Skip to main content

विरंगुळा

(वर्षाव)

लेखक राजेश घासकडवी यांनी गुरुवार, 19/08/2010 02:15 या दिवशी प्रकाशित केले.
छ्या छ्या, आजकाल बायका दारू पिऊ लागल्या. बीयर, वाईन आणि लिकरमधला फरक तरी कळतो का त्यांना? निदान दारू पिऊन मिपावरती धागे तरी टाकू नयेत. धागे कसले, कॉकटेलमध्ये भिजून ओल्यागिच्च झालेल्या कागदी स्ट्रॉ. आजकाल त्याही मिळत नाहीत. माझ्याकडे एक शेवटची स्ट्रॉ आहे ती टाकून देतो. मग बघतोच उंटाची पाठ कशी मोडत नाही ते. ---------------------------------------------------------------------------------------------- लाहोल बिलाकुवत. तौबा तौबा. या काफरांची ही मिजाज! हे अल्ला परवरदिगार, आता तूच माझं रक्षण कर रे बाबा या रावणी पिठल्यापासून.

सोबत....

लेखक किल्लेदार यांनी गुरुवार, 19/08/2010 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
मला नेहमी वाटतं की मी घरात एकटा नाही. म्हणून काल रात्री फोटो काढून पाहिला................... Bhoot upload copy"

बिच्चूची गोष्ट

लेखक नगरीनिरंजन यांनी बुधवार, 18/08/2010 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
(मनोगतावर पुर्वी प्रकाशित झालेली माझी ही कथा इथे पुनर्प्रकाशित करीत आहे.) बिच्चू सकाळी ठरलेल्या वेळी जागा झाला तेव्हा नेहमीप्रमाणेच त्याच्या आजूबाजूला आई बाबा नव्हते. त्याना नेहमीच मालक-मालकीणबाईंच्या आधी उठावं लागे. जाग आल्याबरोबर बिच्चू छोट्या मालकीणबाईंच्या खोली कडे चालू लागला. किचनमधून जाताना त्याने आईकडे पाहिले तेव्हा ती ब्रेकफास्टची तयारी करत होती. तिने एकदा बिच्चूकडे पाहिले आणि पुन्हा आपल्या कामात गढून गेली. छोटासा बिच्चू तुरुतुरू चालत छोट्या मालकीणबाईंच्या खोलीच्या दाराशी पोचला. त्यांना उठवायची वेळ जवळजवळ झालीच होती.

(चार छोटुल्या)

लेखक सुनील यांनी मंगळवार, 17/08/2010 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
वैभव देशमुख यांच्या चार छोटुल्या हे शीर्षक पाहून आम्हाला ह्या चार छोटुल्यांची आठवण आली. लुईजा मे अल्कॉट यांची ही सुंदर कादंबरी आहे. वडील सैन्यात आणि मेग, जो, बेथ आणि अ‍ॅमी ह्या चार बहिणी आईसमवेत. ह्या सर्वांच्या भावविश्वाची ही कथा. ह्याचाच पुढील भाग गूड वाईव्स ह्या नावाने त्यांनी लिहिला आहे. शांता शेळके यांनी याचा "चौघीजणी" ह्या नावाने अनुवाददेखिल केला आहे. शिवाय, अमोल पालेकर यांनी यावर आधारीत एक मालीका (कच्ची धूप) ह्या नावाने बनवली होती.

आक्रसलेल्या क्रोशाची चित्तरकथा

लेखक अरुंधती यांनी रविवार, 15/08/2010 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
तसे अधून-मधून मला सर्जनशीलतेचे झटके येत असतात. कधी त्यांची परिणिती काव्य-लेख-निबंधांत होते तर कधी एखादी 'अनवट' कलाकृती आकार घेते! येथे 'अनवट' शब्दाचा अर्थ 'जरा हट के' असा आहे हे सुज्ञांनी समजून घ्यावे. चांगल्या मशागत केलेल्या जमिनीत ज्या जोमाने तण उगवते त्याहीपेक्षा अधिक जोमाने माझ्या सुपीक डोक्यातून अनेक हरहुन्नरी विचारांचे पीक निघत असते. मग त्यासाठी एखादीच ठिणगी पुरेशीअसते.... भुस्सदिशी विचारांचा जाळ उमटतो आणि त्याचे पर्यवसान अनोख्या 'कला(? )कृती'मध्ये होते!! अशीच परवा टी. व्ही. चॅनल्समधून दमछाक होईस्तोपर्यंत येरझारा घालताना माझी नजर एका चॅनलवर थबकली.

ये रे माझ्या `माग'ल्या!

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 14/08/2010 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
युवतीहृदयसम्राट, गालखळीचा बादशहा जॉन अब्राहम तसा नेहमीच चर्चेत असतो, पण या वेळची "पार्श्‍वभूमी' जरा वेगळी होती. बातमी अशी होती, की जॉननं दहा कोटी रुपयांचा विमा करण्याचा घाट घातलाय...विमा कशाचा माहितेय? त्याच्या पार्श्‍वभागाचा! हो हो...! `दोस्ताना'मध्ये त्यानं ज्याची झलक दाखवल्यानंतर त्याला त्याची जास्तच काळजी वाटू लागली असावी... कुणी कुणाच्या कुठल्या अवयवाचा विमा करावा, याविषयी आपला आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही, पण ज्या विशिष्ट अवयवाचा त्यानं विमा करायचं ठरवलं, त्यावरून भुवया उंचावल्या जाणं साहजिक होतं.

काही हास्य क्षण..........

लेखक utkarsh shah यांनी शनिवार, 14/08/2010 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नसुन फक्त आस्वाद घेण्यासाठी............ ------------------------------------------------ संतावर मुलीचा विनयभंग केल्याचा खटला चालू होता. वकिलाने संता ला ११४२० रुपये दंड ठोठावला. संता : ११४२० रुपये का? ...वकील : १०००० रुपये विनयभंग केल्याचे, १०.२ % entertainment tax आणि ४% VAT. ---------------------------------------- एका मुलीने coin टाकला आणि वजन केलं - ५८ kg. पिशवी बाजूला ठेवली - ५५ kg.

माझे पोहणे

लेखक शिल्पा ब यांनी शनिवार, 14/08/2010 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
आता यात काय लिहायचे असे वाटेल तुम्हाला...पोहता येत नसेल तर क्लास लावायचा आणि हात पाय मारताना थोडेफार नाका-तोंडात पाणी जाऊन काही काळाने पोहायला जमते.. खरं तर हीच प्रक्रिया आहे...पण... मला आत्तापर्यंत पोहता येत नव्हते...म्हणजे आता येते अशातला भाग नाही पण आताशा मी पाण्याला घाबरून काठावर उभी राहत नाही एवढंच..मला पाण्याची फार्फारच भीती वाटत आलीये...अजूनही वाटते...अंघोळ करताना डोक्यावरून जास्त पाणी घेतलं तरी एकदम धबधब्याखाली आले असं वाटून डोळे उघडून कितीतरी वेळा साबण डोळ्यात गेला असेल...

शिट्टीवादन आणि शिट्टीवादक

लेखक सुधीर काळे यांनी शुक्रवार, 13/08/2010 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
शिट्टीवादन आणि शिट्टीवादक "शिट्टीवादक" (Whistleblower) हा शब्द आणि ही जमात (दोन्ही) नव्याने लोकप्रिय होऊ लागली आहेत. साधारणपणे आपले सरकार किंवा आपली कंपनी जर कांहीं गैर व्यवहार करत असेल तर आपल्याला त्रास होण्याच्या शक्यतेकडे न पहाता सदसद्विवेकबुद्धीने त्याची वाच्यता करणार्‍याला 'शिट्टीवादक' म्हटले जाते. हेतू नेहमी असा उदात्त असतोच असे नाहीं. कधी सूडबुद्धीने, तर कधी पैशासाठीही असे करणारे शिट्टीवादक असतात. सगळ्यात सुप्रसिद्ध सदसद्विवेकी शिट्टीवादक होते 'डीप थ्रोट' या नावाने प्रसिद्ध असलेले आणि त्यावेळी FBI चे सहनिर्देशक असलेले विल्यम मार्क फेल्ट (Sr) हे गृहस्थ.