नाही जरूर नव्हतीच तेंव्हा त्याची शब्द मुके झाले होते हातात हात तुझा घेता स्पर्ष भाषा उमगले होते ती संध्याकाळ थोडी आगळीच होती प्रकाश रंगांची सुगंधी उधळण वेगळीच होती असतो मी एकटाच जेंव्हा ते सारे गूज आठवते तेंव्हा तो सोन प्रकाश धावून येतो रंगांची ती पखरण पुन्हा सवे घेऊन येतो मी मोहोरतो , बावरतो तू नाहीस म्हणून कावरा बावरा ही होतो. मग काय अचानक जादू होते; मला तुझ्या स्पर्षाची जाणीव होते मी माझीच बोटे चुंबतो डोळे मिटुनी तुला अनुभवतो

कवी नडू पाही...

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 13/01/2009 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
'हंस उडू पाही...' हे काव्य वाचून आमच्या कल्पनेचा हंस विडंबनप्रांती उडू लागला! ;) 'रंग्या'चा पहारा विडंबनी कायदे कवी नडू पाही अवघड इरादे! असे कसे शब्द? अर्थ कुणीकडे? कल्पनेपल्याड झेपावती वेडे ओळी सैरभैर, बाभळीचे काटे धिटाईने लिही कुणी एकटे एकटे लावले कुलुप, बंद केली दारे असल्या कविता कशाला करा रे! चतुरंग
Taxonomy upgrade extras

माझं काय चुकलं..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 13/01/2009 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
एका छोटीचे मनोगत.. कशाला गं आईनं असं मला माललं.. ललून ललून नाक माझं लाल लाल झालं.. खलं खलं शांग आजी माझं काय चुकलं??? अंगणामध्ये गेले होते बिश्किट खात खात.. टॉमी तिथे बसला होता त्याचा खाऊ खात.. माझ्यातलं थोलं बिश्किट मी त्याला शुद्धा दिलं.. त्याच्या भांड्यातलं थोलं मी ही खाल्लं.. सगल्यांना देऊन खायचं असं आईनीश शांगितलं.. खलं खलं शांग आजी माझं काय चुकलं?? बाबांचा पांधला पांधला रूमाल मला मिलाला त्याच्यावर केचपचा मी लाल सूर्य काढला.. त्यावर मग मी थोडंसं दूध सुद्धा ओतलं..

बर्फ जादाचा जणू...

लेखक केसुरंगा यांनी मंगळवार, 13/01/2009 01:30 या दिवशी प्रकाशित केले.
मिल्याचे 'स्वप्न एखादे जणू...' वाचताना आम्हाला सत्याची जाणीव झाली! ;) चार चौघांसारखे माझे पिणे हे चालले चार चौघांसारखे मी चार प्याले ढोसले स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या ग्लासातले बर्फ जादाचा जणू घालून आहे गोठले टेबलाला धडकुनी पडलो कितींदा मी जरी भंगले नाही तरी प्याले कधी हातातले घेतली काढून त्यांनी बाटली हातातली वाटले मी टुन्न झालो; ग्लास सारे तोडले दोष हा माझा कसा? जर पाजले त्यांनी मला मीच हवर्‍यासारखे प्याले 'विरोधी' ढोसले? मी किती ठोठावले पण दार ती उघडेच ना का असे अमुचे कलत्र आज ही रागावले? हाय!
Taxonomy upgrade extras

मेरीची डायरी

लेखक मूखदूर्बळ यांनी सोमवार, 12/01/2009 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
डीसूजाने सिगारेट विझवली. कंटाळा आला म्हणून. देवापूढे मेणबत्ती लावली. ते सुद्धा एक कर्तव्य म्हणून. मेरी लावायची म्हणून. मेरीला आपण भकाभका सिगारेटी ओढतो ते बिलकूल आवडायच नाही. आणि ती चिडते म्हणून आपण मुद्दाम ओढायचो तिच्या समोरच. तिच्या अंगावर धूर सोडत. मग तिला खोकल्याची उबळ यायची. डोळ्यातून पाणी काढत खोकायची. रागावून लटकी चापट मारायची. आपण तिला जवळ घ्यायचो तिच्या खोकून ताज्या मधासारख्या गालावर हात फिरवायचो. ती झिडकारायची पण तीला ते आवडत असणारच. डीसूझाला अप्र्रूप वाटल. चांगला ३ वर्ष संसार केला आपण मेरी बरोबर. पण तिचा एकही गुण आपल्याला कसा लागला नाही.

खास आवडीचे!!!

लेखक राघव यांनी शुक्रवार, 09/01/2009 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
काही काही कलाकृती/प्रसंग अवचित आवडून जातात. ते का आवडले हे सांगण्यासाठीसुद्धा काही वेळा आपल्याकडे शब्द नसतात. त्यांचीच आठवण जागवण्यासाठी हा धागा.. माझ्यापासूनच सुरुवात करतो :) - दिल चाहता है हा माझा खूप आवडता चित्रपट. भावून जातो. कलाकार, वातावरण, छायाचित्रण, पटकथा-संवाद, संगीत-गाणी; सगळं कसं मस्त जमून आलेलं! पण या चित्रपटाचा एक विशेष मला फार आवडतो. त्याची निळाई!! बहुतेक फ़्रेम्समधे हा निळा रंग कोणत्या ना कोणत्या स्वरूपात वापरल्या गेलाय. चित्रपटाच्या कथा-पटकथेच्या प्रकृतीनुसार निळा रंग अगदी चपखल आहेच, कारण त्याने येणारा शीतलतेचा तजेला आपल्याला त्या वातावरणाच्या जवळ घेऊन जातो.

आजची मुक्ताफळे (Quote of The Day)

लेखक एकलव्य यांनी शुक्रवार, 09/01/2009 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
काल माझ्या एका जीवलग मित्राने quote of the day असा मथळा देऊन एक वाक्याचा विरोप पाठविला. त्यावर झालेली चर्चा आणि देवणघेवाण येथे मांडत बसत नाही. पण झाले असे की ते वाक्य उगाचच मनात रेंगाळत राहिले. बर्‍याचदा असेच कोणाचे तरी, कोठेतरी ऐकलेले एकच वाक्य मनात घोळत राहते. कधी मन मोहरून जावे असे तर कधी विचारात पडावे असे. कधी अंगाचा भडका उडावा असे तर कधी हसून हसून गडाबडा लोळावा असे. तर कधीकधी उगाचच आवडून जावे असेही. तसेही अलिकडे आपण जगतो ते Sound Bites च्या जगात.