सर्व मिपाकरांना माझा नमस्कार.
मिपावरील हा माझा पहिलाच प्रयत्न आहे,त्यामुळे काही चुकले तर,सांभाळून घ्या,चुकले तर सल्ला द्या ही विनंती.
मागच्या आठवड्यात 'पवार पब्लिक स्कूल्,भांडुप' येथे श्री. विलास ना. करंदीकर यांचे "ठकीचा संसार" हे प्रदर्शन भरले होते.हे प्रदर्शन मी लहानपणी दूरदर्शनवर पाहिले होते.यावेळी प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला.
पूर्वीच्या काळातल्या दैनंदिन वापरातल्या वस्तू त्यांच्या नावफलकासहित येथे मांडल्या होत्या.काहींचे working models(याला मराठी प्रतिशब्द काय हो)(उदा.ताक घुसळणारी बाई,जात्यावर दळणारी बाई,इ.)ही होते.
सुट्टीत गावी गेल्यावर तेथे पाहिलेल्या वस्तूंच्या येथे छोट्या छोट्या प्रति़कृती पाहून खूप आनंद वाटत होता,मजा येत होती.काही वस्तू माहित नव्हत्या त्यांची माहिती आई-बाबांकडून मिळत होती.प्रदर्शन पाहण्यास आलेल्या आजी-आजोबांच्या चेहर्यावरचा आनंद अवर्णणीय होता.लहान मुले उत्सुकतेने तिथेल्या वस्तूंची चौकशी करत होती आणि त्यांचे पालक मुलांच्या शंकांना उत्तरं देत होते.श्री. विलास ना. करंदीकरही वस्तूंची माहिती करून देत होते.
एक आनंददायी,भावपूर्ण्,मनाच्या एका कोपर्यात साठवून ठेवावा असा हा एक अनुभव होता.
तेथे काढलेली छायाचित्रे-
http://picasaweb.google.com/prachikurkute/Bhatukali?locked=true#
वाचने
4444
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्राचीताई
मी पण
In reply to प्राचीताई by रामदास
Sorry
In reply to मी पण by महेंद्र (verified= न पडताळणी केलेला)
गंजिफा
In reply to Sorry by प्राची
मलाही फोटो
असे एक
ठकीचा
मस्त
फोटू सही
धन्यवाद
मस्तच..
मस्त!!
छान..
या