Skip to main content

विरंगुळा

मणिकांचन योग आणि माझ्या कर्माचे भोग!

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 12/08/2010 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
गुरूपुष्य, अक्षय तृतीया वगैरे मुहूर्तावर सोने खरेदी करायची असते म्हणे. - मी सर्वपित्री अमावस्येला करतो. ... चतुर्थीच्या दिवशी गणपतीला, नवरात्रात चतुःशृंगीला जायचं असतं म्हणे. - मी संध्याकाळी वेळ असेल तेव्हा पर्यटनासाठी म्हणून जातो. ... संध्याकाळच्या वेळेत तेल, मीठ आणू नये, सोमवारी केस कापू नयेत, म्हणतात. - मी हटकून त्याच दिवशीचा मुहूर्त धरतो. ... बकवास रीतिरिवाज मी पाळत नाही. कुणी तसं सांगितलं तर मी मुद्दाम ते धुडकावण्याची खुमखुमी मला येते. पण अलिकडे का कुणास ठाऊक, (मुलीच्या लग्नाची चिंता सतावायला लागल्यामुळेही असेल कदाचित) सोने खरेदी करून ठेवण्याची खुमखुमी मला आली आहे.

आणि मी सिगरेट सोडली...

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 12/08/2010 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
आणि मी सिगरेट सोडली... सिगरेट सोडून आज वीस वर्षं झाली मला! ओढायला सुरूवात झाली १९६२ साली! मी इंजिनियरिंगच्या दुसर्‍या वर्षात (S.E.) होतो व त्यावेळच्या प्रथेप्रमाणे या वर्षी इंजिनियरिंग कॉलेजच्या सर्व शाखांचे बहुतेक सर्व विद्यार्थी "भारतदर्शन"ला जायचे. म्हणजे कुठले-कुठले कारखाने पाहायच्या निमित्ताने भारतातली मिळतील तितकी प्रे़क्षणीय स्थळे पाहून घ्यायची. उदाहरणार्थ 'स्तूप' पाहण्यासाठी भोपाळमधला किंवा 'ताजमहाल' पाहण्यासाठी आग्र्यामधला कुठला तरी फडतूस कारखाना शोधून काढायचा व ते पाहायचे निमित्त सांगून स्तूप किंवा ताजमहाल पाहून घ्यायचा!

वरंधा घाट

लेखक येडाखुळा यांनी गुरुवार, 12/08/2010 00:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, वरंधा घाट माझा अतिशय आवडता...मागच्या वर्षी पावसाळ्यात शिवथर घळीत समर्थांच्या दर्शनाला गेलो होतो. भोर सोडल्यानंतर जो काही पाऊस सुरू झाला तो पुण्यात घरी परत येईतो चालू होता. पावसाळ्यात वरंधा घाटाचे सौंदर्य काय सांगावं?

पुणेरी शब्दार्थ !!!!

लेखक मनि२७ यांनी बुधवार, 11/08/2010 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एका मित्राकडे हा एक संग्रह होता. त्यातूनच मी देत आहे ...
१. केशव:- साधा सरळ माणूस, नका समोर बघून चालणारा. २.सामान:- त्याची प्रेयसी. ३.काटा काकू:- चांगली दिसणारी, पण वयाने जास्त. ४.खडकी:- एकदम टुकार. ५.झक्कास:- एकदम चांगले. ६. काशी होणे:- गोची होणे. ७. लई वेळा:- नक्की, खात्रीने. ८. चाल हवा येऊ दे:- निघून जा. ९. मस्त रे कांबळे:- छान, शाब्बास. १०.पडीक:- बेकार. ११. मंदार:- मंद बिद्धीचा. १२. चालू:- शहाणा. १३.

पुणेरी विक्षिप्तपणा!

लेखक इंटरनेटस्नेही यांनी बुधवार, 11/08/2010 03:08 या दिवशी प्रकाशित केले.
पुणेरी विक्षिप्तपणा _______________________________________________________ सदर लेख केवळ आपल्या मनोरंजनासाठी, माझा कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही. _______________________________________________________ ही घटना 'मे २००७' मधली, या काळात मी 'चाणक्य मंडल परिवारचा एक अभ्यासक्रम' पूर्ण करण्यासाठी म्हणून पुण्यात सुमारे एक महिना वास्तव्याला होतो. सदाशिव पेठेतील एका विद्यार्थी गृहात मी आणि माझा मित्र राहत असताना आलेला हा एक गंमतीशीर अनुभव.

मिपाकरांची ओळखपरेड ( नव्या-जुन्या सदस्यांची ओळख ) ...

लेखक छोटा डॉन यांनी मंगळवार, 10/08/2010 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो ( आणि मित्रांच्या मैत्रिणींनो ) ! मिसळपावच्या कट्ट्यावर दिवसेंदिवस नवनविन सदस्यांची भर पडते आहे.सर्व नविन सदस्यांचे मिपा परिवारातर्फे स्वागत ! मिपाचे रुपडे पालटले आहे.

गटारी आमुशा

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी सोमवार, 09/08/2010 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
आखाड सरल्याची खूण म्हणजे गटारी आमुशा. अर्थात आषाढ मासाची अंतिम तिथी. खेडोपाडी या आमावस्येला भलतेच महत्त्व असते. श्रावणात मांस-मच्छी-दारू सबकुछ वर्ज्य असल्याने जे काही खायचे प्यायचे ते या शेवटाच्या दिवसापर्यँतच अशी रूढी रुळलेली दिसते. सगळ्यांसाठी दिवस ठरवून दिलेत. मातृदिन, पितृदिन, मैत्रीदिन एवढेच काय स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन अशा कितीतरी दिवसांची दिनदिन दिवाळी वर्षभर सुरु असते. मग आपलाही एखादा हक्काचा दिवस का नसावा? अशी शंका घेऊन समस्त देवदासांनी एकत्र येऊन ही गटारी आमुशाची योजना उचलून धरली असावी. आणि नित्यनेमाने ते ती पाळत आले असावेत.