फुलांचा राजा
मध्यंतरी उटीला जाण्याचा योग आला. तिथे गेल्यावर प्रमुख आकर्षणात बोटॅनिकल गार्डन आणि रोझ गार्डन अश्या २ बागा बघायला सांगण्यात आले. होटेल पासुन बोटॅनिकल गार्डन जवळ असल्यामुळे प्रथम तिथे मोर्चा वळवला आणि वातावरण असे काही सुरेख होते आणि हिरवळ (म्हणजे गवत फक्त) एव्हढी काही अप्रतिम होती कि २-३ तास तिथेच लोळुन काढले. त्यानंतर मित्रांना रोझ गार्ड्न मध्ये जाण्यात फारसा उत्साह नव्हता. पण तिथे गेल्यानंतर रोझ गार्डन चुकवले असते तर केव्हढ्या मोठ्या आनंदाला मुकलो असतो ते कळाले.
मिसळपाव
जॅमर (पूर्वीचा सदैव भरवाडगे (पूर्वीचा जर्क))