Skip to main content

विरंगुळा

वाट बघतोय रिक्षावाला

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 06/08/2010 07:00 या दिवशी प्रकाशित केले.
शालिमारे का भौ? चला सिबीएस, शालिमार... लगेच निघेल... शालिमार? चला बसा... शालिमार... शालिमार... ए संत्या आवाज दे ना भाडखावू? लायनीत उगाच गप उभा का राहतो? सालं पट्टा मारतो अन धंदा ओरडायची लाज वाटते का मग? ओ भाई, आवाज कमी. हे काय सकाळपासून ३ ट्रिपा मारल्या पट्यावर. एक नाशिकरोडचं भाडं होतं म्हणून गेलो अन आपली आज दिवसभराची लेवल झाली. आजचं भाडं सुटलं म्हणून निवांत आहे. तुमी मारा पट्टे. मी पुडी घेवून येतो. सकाळपासून खाल्ली नाही. तुमाला कोणती आणू? विमल? विमल नको बाबा. हिरा आण. लई लागतो डेंजर. हे घे पैसे. आख्खी १० ची माळ आन. आणतो. तुमी भाडं गोळा करा तवर.

दारी उभा गे साजण

लेखक मितान यांनी गुरुवार, 05/08/2010 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
तो: एक विचारु ? ती: ह्म्म.. विचार की.. तो: तिच्या गावी जातोय तर एकदा भेटेन म्हणतोय.. ती:( कातर,व्याकूळ झालेले डोळे लपविण्यासाठी मान फिरवून ) बघ. म्हणजे ठरव तूच ! तो: एकदा भेटूनच येतो. ती: परवा सकाळी येशील नं घरी? तो: हो. तो जातो. ही सैरभैर. ही भेटण्याआधी ती याच्या आयुष्यात होती. लाटेसोबत आलेल्या शिंपलीसारखी. दुसर्‍या लाटेबरोबर निघूनही गेली....हिला त्या जखमा दिसल्या तेव्हा दातओठ खाऊन जिवाच्या कराराने त्या पुसण्यासाठी किती झगडली ! आणि आज पुन्हा तो म्हणतोय............ रात्रभर कूस बदलत आभाळातल्या चांदण्या मनात टोचवून घेत राहिली. चांदण्याही मग हक्काने टोचत राहिल्या.

धरलं तर चावतय ...

लेखक शुचि यांनी गुरुवार, 05/08/2010 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
दोनदा चिरपरिचीत बेल वाजली आणि मी ओळखलं सुलु आली आहे. हसत हसत दरवाजा उघडला. सुलुच होती. पण नेहेमीसारखी हसरी आणि खळकर मूड्मधे नव्हती. आज जरा फुगा होता. मी विचारलं "काय ग? अशी काय दिसते आहेस?" "पाणी दे मग सगळं सांगते." - सुलु मी फ्रीजमधलं थंड पाणी दिलं. सुलु नी घटाघटा प्याल आणि पहीलं वाक्य बोलली ते हे की " शुचि कधी तुला अनुभव आहे का गं धरलं तर चावतय अन सोडलं तर पळतय चा?" मी हसायला लागले "अगं झालं तरी काय? परवापर्यंत तर बरी होतीस." मला हसताना पाहून सुलुचा पारा अधिकच वर गेला पण तशी ती बॅलन्स्ड आहे , ताबा ठेवून म्हणाली - "शुचि असं बघ तुला एखादी व्यक्ती अतिशय आवडते, म्हणजे खूप म्हणजे फार आवडते.

मौनाची ढाल

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी बुधवार, 04/08/2010 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
मौनाची भाषांतरे करण्यात कितीही मतमतांतरे उद्भवत असली तरी मौनाची ढाल वापरणे कधीही हितकर ठरत असते. काही व्यक्तिंना वारंवार शाब्दिक वार करण्याची मोकाट सवय जडते. तिच्या सान्निध्यात येणारी व्यक्ती ती ते वार झेलून खचून जाते, पिचून जाते. एकतर्फी होणाऱ्‍या या युद्धात हार निश्चितच वार झेलणाराची, हे ठरलेले. परंतु जर मौनाची ढाल पुढे करून वार कर्णपटलावर झेलत राहिल्यास फैरीवर फैरी झाडणारी व्यक्ती जरा संभ्रमित होऊन गप्प होते. तिला वाटते आपण फारच असंबद्ध ओरडत आहोत की काय? समोरून प्रतिसाद मिळाला तरच कोणत्याही कृतीला हुरूप येतो.

फ्रेंडशिप Band (`बंद'!)

लेखक आपला अभिजित यांनी मंगळवार, 03/08/2010 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
"बाबा, आपल्याकडे फ्रेंडशिप बॅंड आहेत?'' शी-शू करायची अक्कल आत्ता आत्ता आलेली आमची साडेपाच वर्षांची चिमुरडी मला विचारत होती. "नाहीत,' असं सांगून मी टाळण्याचा प्रयत्न केला. ""मला उद्या पाच -सहा फ्रेंडशिप बॅंड हवेत!'' तिनं फर्मान सोडलं. ""कशाला गं?'' मी साळसूदपणाचा आव आणला. ""आमच्या वर्गातली मुलं आज एकमेकांना बांधत होती. माझ्याकडे एकही नव्हता. मला उद्या हवा म्हणजे हवा!'' तिनं ठणकावलं. आपला गरीब बिच्चाऱ्या पित्याच्या भूमिकेत शिरून गप्प बसलो. संध्याकाळी आईनं तिला फ्रेंडशिप बॅंड आणून दिले.

माझी मैत्रिण - विभा

लेखक शुचि यांनी सोमवार, 02/08/2010 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
२ स्त्रियांमधे जितकी चांगली मैत्री होऊ शकते तितकी चांगली मैत्री माझ्यात आणि विभावरीत होती असं सेफली म्हणता येईल. टचवुड! याचं मुख्य कारण बहुसंख्य बायकांत आढळ्णारा कॅटीनेस, पेटीनेस, हेवा यांचा आमच्या दोघीतील ढळढळीत अभाव. विभा जितकी परखड आणि सरळ तोंडवर बोलणारी आहे तितकीच मी मेलो आणि पडेल आहे पण ती मनाने अतिशय चांगली आहे. तिला परखड बनायला कारणदेखील आहे. लहानपणी वडील अचानक वारल्यानंतर आईनी कष्ट करून मोठं केलय. पुढे विभानी कॉलेजपासून लहान्मोठ्या नोकर्‍या करून आईला हात्भार लावलाय. वडील नसल्यावर कसे लांडगे पदोपदी भेटतात ते तिलाच माहीत. लहान वयात स्वातन्त्र्य चाखलेले लोक लगेच ओळखू येतात.

हे म्हणजे कै च्या कैच

लेखक Nile यांनी रविवार, 01/08/2010 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही लोकांनी पार वैताग आणला आहे राव. हो तुम्हीच! अरे इथे मिसळपाववर छळता ते पुरे नाही का? सुखाने जगु द्या की एखाद्याला... असे दचकु नका, आज सकाळी उठल्या उठल्या माझ्या मनात आलेले प्रामाणिक विचार वर लिहले आहेत. खरं तर सकाळी उठण्याचे कारणच वरील विचार आहेत, अन तुम्ही दचकला तसेच मला दचकवुन उठवण्यास कारणीभुतही हेच विचार. तर झाले आहे काय, तुम्ही लोक (जसे कोणाही एका मिपा कराला इथे सतत छळता तसेच) मला ही छळत आहात, पण माझ्या स्वप्नात. हसु नका! प्रकरण गंभीर आहे. अहो झोपेचं पार खोबरं झालंय हो. आजचच उदाहरण घ्यायचं तर मला चक्क संपादक मंडळाचा व्यनी आला हो!