Skip to main content

विरंगुळा

बालगझलः झुऽम झुऽम झुऽम

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 12/06/2009 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
टारगेट वयोगटः २ ते ७ वर्षे ( + काहिश्या निरर्थक नादमय कवितेची मजा घेऊ शकणारा इतर कोणत्याहि वयाचा) इथे झुऽम झुऽम झुऽम ला अर्थ देणारी एखादी हस्तमुद्रा/हावभाव/अंगविक्षेप पालकांनी/शिक्षकांनी करून दाखवणे अपेक्षित आहे. तसेच शेवटाचे कडवे मुल अगदी लहान असेल व दूध पित नसेल तर या तालात पिऊन टाकते असा अनुभव आल्याने टाकले.. एरवी म्हणताना गाळले तरी चालेल =========================== विमान झेपावे कसे?

अंत... भाग-३

लेखक दशानन यांनी बुधवार, 10/06/2009 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
मी फोन बंद केला व गाडी बंद करुन सरळ.. जे होईल ते होईल हा विचार करुन त्या गाडीच्या दिशेने चालू लागलो... दरवाजा उघडा होताच, मी जरासे आत बघण्यासाठी वाकलो तोच एकदम पोटात जोरात कळ आली, माझा हात आपसूकच पोटाकडे गेला तर हाताला काही तरी ओले लागले..... मी ओरडलो... वोह शट... गोळी मारली मला तू.... असे म्हणत मी खाली कोसळलो.... ! मागील भाग... डॉक्टरांनी माझा जिव वाचवला, पण मला गोळी मारणारा तो कोण ?

एका प्रशि़क्शणार्थी पत्रकाराची डायरी

लेखक प्रसन्न केसकर यांनी बुधवार, 10/06/2009 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात. म्हणूनच तर आपण त्यांनी लिहीलेले वाचतो ना?) आमच्या आळीतल्या भोंड्यांचा पम्या म्हणजे लय भारी बेणं! तसे घरातले सगळे एकदम जंट्लमन, पण त्यांच्यात पम्या म्हणजे एकदम भांगेत तुळस! ड्ब्बल जाड काचेचा चश्मा लावणारा, पम्याचा फादर मुन्शीपाल्टीत संडास (सॉरी शॅनिट्री) इंस्पेक्टर असला तरी आपल्याला रिस्पेक देतो.

(आय विश)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 09/06/2009 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा सुवर्णमयीताईंची 'आय विश' ही कविता! ;) मराठी जालावर मोजक्या वर्षांचे नवकाव्य मागे मी वाचत वाचत. पद्यविभागात दिसणार्‍या नवकविता पाहून 'कर्म, कर्म' म्हणत होतो मी. वाचकांना वाचवण्याकरता दिल्या ढुशा मी त्या नवकवितांना ..कित्येकदा त्याने उंचावर दिसणार्‍या गोमट्या कविता बघितल्या..चढला वरती एक कल्पना घेऊन म्हणाला, "आय विश, आय विश मर्ढेकर, आरती प्रभू , ग्रेस, धामणस्कर' डोक्यात आणखी एक कल्पना घेऊन गुळगुळीत कागदावर सुसाट पुढे लिहीत गेला.. मी वाचेस्तोवर एका वाचकावर नवकविता ठेवून ..गेला पुढे . मी धास्तावलो..