Skip to main content

मॅरेज लाईफ.....३

लेखक मस्त कलंदर यांनी मंगळवार, 11/08/2009 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
परा कधी हो म्हणाला ते त्यालाही कळलं नाही... आता निखिलने एक कोरा कागद काढला. आणि पराला समजाऊन सांगु लागला. हा क्लीनिंग कूकिंग विथ सप्तपदीलेस मॅरेजचा कोर्स अटेंड करायचा... कोर्स सोबत क्लीनिंग एजंट किट आणि कूकिंग टीप्सचे पुस्तक मिळेल.. बदल्यात या प्रोग्रामचे प्रोमोशनल राईट्स मिळणार. आपण काही करायचे नाही फक्त लोकाना अशा सेमिनार ला घेऊन यायचे. आपल्या ओळखी मुळे एक नवीन नोंदणी झाली की काही टक्के कमिशनचे मिळणार होते. असे करून मी एकूण १० नोंदणी झाल्या तर आपण आपल्या गुंतवणूकीतून मोकळे होऊ. सगळॅ ट्रेनिंग जवळ जवळ फुकटात पडणार होते... किती सोप्पंय हे... लग्न ठरण्याची शक्यताही वाढेल...

मॅरेज लाईफ.....२

लेखक मस्त कलंदर यांनी सोमवार, 10/08/2009 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
भाग - १ कलंदरनी फर्ड्या इंग्रजीत आधी लग्न हे मानवी जीवनास किती आवश्यक आहे ते सांगितले... मग यशस्वी.. बिना कटकटीच्या लग्नाची महती सांगितली... लग्न म्हणजे फक्त दोन मनांचे मीलन नाहीतर सहजीवनही कसे असते.. आधी घरकाम करणे हा स्त्रियांचा प्रांत समजला जात असे.. आजकालच्या मुलींना साधा चहा पण करता येत नाही... पण चहा कसा करता येत नाहीत यावर कविता करता येतात.., स्वयंपाक येतो म्हणतात..

मॅरेज लाईफ.....१

लेखक मस्त कलंदर यांनी रविवार, 09/08/2009 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
हॅलो, वेळ आहे का रे या रविवारी?? का रे? अरे आपल्याला एका काम आहे मुंबईत!! मला तुझी मदत लागेल... रविवारी..... ?? बघतो.. बघु नकोस मी वाट पाहतोय. नि तू इकडे येतोहेस हे नक्की. आता हे लक्षात ठेऊन तू बाकीचं प्लॅनिंग कर. अरे पण काय आहे ते सांग ना.. ते नंतर सांगतो सविस्तर बोलू ना आपण.... तरी पण... फोनपेक्षा सविस्तर भेटून बोलू..... पराला निखिलचा अचानक फोन आला आणि मुंबईला का बोलावतोय ते तो सांगायला तयार नव्हता.... काही विचारले तर तू फक्त ये इकडे असं म्हणत होता.. शनिवारी संध्याकाळी निखिलने पराला पुन्हा फोन केला.. उद्या निघतोयस ना पाचच्या बस ने? पाच??? अरे तेव्हा तर माझी मध्यरात्र होते..!!!

ठाणे मिपा कटटा १ ऑगस्ट ०९ व्रुत्तांत...(सविस्तर)........

लेखक समंजस यांनी शुक्रवार, 07/08/2009 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
ठाणे मिपा कटटा १ ऑगस्ट ०९ व्रुत्तांत...(सविस्तर)........ (वि. सु.): १. लिखाणाचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. काहि चुका झाल्या असतीलच. तरी कृपया क्षमा करावे. २. संपादकांना ह्या लिखाणात कोठलाहि भाग वगळने किंवा संपादन करणे आवश्यक वाटल्यास तसे जरुर करावे. ------------------------------------------------------------------------------------------- मिपा चा मी नियमीत वाचक. साधारण ५-६ महिन्यांपासून. मिपा हे पहिलेच मराठी संकेत स्थळ जे माझ्या बघण्यात/वाचन्यात आले. मिपा चा शोध कसा लागला या मागे एक रुचकर कारण आहे.

शामी कबाब!!!

लेखक पिवळा डांबिस यांनी गुरुवार, 06/08/2009 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
"ट्रिंग, ट्रींग...", बरोब्बर सव्वापाच वाजता त्याचा फोन वाजला.... त्याने बरोब्बर ओळखलं की हा तिचा फोन! गेल्या वीस वर्षांचा पायंडा!!! ऑफिसमधून घरी परतण्यापूर्वी हा तिचा ठरलेला फोन.... "हॅलो", त्याने फोन उचलला..... "हे बघ, आता मी घरी जायला निघतेय १०-१५ मिनिटांत", तिचा हुकमी आवाज "ओके, मी पण तितक्यातच निघतोय. काय आणायचंय का? आज काय करायचंय?", त्याची नेहमीची चौकशी... इतक्या वर्षांची ठरलेली सवय! तिने थेट घरी जायचं आणि त्याने जे काही आणायचं असेल ते घेऊन मग घरी यायचं!!!! "नाही, काही आणायचं नाही आज!

राखी : देवस्थळी ते सावंत!

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 05/08/2009 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
rakhi राखीपौर्णिमेचं लहानपणापासूनच कधीही फारसं अप्रूप नव्हतं. एकतर मला सख्खी बहीण नाही. त्यामुळे तिच्याकडून राखी बांधून घेण्याची क्रेझ नव्हती. मामेबहिणी कधीतरी असायच्या रत्नागिरीत. तेव्हा राखीबंधनाचा सोहळा व्हायचा. पण ती राखी नैसर्गिक न वाटता, "बंधन'च वाटायचं. शेजारची स्वरूपा लहानपणापासून राखी बांधायची. आजही बांधते.

एक समृद्ध राग ... राग कंबलबहार.. त्यातलं एक परिपूर्ण गीत

लेखक भडकमकर मास्तर यांनी बुधवार, 05/08/2009 01:43 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा आशा भोसले,एस पी बालसुब्रमण्यम आणि बप्पी लाहिरी एकत्र येतात तेव्हा एक अफ़लातून गीत जन्माला येतं. फ़र्स्ट लव लेटर या सिनेमातलं हे गाणं.