Skip to main content

विरंगुळा

लगी रहो मुन्नीबाई!

लेखक आपला अभिजित यांनी मंगळवार, 31/08/2010 07:40 या दिवशी प्रकाशित केले.
काळीज विदीर्ण करणारी ती बातमी ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. अंगातील त्राण निघून गेल्यासारखं झालं. गात्रं शिथील झाली. हाडांचा भुगा होऊन त्यांची पावडर हवेत धुक्यासारखी उडायला लागल्याचा भास झाला. धरणीमाता दुभंगून आपल्याला उदरात घेईल तर बरं, असं वाटायला लागलं. तशीच भयाण परिस्थिती निर्माण झाली होती... ... दबंग`मधील `मुन्नी बदनाम हुई` या गाण्यावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी कुण्या नतद्रष्टानं न्यायालयात धाव घेतली होती... देशहितकारक, संस्कृतीरक्षक, समाजोपयोगी कार्य कुणी करायला घेतलं, की त्यात खोडा घालणारे उपटसुंभ रिकामटेकडे अनेक असतात.

बहुगुणी वडे

लेखक यशवंतकुलकर्णी यांनी रविवार, 29/08/2010 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! आज आपण बहुगुणी वडे तयार करून पाहाणार आहोत. ही पाककृती अत्यंत नाजूक आहे. त्यामुळे स्वत:च्या जोखमीवरच या पाककृतीला हात घालावा. ही पाककृती फसल्याने पट्टीच्या खवय्यांनाही बध्दकोष्ट, अजीर्ण, कफ आणि बर्‍याच वेळा वात झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे खाणार्‍यांना उबळ, उलटी, मळमळ, अंगाचा दाह, माथेशूळ उठणे इत्यादी त्रास झाल्यास तात्काळ पाककृती गुंडाळावी आणि काढता पाय घ्यावा - त्यांच्या पचनशक्तीला दोष देऊ नये आणि समजूत काढण्याच्या तर बिलकुल भानगडीत पडू नये.

नक्को नक्को रे!

लेखक अरुंधती यांनी रविवार, 29/08/2010 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
"केतन, नाकात बोटं नको घालू.... " "केतन, तुला कितीदा सांगितलंय, असा पाय हलवायचा नाही म्हणून! कुणाला लागला तर? " "अरे केतन, तिथे उभा नको राहू, कोणीतरी धक्का मारील... " एक गौरांगना बसस्टॉपवर खांद्यावरच्या जाडजूड ओझ्याच्या पिशव्यांना कसेबसे सांभाळत, बसची वाट पाहत दर मिनिटाने तिच्या बोअर झालेल्या चिमुकल्याला हटकत होती. तिच्या चेहऱ्यावरून ती दमल्याचे स्पष्ट दिसत होते. बराच वेळ थांबूनही बस आली नव्हती. आणि सुपुत्र 'केतन' अतिशय बोअर झालेल्या अवस्थेत स्वतःचे मनोरंजन करू जाता त्याला वारंवार हटकण्यात येत होते. खरं तर आपल्या हटकण्याने मुले खरोखरीच त्यांना करावयाच्या गोष्टी थांबवतात का?

माझा बसप्रवास

लेखक पैसा यांनी रविवार, 29/08/2010 01:21 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच्यापैकी जे मुंबईकर असतील, ते म्हणतील, “हॅः बसचा प्रवास ही काय लिहिण्यासारखी गोष्ट आहे? एकदा विरार फास्ट लोकलने जाऊन दाखवा. पुणेकर म्हणतील, “आमची पी.एम. टी. लै भारी. बसमधून सगळ्या हाडांसहित नीट चढून किंवा उतरून दाखवा.” पण माझ्या मित्रांनो, तुम्ही कधीच आमच्या गोवेकर खाजगी बसमध्ये बसले नसणार. मुंबैहून बदली होऊन आलेल्या साहेबलोकांनीसुद्धा शरणागती लिहून दिल्ये की “तुमच्या गोव्याच्या बसमधून प्रवास करणे हे येरागबाळ्याचे काम नोहे.” तुम्हाला थोडी पार्श्वभूमी सांगणं आवश्यक आहे नाही का? कारण असं की, तुम्ही गोव्यात येता, २ दिवसांची टूर करता आणि परत जाता.

संपादकांच्या फुलक्या

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शनिवार, 28/08/2010 08:09 या दिवशी प्रकाशित केले.
संपादकांच्या फुलक्या भाजायचे ठरले तर टोपलंभरुन तरी हमखास जमतील. त्या टम्म फुगलेल्या फुलक्या मार्मिक टिचकी मारून फोडल्या की पचायला हलक्या होतील व त्या खाल्ल्यानंतर मस्त मेजवानीच्या डुलक्याही लागतील... त्यावेळी आम्ही लेखन क्षेत्रातले उमेद्वार होतो. अजूनही आहोतच, परंतु तेव्हा फारच नवखे होतो. पेपर चाळायचे, 'निवेदने' कॉलम भरारा वाचायचा, पटतील ते विषय पत्त्यांसह उतरवून घ्यायचे. अन् कागद पेन घेऊन लेखनसमाधी लावून घ्यायची. एकेका लेखासाठी चार पाच खर्डे होत. शेवटी हे लिहू की ते करता करता सगळेच उतरुन पाठवून द्यायचो. काय जे लागेल ते त्यांनीच वेचावे असा हवाला टाकून लेख प्रकाशित होण्याची वाट पहात रहायचं.

तू तर नागीण!

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शुक्रवार, 27/08/2010 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
"तू तर एक जातिवंत नागीण निघालीस. मला तुझा सर्पस्वभाव नव्याने कळला.. काल तुझी माझी भेट झाली, कदाचित शेवटचीच. या आधीही आपण भेटलोच की. पण कालची भेट बहुदा अखेरचीच ठरणार होती तर.. तत्पूर्वी व्हायचं असं की, तू माझ्या अंगणात यायचीस. मनमोहकशा सळसळत्या मदमस्त चालीत. कधी अवचित, तर कधी ठरवून. त्या तुझ्या नव्या नव्हाळीच्या सावळ्या रुपावर, मनोवेधक गोड शब्दांनी लपलपणाऱ्‍या जिव्हेच्या करामतीवर मी पटकन भाळलो. तुझी आकर्षक बांधणी, मुळचीच तंग धाटणी अन् अंगाची आकर्षक वेढणी मला वेडावून जायची. वाटायचं चला आपणही आता कात टाकावी, तुझ्या निकट जावं, सळसळावं, खेळावं.

संपादकांच्या कथा आणि व्यथा

लेखक राजेश घासकडवी यांनी शुक्रवार, 27/08/2010 08:18 या दिवशी प्रकाशित केले.
(डिस्क्लेमर : मुळात या शीर्षकाचा लेख लिहावा ही कल्पना मिभोंनी आमच्या डोक्यात भरवून दिली त्यामुळे या सगळ्या भानगडीत मुख्य दोष त्यांचा आहे. मी फक्त लिहिण्याचं काम केलं. तसंच हे लेखन हलक्या फुलक्या, खेळीमेळीच्या वातावरणात घ्यावं ही नम्र विनंती. पुन्हा, माथी भडकलीच तर मिभो जबाबदार हे लक्षात असू द्या.) Be not afraid of greatness; some are born great, some achieve greatness, and others have greatness thrust upon them. शेक्सपिअरची थोरवी अशी की गेली चारशे वर्षं त्याचं थोरवीविषयीचं हे विधान अजून टिकून आहे. थोरवी कशी का मिळालेली असेना, थोर लोक नेहेमीच जगासमोर असतात. जग त्यांचा उदोउदो करतं.

(जर्रा खाजवा की)

लेखक सुनील यांनी बुधवार, 25/08/2010 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचं काय आहे मंडळी, आम्हाला प्यायची लै म्हंजी लैच खाज! आता प्यायची खाज आली की, आम्ही कुठलासा दोस्त पकडतो आणि थेट एखादा बार गाठतो. आता अशेच एकदा एका बारमध्ये बसलो असता आमच्या पाठीला लै खाज सुटली! मित्राला म्हटलं, "आता काय करावं?" तो म्हणाला, "मी खाजवू?" मी दचकून ओरडलो, "नक्को...." नुकताच "दोस्ताना" रिलीज झाला होता!!! बरं, तो बार काही साधासुधा नव्हता! तो होता लेडीज बार. सगळ्या वेट्रेस!! मित्राला हळूच विचारलं, "त्यांच्यापैकी कुणाला सांगू?" तो उचकला, "अरे, येडा हाये का?अरे, आपण त्यांच्या पाठीला साबण चोळायचा असतो.