मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काही हास्य क्षण..........

utkarsh shah · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नसुन फक्त आस्वाद घेण्यासाठी............ ------------------------------------------------ संतावर मुलीचा विनयभंग केल्याचा खटला चालू होता. वकिलाने संता ला ११४२० रुपये दंड ठोठावला. संता : ११४२० रुपये का? ...वकील : १०००० रुपये विनयभंग केल्याचे, १०.२ % entertainment tax आणि ४% VAT. ---------------------------------------- एका मुलीने coin टाकला आणि वजन केलं - ५८ kg. पिशवी बाजूला ठेवली - ५५ kg. चप्पल काढले आणि वजन केलं - ५० kg. ... ओढणी काढून बाजूला ठेवली - ४७ kg. एवढ्यात तिचे coin संपले. फलाटावरचा भिकारी बोलला. तू चालू ठेव, मी coin टाकतो. ---------------------------------------- जगातील सर्वात लहान पुस्तक फक्त १ पानाच आहे. ज्यात लिहिलंय 'सर्वकाही' आणि पुस्तकच नाव आहे ... 'स्त्रियांना काय हव असत?' ----------------------------------------- माणसाला काय हव असत? स्त्री, जी चांगला स्वैपाक करेल. स्त्री, जी चांगला पैसा कमावेल. ... स्त्री, जी त्याच्यावर भरपूर प्रेम करेल. आणि अस काही कि ज्या मुळे ह्या स्त्रिया एकमेकीना कधीच भेटणार नाहीत. ----------------------------------------- संता दारू पीत पीत रडत होता. बंता : का रडतो आहेस? संता : अरे जिला मी विसरायचा प्रयत्न करतोय तीच नावच आठवत नाहीये. ----------------------------------------- कुत्रे लग्न का नाही करत? ? ? ... ? ? कारण ते आधीच कुत्र्याच आयुष जगत असतात. ----------------------------------------- एका निर्जन ठिकाणी मंग्या त्याच्या आयटम बरोबर गाडीच्या पाठीमागे रंगात आला होता. आयटम : कोणी आल तर काय सांगायचं. ...मंग्या : सांगू गाडी चा टायर चेक करतोय. बरयाच वेळा नंतर तिथे पोलिसांची गाडी आली. पोलीस : काय रे, काय चाललंय काय? मंग्या : गाडीचा टायर खराब झालाय तो चेक करत होतो. पोलीस : गाडीचा ब्रेक पण चेक करून घे, गाडी गेली कधीच उतारावरून खाली ----------------------------------------- शेजारची चिंगी फणकारत पक्क्याच्या आईला म्हणाली, तुमच्या पक्क्या ला समजवा, मला डोळा मारला त्याने. पक्क्याची आई : मुर्खा, हे संस्कार केले आम्ही तुझ्यावर. ...पक्क्या : अग आई मी फक्त smile देणार होतो पण आधी shift key दाबायची राहिली म्हणून डोळा मारला गेला. (chat code varun suchalela joke ahe.) ---------------------------------------- नवरा बायको मध्ये कडाक्याच भांडण झाल. नवरा तावातावाने निघून गेला. नवरा (रात्री फोन वर) : जेवायला काय आहे? बायको (रागाच्या भरात) : विष ... नवरा (शांतपणे) : तू खाऊन घे, मला उशीर होईल. ---------------------------------------------- मुलगा : काल पप्पांच्या केबिन मधून ohh god!! ohh god!! अस ऐकायला येत होत. आई : होय, तुझे बाबा खूप धार्मिक वृत्तीचे आहे बाळा. मुलगा : नाही नाही, बाबा तर गप्प होते, त्याची personal assistant बोलत होती. ------------------------------------------------------------ पती : आपल्या बिल्डींग मधला राजू काय काय बडबडत होता.. पत्नी : काय म्हणत होता ? पती : तो म्हणत होता. आपल्या बिल्डींगमधील एक बाई सोडून सगळ्या बायकांशी त्याच लफड आहे म्हणून. कोण असेल ती एक बाई ? पत्नी : देशपांडे आजी असतील. ------------------------------------------------------------- मेलेल्या दोन माणसांची वरती भेट होते. पहिला : कशाने मेलास? दुसरा : मी प्रचंड थंडीने...आणि तू कशाने मेलास? पहिला : एकदा रात्री मी अचानक घरी आलो तर घरात मला बायको सोबत कोणीतरी माणुस असल्याचा भास झाला. मी घरभर त्याला शोधला पण तो सापडला नाही त्या धक्याने मी ... मेलो. दुसरा : अरे रे फ्रिज उघडला असतास तर आपण दोघेही वाचलो असतो. ----------------------------------------------------- लालू एकदा एका management school मध्ये lecture देण्यासाठी गेला, पण त्याच तोडक मोडक रटाळ इंग्लिश ऐकायला कोणच तयार नव्हतं, आता यांना इंग्लिशमध्ये वर्गाबाहेर जा हे कस सांगायचं हा लालूला प्रश्न पडला, शेवटी त्याने शक्कल लढवली, तो वर्गाबाहेर जात मुलांना म्हणाला 'follow me' आणि सगळे बाहेर आल्यावर वर्गात गेला आणि म्हणाल...ा 'dont follow me'. ------------------------------------------------------- झंप्या आणि चम्प्या पहिल्यांदाच अमेरिकेत जातात, खूप नाव ऐकलं असल्यामुळे ते हॉटडॉग खायला जातात विकत घेतल्यावर, झंप्या हॉटडॉग उघडून पाहतो आणि हिरमसून लाजत चम्प्या ला विचारतो .........काय रे तुला कुत्र्याचा कोणता अवयव आला ? --------------------------------------------------------- कॉलेजचा पहिला दिवस, कॉलेजच्या कट्ट्यावरील काही टपोरी मुले चिंगीला अडवतात. पहीला मुलगा : काय ग तुजे नाव काय आहे? चिंगी : मला सर्वजण ताई बोलतात. दुसरा मुलगा : कमाल आहे !!! काय योगा-योग आहे .. मला सर्वजण भाऊजी बोलतात.. ----------------------------------------------------------- एका गावात वाघाने उच्छाद मांडला होता, त्याचा बंदोबस्त करण्यासाठी शिकारयाला बोलावण्यात आल. शिकारी : आज रात्रीच मी त्या वाघाचा बंदोबस्त करतो, मला गाईच कातड आणून द्या, ते पांघरून जंगलात जातो, गाय आहे समजून वाघ धावून येईल मग मी त्याला ठार करतो. मध्यरात्रीनंतर शिकारी गावात धावत आला, अंगावरच कातड फाटलं होत, गावकरी : मारला? वाघ... मारला? शिकारी : वाघ राहू द्या, आधी हे सांगा जंगलात बैल कोणी सोडला होता? ------------------------------------------------------------------ गटारी निमित्त एक मराठी माणूस आपल्या एका गुजराथी आणि मारवाडी मित्रा बरोबर, बियर प्यायला जातो, तिघही चीयर्स करून ग्लास तोंडाला लावणार एवढ्यात तिघांच्या ग्लास मध्ये माशी पडते. मराठी माणूस, बियर ओतून देतो आणि दुसरी मागवतो, गुजराथी माणूस माशी काढून ...फेकतो आणि बियर प्यायला सुरु करतो, जस काय माशी पडलीच नव्हती, मारवाडी माणूस चिमटीत माशी पकडतो, ग्लासावर धरतो आणि म्हणतो, 'चल पटकन सु सु कर, खूप बियर प्यायालीस.' ------------------------------------------------------ मंग्या, आयटम बरोबर पार्कात बसला होता, ती काही बोलणार एवढ्यात, आसपास कोण नाही हे पाहून त्याने तीच चुंबन घेतल. मंग्या : सोना, खूप गोड आहे तुझे ओठ, पण जरा ते तोंडातला चुईगम फेकशील का? मध्ये मध्ये येतंय. आयटम (खोकत) : अरे सोन्या तेच सांगायचा प्रयत्न करत होते, चुईगम नाही आहे ते मला कफ झाला आहे खूप. ------------------------------------------------------------- मुलांच्या वस्तीगृहातील डीन मुलांना म्हणाले : " जो कोणी विद्याथी मुलींच्या वस्तीगृहात जातांना पकडला जाईल... त्याला पहिल्यांदा २०० रुपये दंड आणी दुसर्यांदा पकडला जाईल ३०० रुपये दंड आणी तिसर्यांदा पकडला जाईल त्याला ५०० रुपये दंड भरावा लागले.... बंड्या : सर मग सीझन पास साठी कीती भरावे लागतील.. ----------------------------------------------------- गुरुजी : सोमवार ते शुक्रवार काम आणि शनिवार रविवार सुट्टी ही प्रथा कोणी सुरु केली असेल? मंग्या : द्रौपदीने! ‎(संस्कृती रक्षकांनी कृपया वाचू नये.) -------------------------------------------------------- संता एका मुलीला प्रपोज करतो, ती म्हणते मी लेस्बिअन आहे. संता : म्हणजे काय ? मुलगी : मला फक्त मुलीच आवडतात. संता : अरे वा, मग मी पण लेस्बिअन आहे. मलापण मुलीच आवडतात. --------------------------------------------------------------- शिक्षक : डायनासोर आणि त्याच्या सारख्या दुर्मिळ सजीवाचे काही उदाहरण द्या. बंड्या : एक सरळ साधी सुसंस्कृत मुलगी... शिक्षक : एक सरळ साधी सुसंस्कृत मुलगी... हे कसे शक्य आहे ... बंड्या : सर, आता या आधुनिक जगात ह्या दोन्ही सजीव गोष्टी नामशेष झाल्या आहेत. ( जी सुसंकृत नसेल त्या मुलीलाच ह्या जोक चा राग येईल. ) ----------------------------------------------------------------- दादा कोंडकेंकडे एकदा एका सिनेमाच काम आल जो मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत येणार होता. फक्त नाव सुचत नव्हता. दादा क्षणार्धात बोलले, नाव ठेवा "बदला लुंगी". ---------------------------------------------------------------- मुलगा : (दुकानदारास) काका,डेटॉल साबण आहे? दुकानदार : (नाकातून बोट काढत) हो आहे की. मुलगा : मग आधी त्याने हात स्वच्छ धुवा आणि मला दोन किलो बासमती तांदूळ द्या. ---------------------------------------------------------------- बाबा : चिंगे, मोठी झाल्यावर तू काय करणार आहेस? चिंगी : काही नाही. आई बनेन, शिक्षण घेईन, लग्न करीन. आणखी काय करणार? बाबा : योजना चांगल्या आहेत तुझ्या बेटा. फक्त जे काही करशील ते योग्य क्रमाने कर, म्हणजे झालं!!! ---------------------------------------------------------------- एकदा एका फॉरेनरने मसालेदार भारतीय जेवण खाल्ले. दुसरया दिवशी त्याचे पोट बिघडले. टॉयलेटला जावून वैतागलेला फॉरेनर म्हणाला, "आज कळल, इन्डियन लोक पाणी का वापरतात, साला टिशु पेपर तर पेट घेईल." ----------------------------------------------------------------- बंड्या : आजोबा तुम्हाला राम बोलता येते? आजोबा : येते ना! तुला काय वाटले माझे दात पडले म्हणून मला बोलता येणार नाही! पण तू हे का विचारतोयस? बंड्या : काल आई बाबांना म्हणत होती, "म्हातारा कधी एकदाचा राम म्हणतोय कुणास ठाऊक?" ------------------------------------------------------------------ कपड्यांच्या वेगवेगळ्या style साठी आपण किती पैसे खर्च करतो, पण आयुष्यातले सगळ्यात चांगले क्षण हे कपड्याविना घालवले जातात. - - ...- - - बालपणीचा काळ सुखाचा म्हणतात, ते यालाच.. तुम्हाला काय वाटल? -------------------------------------------------------------- सगळी रात्र मैत्रिणी बरोबर घालवल्यावर सकाळी उठून आळस देताना मंग्याला एक फोटो दिसला. मंग्या : हा तुझ्या नवरयाचा फोटो का? मैत्रिणी : नाही. ... मंग्या : जुन्या प्रियकराचा ? मैत्रिणी : नाही. मंग्या : भावाचा ? मैत्रिणी : नाही रे सोन्या. मंग्या : मग कोणाचा ? मैत्रिणी : माझाच, operation च्या आधीचा -------------------------------------------------------------- एकदा पेशवे महालात आले. त्यांना पाहून एक नोकर बाहेर आला, पेशवे : "बाई साहेबांना सांग...आम्ही आलो आहोत" नोकर : "बाई साहेब विसावा घेत आहेत" पेशवे : "मग बाई साहेबांना सांग...एकविसावा आला आहे" -------------------------------------------------------------- संता : बंते, ती मुलगी बघ, कसली आयटम आहे रे. बंता : अरे आयटमवरून आठवण झाली, वहिनीची तब्येत कशी आहे आता. --------------------------------------------------------------- बॉस : तुला १००० रुपये देईन. अट एवढीच, मी ते पैसे टेबलवर टाकीन, तू गोळा करायचेस. पैसे उचलून होईपर्यंत मी चुंबन घेत राहणार. जुली लगेच प्रियकराला फोन करते, तो म्हणतो ठीक आहे फक्त २००० रुपये माग आणि ते पटकन उचल. तासाभराने तो जुलीला फोन करतो, घेतलेस का पैसे? जुली : ह्या हलकट माणसाने २००० ची चिल्लर टाकली आहे टेबलवर. ------------------------------------------------------------------ एक मुलगी बागेतल्या बेंचवर बसली होती . तिथे एक भिकारी आला आणि हसून म्हणाला "डार्लिंग, काय करतेस ?" मुलगी भडकून म्हणाली, तुझी हिम्मत कशी झाली मला डार्लिंग बोलायची ? भिकारी : तू माझी डार्लिंग नाहीस मग माझ्या बेडवर काय करतेस ? ---------------------------------------------------------------------- पबमध्ये पक्क्याला एक मुलगी आवडली, तो तिच्याशी बोलायला गेला. पक्क्या : मी श्रीमंत वडिलांचा मुलगा आहे, वडील विधुर असल्याने त्यांच्या प्रश्चात सगळी संपत्ती मलाच मिळणार आहे. त्यामुळे व्यावहारिक दृष्टीने विचार करता, तुला लग्न करायला हरकत नसावी. मुलीने हसत निरोप दिला. पक्क्याला वाटलं काम झाल. एका आठवड्यानंतर पक्क्याला कळल ती... मुलगी त्याची सावत्र आई झाली होती. तात्पर्य : मुली नेहमी मुलांपेक्षा जास्त व्यवहारी असतात. ---------------------------------------------------------------------- लग्न झालेल्या मुली भांगेत कुंकू का लावतात? ? ? ? ? ... कारण पोरांना कळावं कि ज्या प्लॉटवर त्यांची नजर पडलीय, त्याच भूमिपूजन आधीच झालंय. ---------------------------------------------------- ८००० रुपये टेलिफोन बिल आल्यामुळे बबन वैतागला होता, मी माझ्या ऑफिसचा फोन वापरतो मग एवढं बिल कस? बायको : मी पण माझ्या ऑफिसचा फोन वापरते. मी कशाला घराचा फोन वापरू. ...मुलगा : मला तर ऑफिसने सेलफोन दिलाय. मी कशाला घराचा फोन वापरू. कामवाली : म्हणजे आपण सगळेच कामावरचे फोन वापरतो, मग एवढं बिल कस? ------------------------------------------------ दोन नन्स, चर्च च काम आटपून घरी जात असतात. एवढ्यात २ गुंड त्यांना जबरदस्तीने रस्त्याकडेच्या झाडाझुडपात घेऊन जातात. एक नन्स : अरे देवा, ह्याला माहित नाही, हा काय करतोय. ...दुसरी नन्स : माझ्या ह्याला माहित आहे. -------------------------------------------------------------------- एक श्रीमंत वकील गाडीने घरी चालला होता, एवढ्यात त्याला दिसलं कि रस्त्याचा बाजूला माणूस गवत खात आहेत. वकील : तु गवत का खात आहेस? माणूस : माझ्याकडे अन्न विकत घ्यायला पैसे नाही. वकील : एक काम कर, माझ्या घरी चल. माणूस : माझी बायकोपोर पण आहेत. ... वकील : त्यांनापण बरोबर घे. माणूस : साहेब, तुम्ही फार दयाळू आहात. आमच्यामुळे तुम्हाला उगाच भार. वकील :छे छे, माझ्या बंगल्यातल गवत तर २ फूट वाढलंय. --------------------------------------------------------------- दिघ्या बारमध्ये एक सुंदर मुलीशी बोलायला जातो. तो काही बोलणार एवढ्यात ती मुलगी मोठ्याने बोलते, 'पूर्ण रात्र तुझ्याबरोबर? शक्यच नाही.' सगळा बार दिघ्याकडे बघायला लागतो, दिघ्या गोंधळून जातो. थोड्या वेळाने ती मुलगी येते आणि म्हणते 'माफ कर मी मानसशास्त्राची विद्यार्थिनी आहे, आणि अशा क्षणी लोक कसा प्रतिसाद देतात ते मला पाहायच...ं होत. क्षणाचाही विलंब न लावता दिघ्या ओरडतो 'एका रात्रीचे ५००० रुपये? जमणार नाही.' --------------------------------- गुरुजी कृष्णजन्माची कथा सांगत होते. 'आकाशवाणी झाली आणि कंसाला कळल कि देवकीचा ८ वा पुत्र आपला वध करेल म्हणून कंस त्यांची एक एक तान्ही बाळ मारून टाकतो' इथवर कथा झाली होती. एवढ्यात दिपू : गुरुजी, मला एक प्रश्न पडलाय. गुरुजी : तुलाच बरा प्रश्न पडला, बर विचार. दिपू : गुरुजी, जर कंसाला माहित होत कि देवकीचा ८ वा पुत्र आपला वध... करणार आहे तर त्याने वसुदेव आणि देवकीला एकाच कारागृहात का ठेवलं? गुरुजी तिथेच आडवे झाले ---------------------------------- ऐश्वर्या राय ची वाढती लोकप्रियता बघून, भारत सरकारने तिचा postal stamp बनवला. ऐश्वर्यापण खुश आणि stamp चा खप वाढल्या मुळे भारत सरकार पण खुश. पण तक्रारी यायला लागल्या कि stamp नीट चिकटत नाहीये. सरकारने लगेच एक समिती नेमली. अर्ध्या तासात समितीने अहवाल दिला 'stamp च काम एकदम व्यवस्थित ...झालंय, पण लोक चुकीची बाजू चाटत आहेत.' ----------------------------------------------- दिघ्या ची बायको पोराला मारत होती, दिघ्या मध्ये पडला, आणि बायको ला थांबवलं. दिघ्या : काय झालं बाळा, काय तक्रार आहे? पोरगा : मला तुमच्या बायको बरोबर adjust करायला जड जातंय, मला माझी बायको आणून द्या. -------------------------------------------------------- बायको : अहो, मी तुमच्याशी भांडते तेव्हा तुम्ही प्रत्येक वेळी आपली मोरी का साफ करता? नवरा : त्यामूळे मला सूड उगवल्याच समाधान मिळत. ...बायको (मोठ्याने हसत) : मोरी साफ केल्याने समाधान? गम्मतच आहे. नवरा : होय समाधानच, कारण मोरी साफ करायला मी तुझा टूथब्रश वापरतो. ------------------------------------ एक बेवडा मध्यरात्री मित्राबरोबर घरी येतो, भिंतीवर एक घड्याळाच चित्र काढलं होत. मित्र : अरे तू हे घड्याळाच चित्र का काढलं आहेस ? ...बेवडा : अरे ते नुसत चित्र नाहीये, त्यातून आवाज येतो. बघ आता. बेवडा जमिनीवर पडलेला हातोडा घेतो आणि त्या चित्रावर जोरात मारतो. शेजारच्या घरातून आवाज येतो, ए बेवड्या पहाटेच ३ वाजलेत, झोप आता. बेवडा : बघ, तुला बोललो होतो ना. ------------------------------------------------------ गण्या नवीन नोकरीवर लागला होता. कामची पद्धत समजून घेतल्यावर त्याने चहा मागवण्यासाठी फोन लावला तो CEO च्या केबिनचा नंबर होता. CEO : यस, कोण बोलतंय. गण्या : Staff room मध्ये एक चहा पाठवा. ...CEO (भडकून) : मूर्ख तुला माहित आहे तू कोणाशी बोलतोय. मी ह्या कंपनी चा CEO आहे. गण्या हडबडला, त्याही स्थितीत स्वताला सावरत म्हणाला, तुम्हाला माहित आहे का मी कोण बोलतोय? CEO : नाही गण्या : वाचलो (गण्याने फोन आदळला). ------------------------------------------------------- जीवनातले काही चमत्कारिक नियम. जेव्हा तुमचे हात ग्रीसने बरबटलेले असतात तेव्हाच नेमकी नाकाला खाज येते. जेव्हा आपण चुकीचा नंबर डायल करतो, तेव्हा तो कधीच येत नाही. ज्या दिवशी आपण ऑफिसमध्ये पोहोचतो तेव्हा नेमका बॉस आपल्या आधीच आलेला ...असतो. आणि जेव्हा आपण वेळेवर पोहोचतो तेव्हा बॉस नेमका उशिरा येणार असतो. घाईमध्ये जेव्हा तिकीटाची रांग बदलो तेव्हा नेमकी आपण सोडलेली रांग पटापट सरकायला लागते. ---------------------------------------------------------- उत्कर्ष.....

वाचने 6700 वाचनखूण प्रतिक्रिया 4

योगी९०० 14/08/2010 - 12:25
फेसबुकच्या laibhari मधे हेच जोक वाचले होते..