मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तु राजा की राजदुलारी मै....

दशानन · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
तु राजा की राजदुलारी मै.. सिर्फ लंगोटे आला सुं ! भांग रगड के पिया करु....मै.. मुंडी सोटि याआला सुं ! तु राजा की छोरी से... मेरे एक भी दासी दास नही ! साधुसा आले ओढण आली म्हारा कंबल तक पास नही ! नवीन चित्रपट ओय लकी लकी ओये मधील हे एक गाणं ! हरयाणवी लोक संगितावर आधारलेले हे एके नितांत सुंदर गाणे आहे... ! हरयाणवी शब्दांमुळे ह्या गाण्याची गोडी एकदम अप्रतिम वाढते... ! एकदा प्ले करा.... तुम्हाला देखील आवडेल नक्कीच !! || गाणे येथे उपलब्ध आहे || ********************************************* अशीच एक प्रेम जोड्याची ही छोटीसी कहानी ;) # प्रेमाच्या सुरवातीच्या वर्षात मी - कधी कधी हा प्रश्न माझ्या डोक्यात नेहमी येतो, तुला माहीत आहे का ? ती - कुठला प्रश्न ? मी - हाच. आपलं कसं होणार. ती - ह्म्म ? कसं होणार म्हणजे. मी - तु येवढी शिकलेली तुझ्या घरात पैसा पैसा कमी नाही.. माझ्या कडे कधी येणार माहीत नाही. ती - अरे पैसाच म्हणजे जग आहे काय ? व मी शिकलेली आहे तर आपला फायदाच आहे, मी पण नोकरी करेन. मी - म्हणजे बायको कडून पैसे घेऊन घर चालवू ? ती - त्यात वाईट काय ? मी - काही नाही .. असंच ! ती - तुला नाही आवडणार मी नोकरी केलेली ? मी - आवडेल. पण तु माझ्या बरोबर कष्टात जगशील ? ती - मी तुझ्या बरोबर कुठे ही जगेन.. अगदी झोपडपट्टी देखील ! मी - मी तुला पुर्ण सुखी ठेवण्याचा प्रयत्न करेन. # लग्न झालेलेल्या एक आठवड्यानंतर ! मी - आज तु स्वयंपाक करतेस का ? रोज हॉटेल महाग पडतं गं ! ती - असं कसं राजा करतोस... मी नाही जा करणार.. मी दमले आहे ना आता! मी - अगं.. फक्त नाष्टाच तर तयार केला होतास तु सकाळी.. ते पण ! ती - नाही रे राजा, नाष्टा तयार केला.. घर साफ केलं... कपडे वाळत घातले ! मी - एक खोलीचं तर घर ! ती - असं काय रे.. करतो ! मी - चल. ठिक आहे, मीच करतो. # लग्न झालेलेल्या एक वर्षानंतर! मी - ह्म्म. काय गं ! कपडे नाही धुतलेस. ती - वेळ नव्हता. मी - वेळ नव्हता म्हणजे काय ? मला ऑफिसला वेळ होईल आता. ती - राज्या मला पण जायचे आहे ऑफिसला तुच धु कपडे आपले व बरोबर माझी साडी पण जरा.. प्लीज ! मी - तुझ्या आवशीचा घो... मी तुझी साडी सुध्दा धु काय ? ती - धुना बाळा.. कधी तरी एकदा तरी माझं काम करं ! मी - बरं बरं .. नाष्टा तर तयार कर बये ! घालतो पोटात व कपडे धुतो ! # लग्न झालेलेल्या तीन एक वर्षानंतर! मी - ये भवाने ! माझे कपडे .. नाष्टा केलास का तयार ? ती - मी तुझी नोकर नाही आहे... स्वतःच करुन घे .. मला वेळ झाला आहे... मी - तुझ्या आयाचा घो... करतेस का दाखवु झटका.. लै नाटक वाढले आहेत हं तुझे..! ती - हात लाव ना .... बघ कसे नाचवते ते ! मी - थाबं आलोच. ती - तु मला मारलेसं ! माझ्या बाबांनी देखील मला कधी हात लावला नव्हता.. मी - तु बायको आहेस माझी ! ती - माझ्या घरी असं नव्हतं काही.. मला कसं राजकुमारी सारखं ठेवलं होतं बाबांनी ! मी - मग जा तुझ्या बाबा कडे.. जेव्हा बघावे तेव्हा बाबाचं तुणतुण ! ती - उं .. मी गेले की बसं रडत मग... आधी कसं म्हणत होतास फुला सारखी ठेवेन.. सुख देईन .. साधं दोन खोल्याचं घर नाही घेतलंस अजून... ! एक भांडी वाली ठेव म्हणाले तर म्हणे.. तु काय करतेस ऑफिस मधून आल्यावर.. हे ती व मी ची अनंत कहानी अशीच चालू राहणार.. युगे युगे ! ह्यात फक्त ती व मी च्या जागी कुठली ही नावे भरा.. सेम कथा !

वाचने 2601 वाचनखूण प्रतिक्रिया 4

अभिषेक पटवर्धन 08/02/2009 - 11:58
मला वाटतय की हे गाणं ओय लक्की मधलं आहे. नाही का?

In reply to by अभिषेक पटवर्धन

दशानन 08/02/2009 - 12:09
धन्यवाद ! धन्यवाद ! माझा पण देव-डी झाला आहे सध्या ;) डोक्यात फक्त देव-डीच चालू आहे त्यामुळे झाले असे :( *******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

सखाराम_गटणे™ 08/02/2009 - 12:28
नाना म्हणतो ते खरे आहे. प्रेमाला लग्न हा शाप आहे (जर अंडर स्टैंडीग नसेल तर.) कंसातील वाक्य माझे आहे.

टारझन 08/02/2009 - 13:24
मी - आवडेल. पण तु माझ्या बरोबर कष्टात जगशील ? ती - मी तुझ्या बरोबर कुठे ही जगेन.. अगदी झोपडपट्टी देखील !
तिने बाबांचं तुणतुणं वाजवताना त्याने कधी ह्या संवादांची तिला आठवण करून का णाही दिली ? आणि ह्या ष्टोरीमधला 'तो' पडिक सडिक वाटतो, मग त्याने घरची कामं केली तर स्वाभिमाण का दुखावला गेला ? माफ करा राजे, ह्या ष्टोरीतले दोघेही अंमळ येडझवे वाटले , मात्र तुम्ही णेहमीची कथा मस्त लिहीलीत .. अगदी चार कोलन्स पाडून .. - टार्‍या चैन || हेच ते टारू चैन ||