Skip to main content

विचार

जीवन नुसतं जगु नका!! त्याचा "उत्सव्"साजरा करा!

लेखक येडा खवीस यांनी रविवार, 07/09/2008 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
Life Should not only be lived, It should be celebrated!!! मध्यंतरी नेटवर सर्फ़ करताना अचानकपणे "ओशो"चं हे एक छान सुभाषित दिसलं! किती सुंदर आणि स्पष्टपणे या गुंतागुंतीच्या जीवनाचे "आधारभुत" तत्व त्यांनी नीटसपणे मांडलय ना? आजवरच्या सगळ्या so called established संतांनी आपल्याला जीवनाकडे बघण्याचा "गंभीर" दृष्टीकोन दिला पण, ओशो जीवनाला एक "उत्सव" म्हणुन बघतात. या एकाच वाक्याला अनेक कंगोरे आहेत, हिर्यासारखे अनेक पैलु आहेत आणि कॅलिडोस्कोप सारख्या अनेक सापेक्ष प्रतिमा आहेत.

ओंडका

लेखक स्वाती फडणीस यांनी बुधवार, 03/09/2008 05:07 या दिवशी प्रकाशित केले.
ओंडका =================== बुडवू पाहती कितीक लाटा.. "मी" तरी हा, बुडतं नाही!.. नाका-तोंडात पाणीच पाणी.. "मी" तरी हा, मरत नाही!.. पोहता पोहता थकली गात्रे.. "मी" तरी हा, गळत नाही!.. बनून हेंदकळे नाव सागरी.. बोट कुणाची बनत नाही!.. धरून राहतो हाती ओंडका.. "मी" तरी हा, तारत नाही..!!! =================== स्वाती फडणीस....... ०३-०९-२००८
Taxonomy upgrade extras

प्रेमे नादली पंढरी..!

लेखक राघव यांनी सोमवार, 01/09/2008 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
आषाढी एकादशीला ही कविता लिहिलेली. लिहिल्या गेल्यावर माझा मलाच खूप आनंद झाला होता. :) मेघ आषाढाचा गर्जे, गाज गूंजे चराचरी, प्रेमे नादली पंढरी उभा बघून श्रीहरी!
मी बालक अजाण मन सोडीना पदर! माझी बालकाची मती त्यास कोठला आधार?
दिंडी चालली माहेरा, वाट ओली अंतरीची! उभी लेकराच्यासाठी माय सावळी कधीची!!
अश्रू वाहती सहज, भाव कोवळा सांभाळा! मायभेट उराउरी आज आनंद सोहळा!!
मुमुक्षू [टीपः अगोदरही याच नावने जालावर प्रसिद्ध केलेली आहे. किंचित बदल करून येथे प्रकाशित करतो आहे. येथेही आवडेल अशी आशा करतो.]

चांगल्या बातम्याही वाईट बातम्या सारख्या प्रसारित होऊ शकतात.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 29/08/2008 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी एकदा मी कंपनीच्या कामाकरिता राजकोट मधे गेलो होतो.कामाच्या जरूरीमुळे मला काही दिवस तिकडे मुक्काम करायची जरूरी भासली होती.संध्याकाळी काम आटोपून झाल्यावर बाहेर कुठल्यातरी चांगल्या रेस्टॉरंट मधे जेवायला जाताना चालत जायला मी जास्त पसंत करायचो.आणि रस्त्यावर एव्हडा ट्रॅफिक असायचा की छोटे छोटे मॉपेड चालवणारे नेहमी एकमेकाला आपटायचे,घासायचे,पडायचे.म्हणजे अगदी छोटासा अपघात व्हायचा.पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी की कुणाचीही बाचाबाची होत नसे.एक्मेकाला सॉरी म्हणून निघून जायचे.कधी कधी सॉरी हा शब्द मोठ्याने ऐकायला यायचा तर कधी कधी ओठांच्या हालचाली वरून सॉरी म्हटल्याचं भासायचं.हे त्यांच फ्रेंडली वागण

राष्ट्राय स्वाहा: इदं न मम!!!!

लेखक सौरभ वैशंपायन यांनी बुधवार, 27/08/2008 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात अनेक अश्या व्यक्ती झाल्या कि ज्यांचे कर्तृत्व असामान्य आहे. त्या ज्या क्षेत्रात काम केले ते मैलाचा दगड ठरले. आजही त्या हजारो व्यक्तींना १०० करोड व्यक्ती आदर्श मानत आहेत आणि राहतील. थोडक्यात भारतभूचे सुपूत्र या सदरात ते येतात. मात्र भारतभूचे सुपूत्र होणे इतके सोपे आहे का? प्रचंड उलथापालथी नंतर भारताच्या सुपूत्रांपैकी ४ जण माझ्या डोळ्यांसमोर रात्रं-दिवस येत आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या आधी आणि त्यांच्या नंतर भारतात किंवा भारता बाहेर हजारो आदरणीय व्यक्ती झाल्या वा होतील पण या चौघांचे स्थान एकमेवाद्वितीय आहे. या चौघांचाहि कालखंड भिन्न आहे.

मसाज ... एकपात्री शब्दखेळ

लेखक भडकमकर मास्तर यांनी बुधवार, 27/08/2008 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
मसाज ...विजय तेंडुलकरांचं हे नाटक.. रूढार्थानं हे नाटक नाही, किंवा एकपात्री प्रयोग म्हणावं तर तसाही नाही हा... ( याला एकपात्री शब्दखेळ असे नाव दिले आहे) हे नाटक पहायचा योग नाही आला, पण पुस्तक सापडलं म्हणून घेऊन आलो.... ज्या माणसाची ही कैफ़ियत तेंडुलकर मांडतात तो त्यांना खरंच भेटला होता आणि त्याचं आयुष्य पाहून त्यांना हे लिहावेसे वाटले....

भयमुक्त -बंधानुरक्त (एक छोटीशी गोष्ट)

लेखक मन यांनी बुधवार, 27/08/2008 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
तो उठला,पंख झटकले,आपलं घरटं आणि त्या सभोवतालची ती दाट जंगलातली तुटकी-पडकी विहिर बघत बघत ,थोडासा आळस देत तो बाहेर पडला. सकाळी सकाळी सुंदर सोनेरी कोवळ्या उन्हाची तिरिप अंगावर घेत प्रसन्नतेने तो उडु लागला. स्वतःच्या लाल चुटुक ओठ, हिरवे गार पंख्,दिमाखदार तोरा आणि एकुणच समग्र सृष्टीत नावाजलं जाणारं रुपडं घेउन, आपल्याच आनंदात स्वच्छंदात गाणी गुणगुणत तो जंगलातुन आला बाहेर आणि समोरच्या शेतावर झेपावु लागला. त्याला मोठीच मौज वाटत होती. इतक्या उंचावरुन माणसही मुंगीइतकी छोटिशी दिसत होती.त्या शेकडो माणसांना गिळुन एकदम उंच भरारी घेणार्‍या त्या पांढर्‍या पक्ष्याइतकीच उंची आज ह्यानही गाठली होती.

फाळणी

लेखक सौरभ वैशंपायन यांनी सोमवार, 25/08/2008 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
११ जुलै रोजी मुंबईत रेल्वेमध्ये जे स्फोट होऊन २०० पेक्षा जास्त माणसं मारली गेली होती त्या नंतर दोन दिवसांनी मला ही कविता सुचली आहे. शक्य तितकं वास्तव मांडण्याचा प्रयत्न केलाय. दुर्दैवाने गेल्या २०-२५ दिवसांत अश्या घटाना घडात आहेत कि सुभाषबाबुंचे ३रे कडवे आपण खरच खुप सिरीअसली घ्यायला हवे. ----------------------------------------------- परवाच एका स्फोटात मेलो, पहिल्याच झटक्यात स्वर्गात गेलो, स्वर्गात जाण्याचा एकच कायदा होता, सरळ जगण्याचा हाच एक फायदा होता.

प्रश्नांत खरोखर जग जगते

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 25/08/2008 08:27 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा अघटीत घडले. देवाच्या असंख्य न उमगणार्‍या लीलांपैकी एक लीला. माणसांना प्रश्न पडायचेच थांबले. कोणी कुणाला काहीच विचारेना. आपणा स्वतःला नाही. आई वडिल मुलांना नाही. मुले शिक्षकंना नाही. मालक नोकराला नाही. जनता राजकारण्याला नाही. कोणाच्या मनांत काहीच प्रश्न उरले नाहीत. मग विचारणार काय? सगळे कसे स्वच्छ माहीत आहे. प्रत्येक जण माहीत असलेल्या ज्ञानाच्या आधारे काम करू लागला. नवीन आलेला कोणी, प्रश्न विचारत न बसता, इतरांचे पाहून तसेच करू लागला. नवीन जन्माला आलेल्या बाळासारखा. जर अनुकरण करून, किंवा पाहणी करून काय करायचे ते कळले नाही, तर फारच सोपे. काहीच करायचे नाही.

आई..! तुझी, आ..ठ..व..ण येते...!

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 24/08/2008 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
आई ह्या एका शब्दाचे किती म्हणून अर्थ काढावे बरं.आईला किती नावांनी ओळखलं जावं. मॉं (ऊली) याने आई म्हणजे सबकुछ माऊली! "आई, आई .... (मै आई,बेटा मै आई)" म्हणजेच, "अगं मी येते!, अरे मी येते! " असं जी आपल्या मुलांना ओरडून सतत म्हणत असते ती "आई" तिच माऊली, तिच मॉं, तिच माय, म्हणजेच "my"- माय- माझी, MOM म्हणजेच My Own Mother तिच शब्दशः आई. नुसता "आई" हा शब्द्च पहाना, पहिलं अक्षर, "आ" म्हणजे आकाशा एव्हडी प्रचंड मन असलेली. दुसरं अक्षर "ई" म्हणजेच जी ईश्वरा एव्हडी देवतुल्य.