Skip to main content

विचार

स्वप्न

लेखक विष्णु यांनी गुरुवार, 07/08/2008 00:46 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात, सगळेच अश्रु दाखवायचे नसतात, सगळ्याच नात्यांना नाव द्यायची नसतात,स्वप्न पुर्ण होत नाहीत म्हणुन स्वप्न पहाणं सोडुन द्यायची नसतात, तर ती मनाच्या एका कोपर्यात जपायची असतात.
Taxonomy upgrade extras

आंबट-गोड नाती

लेखक स्वाती फडणीस यांनी मंगळवार, 05/08/2008 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
आंबट-गोड नाती . चिंचेचा आकडा गं.. शेपटावाणी वाकडा गं.. चिंचेचा आकडा.. वाकडा गं.. पेरा-पेरात गाठी गं.. चिंचोक्या बाटी गं.. पेरा-पेरात गाठी.. बाटी गं.. आकड्याची गोडी गं.. पोरं यडी-खुळी गं.. आकड्याची गोडी.. खुळी गं.. जिभेला हुळहूळ गं.. खाताना कळ गं.. जिभेला हुळहूळ.. कळ गं.. चिंच आंबट-गोड गं.. भली-बुरी चव गं.. चिंच आंबट-गोड.. चवीला गं.. चिंचेचा आकडा.. वाकडा गं.. पेरा-पेरात गाठी.. बाटी गं.. चिंचजशी आंबट-गोड नाती गं.. ===================== स्वाती फडणीस............. ०५-०८-२००८

प्रत्येक व्यक्ति अमुल्य आहे.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 04/08/2008 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एका ऍनेस्थेसीऑलॉजीस्ट डॉक्टर मित्राला मी विचारलं "तू ही मेडिकल संज्ञा कां निवडलीस?" त्यावर तो म्हणाला, "त्याचं खरं उत्तर म्हणजे ही शाखा आणि त्यातलं काम हे मला आध्यात्माकडे जाण्याचा मार्ग दाखवतं हे आहे." मी त्याला हे ऐकून म्हणालो, "अरे,तू डॉक्टर असून ह्या गोष्टीवर विश्वास ठेवतोस?" हंसत,हंसत मला म्हणाला, "आध्यात्म" ह्या शब्दाला आपण निराळ्या अर्थाने बघू शकतो. श्वास,उश्वास,उत्तेजन,चैतन्य हे शब्दपण वैद्यकीय शास्त्रात येतात, जसे ते श्रद्धेतूनपण जन्म घेतात.आणि हे शब्द माझ्या आयुष्याची आणि माझ्या कामाची व्याख्या करण्यास कारणीभूत आहेत. माझं आध्यात्मी मन आणि माझं वैद्यकीय शिक्षण ह्या दोन्ही गोष्

एक क्षण निसटू गेला..

लेखक स्वाती फडणीस यांनी सोमवार, 04/08/2008 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
एक क्षण निसटू गेला.. . हिरव्यागार पानाच्या टोकाशी.. थांबून राहिलेला थेंब, पांढर्‍या शुभ्र स्पार्टेक्सवर.. साचलेल्या पसाभर पाण्यात, टप्पकन पडला... एक लाट उंच उसळली.. पाण्यात आणि मनात! एकाच वेळी!! क्लिक!!! अल्बम मध्ये लावण्याजोगी, अजून एक आठवण.. लगोलग आत गेले.. वाट बघत बसलेले रंग गोंजारले.. हळूच कुंचले मोकळे केले.. आणि गेले.. रंग ओले करण्यापुरतं पाणी आणायला.. तो थेंब तो क्षण!!! तेव्हड्यात वाहून गेला.. छ्या!!! जाऊदे! मूड नाही आज! म्हणताच कागद कोरा राहिला... एक क्षण निसटू गेला.. ====================== स्वाती फडणीस.............. २९-०७-२००८

नेहमीच ... तुझ्यामुळे

लेखक बेसनलाडू यांनी सोमवार, 04/08/2008 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
तिन्ही त्रिकाळ संध्याकाळ नेहमीच ... तुझ्यामुळे मेंदूतले घोळ पांजरपोळ नेहमीच ... तुझ्यामुळे ओठांत धूर डोळ्यांत पूर नेहमीच ... तुझ्यामुळे ओले घसे (होते हसे!) नेहमीच ... तुझ्यामुळे शब्दांचा जाच शब्दांना जाच नेहमीच ... तुझ्यामुळे ओळींना धार ओळींचे वार नेहमीच ... तुझ्यामुळे जगायचा वीट जगतोय धीट नेहमीच ... तुझ्यामुळे मरणाशी भेट कविताच थेट नेहमीच ... तुझ्यामुळे

स्वार्थ: काहि सैल/स्वैर विचार

लेखक ऋषिकेश यांनी रविवार, 03/08/2008 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
"अख्खा समाजच स्वार्थी झालाय.. " मी एकदम चमकून पाहिले. ट्रेनच्या डब्यात मागे बसलेल्या दोन व्यक्तींमध्ये हे संभाषण चालू होते.. अख्ख्या डब्याला ऐकू जाईल इतक्या मोठ्याने म्हणणारा अजूनही लेक्चर झोडतच होता "जरा भारतात बघ एकेक व्यक्तींनी सगळ्यांसाठी आयुष्य पणाला लावलं.. रामापासून ते बुद्ध, गांधी अश्या व्यक्तीच्या समाजात स्वार्थीपणा अजून टिकला हेच नवल... " मी यापुढचेही संभाषण ऐकत होतो.. पण आता कानावर शब्द पडत होते पण कळत नव्हते कारण डोक्यात अचानक विचार चमकला "खरंच आपण स्वार्थी आहोत का?.. मी स्वार्थी आहे का? स्वार्थी असावं का? " "स्वार्थी कोणाला म्हणावे? " मनाच्या एका कोपऱ्यातून प्रश्न..

शुभेच्छा!!

लेखक प्राजु यांनी शनिवार, 02/08/2008 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या सगळ्या मिपा कुटुंबातील मित्र आणि मैत्रीणींना मैत्रीदिनाच्या हार्दीक शुभेच्छा! आपली मैत्री अशीच वृद्धींगत होत राहो हीच ईशचरणी प्रार्थना!!! गंध अलौकिक याचा क्षणभंगूर जीवन जरी शुभ्र पाकळ्या कोमल नाजूक नाभी शेंदरी छंद समर्पाणाचा आगळा वेड्याने त्या जोपासताना मातीलाही गंध दिला फांदीवरूनी ओघळताना मैत्री व्हावी ऐसी जिवाला जीव देणारी जीवन ऐसे सार्थ व्हावे पारिजात फुला परी... - प्राजु

जोक दिसत नाही

लेखक raakesh यांनी शनिवार, 02/08/2008 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
मी पकाउ जोक्स मधे २दा टाकलेला जोक दिसत नाही आहे. पुन्हा एकदा टाकुन बघु का? काय प्रोब्लेम आहे? राकेश

मी कशी आहे ते मलाच सांगता येत नाही...

लेखक संकेता यांनी शुक्रवार, 01/08/2008 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
मी कशी आहे ते मलाच सांगता येत नाही... कधी मी वारयाची झुलूक असते तर कधी बेफाम वारा असते कधी मी पावसाची हलकी सर असते तर कधी समुद्रची लाट असते कधी मी डोलनारे कणिस असते तर कधी खम्बिर तरु असते कधी मी शांत नदी असते तर कधी भिरभिर्नारे फूलपाखरू असते मी तो सुर आहे जो मनाला दिलासा देतो, तर कधी हुरहुर लावतो बस आणि काय सांगू सगलच लिहिता येत नाही म्हनून म्हणते मी कशी आहे ते मलाच सांगता येत नाही...

मॅडम...

लेखक फटू यांनी शुक्रवार, 01/08/2008 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
दादर रत्नागिरी सवारी गाडी आपल्याच मस्तीत कोकण रेल्वेच्या सिंगल लाइनवर धावत होती... गाडी पनवेल स्थानकात शिरली. प्रवाशांचा एकच गलका सुरू झाला. गाडीतल्या प्रवाशांची उतरण्याची तर गाडी बाहेरच्या प्रवाशांची गाडीत चढण्यासाठी एकच धावपळ चालू झाली. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडत असल्यामुळे गाडीच्या दरवाजामध्ये जे काही रणकंदन चालू होतं त्याचं वर्णन शब्दांत करताच येणार नाही. एव्हधं मात्र नक्की की आमची ती कोकणी जनता एकमेकांच्या आया बहीणींना ठेवणीतल्या शब्दांत साद घालत गाडीत चढण्याचा किंवा गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करत होती...