Skip to main content

विरंगुळा

"दिलाचा दिलवर भेटला..."

लेखक शरदिनी यांनी सोमवार, 01/06/2009 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
वाटंला डोळे जीव थकला धनी कधी हो येता घरला साजण माझ्या स्वप्नीच आला मला दिलाचा दिलवर भेटला तगमग जिवाची होतेया भारी रात सरली कधी येतेया स्वारी वृंदगान : मर्दानी तोरा हसतोय छान हिच्चा नवरा शारूख खान माझा डोळाच पटकन लागला मला दिलाचा दिलवर भेटला नणदेचा दादला डोळा मारी इष्टेटीवरती नज्जर सारी वृंदगान : बटाटे डोळे टमाटे कान नण्देचा नवरा इर्फ़ान खान हा ठेवा मी जपून ठेवला मला दिलाचा दिलवर भेटला राती अचानक खोलीत आला मला पाहुनी दिवा मालवला..

टाहो

लेखक अरुण वडुलेकर यांनी रविवार, 31/05/2009 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
तडकलेला माळ जळणारं रान फेसाळता धुराळा धुराळ्याच्या थारोळ्यांत टळटळीत उन्हाचं मी न्हाणं घेतोय ! गाठुळलेल्या बुंध्यावर ठणकणार्‍या सांध्यांवर सोलावलेली साल तराटलेल्या फांद्यांवर लटकणार्‍या कबंधागत मी टाहो फोडतोय ! शिशिर-बहर चक्राच्या नि वैशाख ज्वाळांचा हा सदाचा आवर्त नाही. मृगजळांच्या मागे जात माझा मलाच मी भ
Taxonomy upgrade extras

स्टॅलिनशाही!

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 31/05/2009 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
चेन्नईतल्या आपल्या निवासस्थानी करुणानिधी ऐटीत आपल्या सिंहासनावर बसले होते. पक्षाच्या आमदार-खासदारांची गर्दी झाली होती. करुणानिधींच्या सिंहासनाच्या डावीकडे होते त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र अळगिरी. त्यापलीकडे नातू दयानिधी मारन. उजवीकडच्या बाजूला पहिल्याच खुर्चीत होते त्यांचे दुसरे पुत्र स्टॅलिन. पलीकडे मुलगी कनिमुरी. सगळ्यांचे चेहरे चिंताक्रांत होते. विषय गंभीर होता. काही झालं तरी तमीळ अस्मितेचा प्रश्‍न होता! तमिळनाडूच्या जनतेनं टाकलेल्या विश्‍वासाला पात्र ठरतील असेच प्रतिनिधी दिल्लीत पाठवणं आवश्‍यक होतं. करुणानिधींनी एकेकाला मत विचारायला सुरवात केली. पण कुणीच काही बोलायला तयार नव्हतं.

कसं सांगू ....?

लेखक अरुण वडुलेकर यांनी रविवार, 31/05/2009 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
कसं सांगू .....! तुला पटणारही नाही. साक्ष तुझ्या-माझ्या गुपिताची, तो निशिगंध.... अबोल झालाय ! तुला आठवतं.........? त्या अनुरागी क्षणांवरती त्याच्याही गंधाची पखरण होतीच. त्या कैफाचा स्पर्षवारा, त्यालाही हवासा वाटला. ताटातुटीच्या क्षणी........! 'पुन्हा येते' म्हणालीस, आली नाहीस. तुझ्या प्रतीक्षेत तो मात्र, कोमेजून गेलाय......! माझं कांही नाही.....! पण निदान त्याच्यासाठीं तरी, तुला पुन्हा यायलाच हवं......!!
Taxonomy upgrade extras

पिशितभुजाच्या कान्दिशिक नर्मदांचे विकल मनोरथ

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी रविवार, 31/05/2009 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
अधिपतींनी नेहमीप्रमाणे दरबाराला सुरवात व्हावी अशी आज्ञा केली. दरबाराला सुरवात झाली. किरकोळ तंटे, भांडणे यांचा यथायोग्य निवाडा करुन अधिपतींनी मौजेचे कार्यक्रम सुरु व्हावे असे सांगितले. दरबारी आपले विविध प्रकारचे कौशल्य दाखवित असतांनाच अधिपतींना लहर आली, आणि त्यांनी आपले नृत्यकौशल्य दाखविले. सभाजन अचंबित होवुन टाळ्या वाजवण्याचे विसरुन आपल्या शेजा-यांची बोटे तोंडात घालु लागले. दोन मिनिटांनी गरके घेवुन झाल्यावर "आताच भोजन झाले नाहीतर, कुणाला हार गेलो नसतो!" असे सांगुन अधिपती धापा टाकत सिंहासनावर जावुन बसले.

चारोळ्या

लेखक स्वप्निल मन यांनी रविवार, 31/05/2009 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
१) आभाळात मेघ दाटून आले की मला कसतरीच होत॑ तुझ्या आठवणी॑च्या पावसाने मन कासाविस होत॑ २) चातक जसा वाट पाहातो पहील्या पावसाची तसा मीही बघतोय वाट तुझ्या प्रेमाची तू फक्त एकदाच कर माझ्यावर प्रेमाचा वर्षाव न॑तर ते पावसासारखे धो धो कोसळणारच आहे माझ्यावरती
Taxonomy upgrade extras

जगायचे स्वतःलाच शोधत!!!

लेखक निशिगंध यांनी रविवार, 31/05/2009 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
तुला शोधता शोधता..... मी हरवून बसलो होतो स्वतःलाच.. आता तुझे विचारही नाहीत मनात मी शोधत आहे माझे मलाच... माझे मलाच... असे काही तरी लिहायचे आणी समजुत घालायची आपल्या मनाची.. पण प्रयत्न केले नाहीत असे नाही.. खुप प्रयत्न केले तीला सांगण्याचे.. पण हरलोच ना शेवटी, कधी आजुबाजुच्यांचा विचार, तर कधी तिचाच. तिला काय वाटेल. मित्र म्हणायचे अरे सांग तीला मग तिलाच ठरवू दे ना.. त्यांना काय जाते सांगायला. मी जाईन इथुन २ महिन्यानी पण तीला अजुन २ वर्ष काढायची आहेत हया महाविद्यालयात.. आणि आईचे निराळेच.. फोटो पाहुन म्हणते छान आहे रे!!

पत्रांमधुनी

लेखक क्रान्ति यांनी शनिवार, 30/05/2009 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
असेच भेटत राहू आता पत्रांमधुनी सुखदु:खाच्या सांगत गाथा पत्रांमधुनी "फुले मिळाली?" विचारले, अन् पुढे म्हणालिस, "फुलांसवे जर गंधहि जाता पत्रांमधुनी!" वळवाची सर जशी झरावी तसे भेटलो जालावरती येता जाता पत्रांमधुनी खुळ्यासारखे रुसवे-फुगवे, भांडण-तंटे, नको उगाळू त्या कटु वार्ता पत्रांमधुनी मनावेगळ्या मनात जपलेले क्षण हळवे कधी फिरुन येतिल का हाता पत्रांमधुनी? हळूच भिजल्या पापण्यांतला चंद्र हासला, पुन्हा तुझे प्रतिबिंब पहाता पत्रांमधुनी तुला वाचले, तुला जाणले, भरुन पावले! चित्र नको, तू ये ना आता पत्रांमधुनी! अवांतर :-या गझलचं सगळं श्रेय चुचुताईला!

कळावे लोभ असावा..

लेखक अरुण वडुलेकर यांनी शनिवार, 30/05/2009 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी भक्त पुंडलिकापर्यंत, जाण्याची गरज नाही खूप अलिकडच्या काळांतही वडिलांची बूज राखली जाई कोट टोपी अन् बार काड्यांची छत्री यांचाही आदर वाटत होता गावाकडचा 'म्हातारा', शहरांतले 'बाबा' वेदवाक्यासमान त्यांचा शब्द वाटत होता श्रीकाराखालील निमंत्रण पत्रिकेत 'कुलस्वामिनी कृपेंकरून..' इत्यादि नंतर 'वडिलांचे विनंतीस मान देऊन.......' बाकी नांवे छापण्याची कुलिनता होती पुढें निमंत्रणे मोअर प्रॅक्टिकल झाली 'मिस्टर अँड मिसेस इन्व्हाईट कॉर्डियली...इट्सेट्रा, इट्सेट्रा' आटोपशीरपणाने जिव्हाळा बेतला नीड टु नो पॉलिसीचा बोलबाला झाला आता तोही एक इतिहास झाला. ' नितु वेडस् चिंपू ' ; एस्सेमेस आला कुठे ?
Taxonomy upgrade extras