Skip to main content

विरंगुळा

जर्रा खाजवा की

लेखक अनाम यांनी बुधवार, 25/08/2010 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
चला मंडळी डोक खाजवा जरा ;) आणि '?' च्या जागी योग्य आकडा लावा बर :) एकदम सोप्प हाय.

आकडा लावा :

;)
१५ १२
२८ २०
४५ ३०
६६ ४२
? ५६

मदतीचा हात

लेखक अरुंधती यांनी बुधवार, 25/08/2010 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
आज मी अचानक लक्ष्मीकडे जायचे ठरविले. खूप दिवसात तिच्या हातचे रुचकर पदार्थ खाल्ले नव्हते, तिच्याशी निवांत गप्पा मारल्या नव्हत्या की तिच्या घरातील देवघरातून येणारा मंदसा चंदन, कापूर, धूप - अगरबत्ती व सुवासिक फुलांचा दरवळ श्वासांत भरून घेतला नव्हता. लक्ष्मी म्हणजे माझी वयाने माझ्यापेक्षा बरीच मोठी असणारी, पण अतिशय बोलघेवडी, माणूसवेडी, अगत्यशील दाक्षिणात्य मैत्रीण! आमची मैत्री खूप जुनी असल्यामुळे तेवढीच अनौपचारिक!

बिजापूर ते सोलपूर बस प्रवास....

लेखक किल्लेदार यांनी मंगळवार, 24/08/2010 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वीकेंडला "दार-उल्-सल्तनत" बिजापूर ला जायचा योग आला. त्याचे फोटोज टाकीन तेव्हा टाकीन पण परतीच्या प्रवासात काही छान (माझ्या मते) फ्रेम्स मिळाल्या. परतीचा प्रवास तसा कण्टाळवाणाच पण या ट्रिप मधे देव माझ्यावर निहायत खूश होता. समोर हिरवा-निळा पट होता.

सफर - किल्ले तोरणा

लेखक येडाखुळा यांनी मंगळवार, 24/08/2010 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो, गेल्या शनिवारी मी किल्ले तोरणा येथे जाऊन आलो. एकदम मस्त ट्रेक झाला माझ्या जुन्या मित्राबरोबर.. तोरण्याची माहिती सर्वांना असेलच तरीही जुजबी ओळख करून देतो. शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी हा गड घेतला. कानद खोर्यातला हा सर्वात उंच किल्ला. ( आणि कदाचित पुणे जिल्ह्यातला सुद्धा..चू.भू.देणे घेणे ) पूर्वी हा किल्ला आदिलशाही अंमलाखाली होता आणि अगदीच दुर्लक्षित अवस्थेत होता. म्हणजे राजांच्या ताब्यात आल्यावरच याचं भाग्य उजळलं असं समजायला काही हरकत नाही. अतिशय उंच आणि बेलाग किल्ला आहे हा.

राखी अमावस्या!

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 23/08/2010 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
राखी पौर्णिमा जवळ आली, की छातीत धडकी भरायचे दिवस आता सरले आहेत. तरीही राखीपौर्णिमेच्या निमित्तानं जुन्या जखमांवरच्या खपल्या निघतात आणि आमचा अश्‍वत्थामा पुन्हा गत आठवणींच्या भोवऱ्यात भिरभिरत राहतो... शाळेच्या आवाराच्या तटबंदीपेक्षा जास्त भक्कम तटबंदी त्या वेळी आमच्या मनांची होती. मुलीकडे पाहणं म्हणजे "शांतम्‌ पापम्‌' म्हणायचे ते दिवस. त्यातून आम्ही रत्नागिरीसारख्या छोट्या शहरातल्या सर्वांत "सुसंस्कृत' शाळेत, सर्वांत हुशार समजल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वर्गातले सहाध्यायी. सर्व जगाच्या संस्कृतीरक्षणाची जबाबदारी आमच्यावरच!

इच्छा

लेखक चिंगुसविकॄतजोशी यांनी रविवार, 22/08/2010 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नांची सोनेरी किरणे कष्टांच्या दवबिंदूवर पडू दे. त्यातून उज्ज्वल यशाचे इंद्रधनु दिसू दे. कल्पनांच्या सागरी लाटावर स्वैरपणे स्वार होवू दे. त्यातून निसर्गाचे अनेक पैलू उलगडू दे. जिज्ञासेच्या पावसात नेहमीचं चिंब भिजून जाऊ दे. मनाच्या उत्तुंग भरारीला अगदी आकाशही कमी पडू दे. असेच काही माझ्या हातून घडुन जाऊ दे. त्या यशाने मायबापांच्या कष्टाचे पांग फेडू दे. अंतर्मनातील सुगंध गुलाबपरी सार्‍या आसमंतात दरवळू दे. ज्योतीप्रमाणे अखंड कार्य करण्याची सुबुद्धी लाभू दे. प्रेमाच्या व माणूसकीच्या प्रकाशाने सारे जग दिपून जाऊ दे. काय मागू तुजजवळ देवा... जे आहे त्यातचं समाधानी असू दे.

गोकाकचा धबधबा

लेखक चालु माणुस यांनी शनिवार, 21/08/2010 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
गोकाक एक निसर्ग रम्य ठीकाण........ मी काढलेले धबधब्याचे काही फोटो देत आहे. हा धबधबा मनाला फारच भुरळ पाड्णारा आहे. येथे july व august महीन्यात भेट द्यावी... धबधबा प्रेमीनी पाहिलाच पाहीजे असा हा गोकाकचा धबधबा..... धबधबा कोसळण्यापुर्वीचा खडकाळ भाग....... धबधब्यावरील झुलता पुल....