Skip to main content

विरंगुळा

अंत... भाग- ४

लेखक दशानन यांनी सोमवार, 22/06/2009 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
तोच रुम च्या खिडकीतून गोळ्या चालल्या व काही कळायच्या आत रिंकी जमिनीवर पडली व मी स्वतःला वाचवण्यासाठी... बेडच्या खाली जाण्यासाठी उठलो तोच डाव्या हातातून प्रचंड कळ आली व मी मटकन खाली पडलो... साठे आत दरवाजा जवळ जवळ तोडत आत येताना दिसले व माझ्या मागील खिडकीवर ते अंधाधुंद फायरिंग करु लागले... मी हळू हळू बेशुध्द पडलो.... मागील भाग - ३ ******************* काय झालं अचानक कुणाला काहीच कळले नाही, त्यानीं हल्ला का केला ? कुणावर केला.. माझ्यावर की रिंकीवर ? गोळ्या झाडल्या गेल्या... दोन जिवंत माणसं रक्ताच्या थारोळ्यात पडलेली..

जमा - खर्च !

लेखक संदीप चित्रे यांनी शनिवार, 20/06/2009 00:43 या दिवशी प्रकाशित केले.
काय म्हणावं गणिताला? तऱ्हेवाईकच वागण्याला मोजून दुखल्या बोटांना जमा-खर्च ना जुळण्याला ….१ काय जमा? खर्च सगळा वजाबाकीचा हिशोब हा जरा साठवू धन म्हणता पाय फुटती पैशाला ….२ थेंबे थेंबे तळे साचवा ऐका रे हा सल्ला ऐका (काय करावं जिथे पाणी तयार नाही थांबायला !) ….३ उलटा अनुभव वजन घटवता काय सोसशी बा मना ! सांभाळावे जरी जिभेला हवा फुगवते शरीराला ….४ धावा किंवा खूप चाला फरक कुठचा पडायला ? वजनकाटा आहे बसला इथे नुसता खिजवायला ….५ काय म्हणावं गणिताला? आकड्यांच्या गोंधळाला कष्ट पैसा जमवायला कष्ट वजन घटवायला ….
Taxonomy upgrade extras

प्रोफेसरांचा लेख आणि माझी लेट प्रतिक्रिया

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 18/06/2009 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
"जेणूं काम तेणूंच थाय बीजा करे तो गोता खाय" (मंडळी,हे आमचे नेहमीचे प्रो.देसाई नव्हेत.) मला आठवतं तो १९४० चा काळ होता मी सात वर्षाचा होतो. त्या दिवसात मराठीत बिगरी,पहिली,दुसरी, तिसरी आणि चौथी झाल्यावर, इंग्रजी १ली ते ७वी म्हणजे मॅट्रिकची परिक्षा म्हणजेच आता १२वीतून कॉलेजात जातो तसं होतं.

ती व तो - लफडा अनलिमिटेड -भाग -१

लेखक दशानन यांनी बुधवार, 17/06/2009 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कोण आपलं वाटेल व कधी कोणी आपल्या मनातील अंधा-या जागे मध्ये ज्योत घेऊन येईल हे समजणे खुपच अवघड... प्रेमाची रुपेच निराळी.. प्रत्येक नजरेने वेगळी दिसणारी... प्रेमाची अवस्थाच निराळी, प्रेम कुठे व कसे भेटेल हे त्या कामदेवाला देखील माहीत नसावे.. तो मोका साधतो व तीर चालवतो.. नजरेला नजर भिडते व प्रेम होते... ही सर्वमान्य अवस्था.. पण जगात सर्व काही एवढं सोपं नसत की दोन ओळी मध्ये कथा समाप्त... खुप संघर्ष असतो.. काही युध्द लढावी लागतात मनाशी... जनाशी.. तेव्हा कुठे यशस्वी प्रेम भेटतं.. अशीच एक छोटी कहानी... त्या दोघांची !

शहरात लागलेली वाट

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 17/06/2009 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
धन्याशेठची 'शहरात धावणारी रानवाट' ही वेगळीच कविता वाचली, आवडली. आता वेगळं काही वाचलं, आवडलं किंवा नाही आवडलं तरी आमचं चक्र चालू होतंच त्याप्रमाणे ते झालं!

रंग-रंगिले छैल-छबिले!!

लेखक भाग्यश्री यांनी बुधवार, 17/06/2009 01:53 या दिवशी प्रकाशित केले.
मला व्यसन लागलंय लिहायचे.. कुठेही गेले फिरायला की डोक्यात संवाद सुरू .. अरे हे मस्त ठिकाण आहे.. लिहीता येईल याच्यावर..फोटोज काढले की हा चांगलाय.. असला मॅक्रो कोणीच काढला नसेल.. टाकूया उद्या ब्लॉग/मायबोली/मिपावर वगैरेवर.. किंवा चक्क जोक झाला तरी मला तो पटकन ब्लॉगवर टाकावासा वाटतो.. तसं प्रत्येक वेळेला करता येत नाही, आणि होत नाही तेच बरं.. नाहीतर प्रत्येक महीन्याची मे सारखी परिस्थिती व्हायची!पण काल हाईट झाली! म्हणजे खरंच हाईट.. मला मानसोपचारतद्न्याकडे जावं लागेल..

अगं अगं बशी..! - (अंतिम)

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 16/06/2009 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्रीणींचं नशिब चांगलं .. त्यांच्यामुळे मला बस मिळायची. मी एकटी मैत्रीणींशिवाय उभी असले स्टॉपवर तर आजूबाजूच्या लोकांना माझ्यामुळे बस मिळायची नाही. आमचं वाकडंच ना!! म्हणजेच काय.. तर आम्हा दोन समांतर रेषांना जोडणारी तिसरी रेषा कंपल्सरी हवीच!! *** *** *** *** *** *** एकदा कोणीतरी सांगत होतं की, एका मुजोर कंडेक्टरने कुठल्यातरी स्टॉपवर बस खूप वेळ थांबवून ठेवली . लवकर घंटी मारेना.. त्यामुळे इंजिनियरिंगच्या मुलांनी, ती घंटीची दोरी हळूच सोडवून, पुढे पुढे सरकवत ती ओवलेली घंटी बसच्या बाहेर फेकून दिली.

अगं अगं बशी..! - १

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 16/06/2009 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वसाधारणपणे पब्लिक ट्रान्स्पोर्ट.. म्हणजे सार्वजनिक वाहतूकीची साधने कोणती ?? असा प्रश्न जेव्हा शाळेमध्ये विचारला जायचा तेव्हा अगदी न चुकता बस, टांगा, रिक्षा .. अशी यादी असायची. कारण मी शाळेत होते तेव्हा सिक्ससीटर, पिग्गि, मिनी बस असले प्रकार नव्हते. तुम्ही श्रीमंत असाल तर रिक्षातून जा.. नाहीतर टांगा, बस आहेच. इचलकरंजी मध्ये तेव्हा डेक्कन पासून एस टी स्टॅण्ड पर्यंत टांग्याची वाहतूक होती. म्हणजे गुरू टॉकि़ज पर्यंत १ रूपया आणि एस टी स्टँड पर्यंत १.५० रूपया. घोड्याच्या मागे असलेल्या टांग्यात बसायला खूप आवडायचं.