विरंगुळा
रूपक
3
उगाच रात्रीचा …दिवस ..वगैरे, करून…
खच्च बावळटपणा खरं तर. म्हणजे वाईट झोप आलीये पण उग्गीच स्क्रीन समोर, रोजचंच झालंय च्यायला. मध्ये तरूण ला विचारले की २० एम एल ब्रॅंडी चढेल का ? तर म्हणाला की “चढेल, if you act!” म्हणुन आज १००+ एम. एल. घेतोय बाकी घसा दुखत होता म्हणून सुरु केलेली, ग्लासात पाण्यापेक्षा ब्रॅंडी जास्त अस्सेपर्यंत पोचलोय. मला खरच चढत नसावी, किंवा ऍज दे से … आय ऍम अ टॅंक… टॅंक.
लिहायला बसलोय खरं पण काही डोक्यात नाहीये, लेखाचे नाव काय द्यावे त्यापासून ..काय लिहू ..कशाबद्दल कोणाबद्दल लिहू.. चिडचिड…नुसती.. पण…..
काळा राजहंस, गोरा मोर आणि इतर
काल आम्ही एका जवळच्या प्राणिसंग्रहालयात गेलो होतो. "साउथविक्ज झू" असे त्याचे नाव आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे न्यु इंग्लंड (अमेरिकेतील उत्त्तरपूर्व भागातील ६ राज्ये) मधील हे सगळ्यात मोठे प्राणिसंग्रहालय आहे. खरे खोटे माहीत नाही. पण त्यात काढलेली काही छायाचित्रे येथे दाखवत आहे. मी काही छायाचित्रकार म्हणून तज्ञ नाही पण एखादे आवडणारे दृश्य तात्काळ टिपायचा प्रयत्न करतो. हा त्याचाच भाग आहे. फक्त वरील शिर्षकाच्या अनुक्रमाने हे फोटो नाहीत...
तर हा खालील २-३ छायाचित्रे आहेत ती चिडलेल्या सिंह आणि सिंहीणीची. एका चित्रात ती केवळ जाळीच्या मागे दिसेल ज्यात ती उठण्याच्या पोज मधे आहे (खाउ की गिळू).
लडखडगीत
ॐकारचे 'गडबडगीत' आवडले. म्हटलं निवडणुकी दरम्यान भरपूर कार्य केलेल्यांचा 'श्रमपरिहार' सुरु असेल तर काय गाणं म्हणतील बरं? ;)
डोला डोला डोला, डोला डोला डोला
ताडी प्या की, कशाला हवी टकीला?
डोला डोला डोला, डोला डोला डोला
चकण्याला चार उकडी अंडी सोला?
डोला डोला डोला, डोला डोला डोला
खिसा कधी कापला, हात कुठे गेला?
डोला डोला डोला, डोला डोला डोला
ओबेरॉय, ताज, झमझम(?), गुत्त्याला
डोला डोला डोला, डोला डोला डोला
कोण देई रोख, कोण उधार बोला?
चतुरंग
गडबडगीत
बोला बोला बोला, बोला बोला बोला
नीरा प्या की, कशाला हवा कोका कोला?
बोला बोला बोला, बोला बोला बोला
सत्काराला चालेल का नारळ असोला?
बोला बोला बोला, बोला बोला बोला
खिसा कसा गरम, हात कसा ओला?
बोला बोला बोला, बोला बोला बोला
बुलढाणा, परभणी, रायगड(?), अकोला
बोला बोला बोला, बोला बोला बोला
कोण देई टक्का, कोण ढुंगणटोला?
Taxonomy upgrade extras
(काळजी)
आंतरजालावर भटकताना आपल्या आनंदयात्री साहेबांची 'काळजी' ही सुरेख गजल वाचली आणि दूरदर्शनवरचे गाण्याचे कार्यक्रम ऐकताना मला समस्त प्रेक्षकांची वाटणारी काळजी अचानक आठवली! ;)
गायचा आहे तुला का राग हा चंपाकळी
त्या बिचार्या तबलजीचा जायचा आहे बळी!
जीवघेण्या गायकांना ऐकणे नव्हते नवे
हाय!
(Bore-kuting हा माझा छंद आहे)
आमची प्रेरणा
चारोळ्या पाडणे हा माझा छंद आहे
बरेच दिवस झाले
मला प्रतिसाद येणं बंद आहे
तरीही मी चारोळ्या पाडतच असतो
सर्वाना ती वाचण्याची बळजबरी करत असतो
पण त्या कंपुबाजांना साधा प्रतिसादही देता येत नाही
लिहिणार्यालाही प्रोत्साहन मिळावं असं कधीच वाटत नाही
म्हणून काय झाले
मी खच पाडतच जाणार आहे
कारण चारोळ्या पाडणे हा माझा छ॑द आहे ;)
कृ. ह. घ्या.
मराठमोळं मन
Taxonomy upgrade extras
orkuting हा माझा छ॑द आहे
orkuting हा माझा छ॑द आहे
बरेच दिवस झाले
मला scraps येण॑ ब॑द आहे
तरीही मी सर्वा॑ना scraps करतच असतो
scraps वाचण्याचा आन॑द मिळू देत असतो
पण त्या॑ना साधा reply ही देता येत नाही
पाठवणार्यालाही आन॑द मिळावा अस॑ कधीच वाटत नाही
म्हणून काय झाले
मी scraps पाठवतच जाणार आहे
कारण orkuting हा माझा छ॑द आहे
Taxonomy upgrade extras
मिसळपाव