Skip to main content

विरंगुळा

मिपाभारत

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 06/07/2009 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
धिस पिक्चर इज जॉइंट प्रॉडक्शन ऑफ विप्र. खोपडा अ‍ॅंड परा थोपडा. मुळ कथा : बाबा म्हाराज ठाणेकर डायरेक्टर ,स्क्रिप्ट राईटींग : परा एडीटींग : धम्मु (अतिरिक्त भार) मुझी़क : विजूभौ सातारवी अँड प्रमोद देव बॅ़ग्राउंड मुझीक : प्रमोद देव फायनान्स : तात्या भयंकर स्टार कास्ट : नेहेमीचे यशस्वी मिपाकर पुनरपी मरणम पुनरपी जननम (पीत पीत जगणारे, आणि मरणारे) ह्या न्यायाने मिपाकर सुद्धा म्हाभारतातील युद्धात हजर होते. बहुतेक सर्व पांडवांच्या पार्टीत होते. काही चपला घातलेले कौरवांच्या पार्टीत होते. टारझन भीमाच्या बाजुला उभा होता.

फुलपाखरे

लेखक अश्विनीका यांनी शनिवार, 27/06/2009 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
ही स्थिरचित्रे सिअ‍ॅटल च्या सायन्स सेंटर मधील फुलपाखरांच्या बागेत काढलेली आहेत. - अश्विनी

"तू"

लेखक अलि यांनी शनिवार, 27/06/2009 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी चाहूल सौदामिनी तुझं येणं झिम्मडसर थांबणं तृप्त पाऊसओल मन हिरवं करणारं ओठी धनू इंद्राचं सप्तरंगी शब्दशर डोळ्यात आभाळ थेंबभर निरभ्र, निःशब्द करणारं

माती - १

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी शनिवार, 27/06/2009 04:52 या दिवशी प्रकाशित केले.
"अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्ला..." घराशेजारच्या मशिदीच्या खरखरत्या लाऊडस्पीकरमधून काझीसाहेबांचा आवाज आला आणि गाढ झोपलेला उस्मान एकदम गडबडून जागा झाला. अर्धवट झोपेतच त्याने बाहेर नजर टाकली, त्याला पटकन आपण कुठे आहोत हेच समजेना. बाहेर अजून अंधार होता, रात्र सरल्यासारखी वाटत नव्हती. काझीसाहेबांचं दुसरं आवर्तन सुरू झालं आणि मात्र त्याला हळूहळू भान यायला लागलं. आपण तर आपल्याच घरात आहोत की चक्क... तो पर्यंत काझीसाहेबांची अझान संपली होती आणि लाऊडस्पीकर नुसताच जोरात खरखरत होता. उस्मानला म्हातार्‍याच्या युक्तीचं नेहमीच हसू यायचं. हा काझीसाहेब मोठा वस्ताद आहे.

व्हाय मेन डोन्ट लिसन अ‍ॅण्ड विमेन कान्ट रीड मॅप्स

लेखक शितल यांनी गुरुवार, 25/06/2009 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
अ‍ॅलन आणि बार्बरा पीस यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे जगातील अनेक भाषेत अनुवादन झाले आहे. मराठीत त्याचे अनुवादन अ‍ॅड.शुभदा विव्दांस यांनी केले आहे. पुस्तकातील माहिती अचूक व परिपुर्ण असावी यासाठी अ‍ॅलन आणि बार्बरा पीस दोघे ही भरपूर मेहनत घेतात. त्यासाठी ते देशोदेशीच्या एक्स्पर्टसना भेटतात, लोकांच्या मुलाखती घेतात, सेमिनार्स घडवुन आणतात. या पुस्तक निर्मीतीसाठी त्यांनी घेतलेली मेहनत पुस्तक वाचताना वाचकांच्या लक्षात येते. या पुस्तकात अनेक स्त्रीयांच्या मनात असलेले पुरूषां बद्दल प्रश्न जसे, पुरूष असे का वागतात ? मनातील गोष्टी बोलुन का दाखवत नाहीत?

ती तात्या अभ्यंकरांची भयंकर ओळ.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 24/06/2009 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
"बापाने यावं आणि दोन सणसणीत कानशिलात ठेऊन द्याव्यात असं आजही कुठेतरी वाटतं!" त्याचं काय झालं मंडळी,सौ. अनुराधा सचिन म्हापणकर ह्यांनी ही खालील कविता लिहिलेली माझ्या वाचनात आली, आज तू आमचं सारं ऋण फेडलंस.. वा.. बेटा .. वा..!! आज तू आमचं सारं ऋण फेडलंस.. पुन्हा पुन्हा डोळे भरून येतात.. तू मात्र डोळ्याला डोळाही देत नाहीस असं रे काय.. निघता निघता.. साध्या आशीर्वादालाही वाकत नाहीस का आशीर्वादाच्या हक्कापासूनही आम्हाला तू तोडलंस वा..बेटा..वा..आज तू आमचं सारं ऋण फेडलंस.. नव्हतं पटतं मान्य.. कदाचित आमचंही काही चुकलं असेल आमची लूडबूड..

ओंडका आणि पानं - फुलं..

लेखक भाग्यश्री यांनी मंगळवार, 23/06/2009 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
कालच एका भन्नाट ठिकाणी फिरून आलो.. (ज्याचे प्रवासवर्णन २००% येईलच!) तिथे काढलेले हे फोटो.. ओंडका.. ज्याच्यात मला हत्तीच्या सोंडेपासून, राक्षसाच्या तोंडापर्यंत कुठलाही आकार दिसत होता! IMG_4653 लाल पान..