स्वार्थ: काहि सैल/स्वैर विचार
"अख्खा समाजच स्वार्थी झालाय.. " मी एकदम चमकून पाहिले. ट्रेनच्या डब्यात मागे बसलेल्या दोन व्यक्तींमध्ये हे संभाषण चालू होते.. अख्ख्या डब्याला ऐकू जाईल इतक्या मोठ्याने म्हणणारा अजूनही लेक्चर झोडतच होता "जरा भारतात बघ एकेक व्यक्तींनी सगळ्यांसाठी आयुष्य पणाला लावलं.. रामापासून ते बुद्ध, गांधी अश्या व्यक्तीच्या समाजात स्वार्थीपणा अजून टिकला हेच नवल... "
मी यापुढचेही संभाषण ऐकत होतो.. पण आता कानावर शब्द पडत होते पण कळत नव्हते कारण डोक्यात अचानक विचार चमकला "खरंच आपण स्वार्थी आहोत का?.. मी स्वार्थी आहे का? स्वार्थी असावं का? "
"स्वार्थी कोणाला म्हणावे? " मनाच्या एका कोपऱ्यातून प्रश्न.. स्वतःच स्वत:ला विचारलेला..........
"जो केवळ स्वतःसाठीच जगतो.. स्वतःला हवे तसेच जगतो.. स्वतःला हवे तेच करतो आणि तसेच वागतो तो स्वार्थी! " मनातील दुसऱ्या कोपऱ्यातून आलेले उत्तर....
"हं..... "काही क्षण मन शांत पण दुसऱ्या मनाचे समाधान नाहीच.. पुन्हा प्रतिप्रश्न.. "...... म्हणजे मग स्वतःच्या बायकोच्या, आईच्या, भावाच्या, नववधूच्या मानसिकतेची पर्वा न करता केवळ स्वतःला योग्य वाटते म्हणून तसे वागणारा स्वार्थीच नाही का? "
" तर काय बेलाशक! जी आपल्या भरवशावर नव्या घरात येते, अश्या आपल्या बायकोच्या भावनांची पर्वा न करता स्वतःला हवे ते करणारा स्वार्थी नाहीतर काय? स्वार्थीच तो"
"हं मग राम, बुद्ध, गांधीजी हे ही स्वार्थीच नाही का? नववधूच्या भावनांची यत्किंचित पर्वा न करता लग्नमंडपातून सुखाच्या शोधासाठी पळणारा बुद्धच घे.. कारण काय तर त्याला स्वतःला अंतिम सत्याचा शोध घ्यायचा होता.. बाकी घरच्यांचे काहीही होवो.. मला वाटले मी ते करणार असा म्हणणारा बुद्ध स्वार्थीच नाही का? रामही मग स्वार्थी का नाही? संपूर्ण आयुष्यभर स्वतःच्या मर्जीने चालणारा, केवळ स्वतःच्या प्रतिमेखातर आपल्याला उभ्या वनवासात साथ देणाऱ्या सीतेला पुन्हा महालाबाहेर काढणारा राम स्वार्थीच ना? आपल्या पत्नीच्या भावनांची/गरजांची जाणीव असूनही जराही पर्वा न करता स्वतःला हवे तसे वागणाऱ्या गांधीजींनाही स्वार्थी का म्हणू नये? "
"हं.. माझ्यामते समाजात जे जे चुकीचे वाटले ते ते बदलण्यासाठी 'वैयक्तिक' स्वार्थ बाजूला सारला म्हणून तर ह्या व्यक्ती थोर नाही का? "
"समाजाचे बाबा "हे हे" चुकते हे त्यांनी कसे ठरवले? "
"ते त्यांना तसे वाटले"
"म्हणजे पुन्हा फक्त केवळ स्वतःला वाटते म्हणून समाजाला बदलायला निघाले.. समाजाप्रमाणे स्वतः बदलायचे सोडून केवळ स्वतःच्या हट्टाखातर /आग्रहाखातर त्यांना हवे तसे वागले. गंमत म्हणजे समाजासाठीच काम करताना जवळच्या व्यक्तीची, नातेवाईकांची सोडाच तर त्याच समाजाचीही पर्वा त्यांनी केली नाही. "
"असं म्हणता येईल का? की ज्या विचारांमुळे/कृतींमुळे त्यांच्याशी निगडित समाजाचे भले होईल असा विश्वास त्यांना वाटला. आणि अश्यांवेळी त्यांनी स्वतःवरच्या विश्वासामुळे कोणाचीही पर्वा केली नाही... म्हणून तर ते प्रसिद्ध झाले. इतिहासात बघशील तर अनेक व्यक्ती झाल्या पण त्यात प्रसिद्ध त्याच झाल्या ज्यांनी 'असा' स्वार्थ जोपासला. यापैकी जे जिंकले, विजयी झाले ते समाजसुधारक झाले तर जे हरले ते व्हिलन म्हणून गाजले. आर्य समाजाचे हित ज्यूंचा नायनाट करणाऱ्यामुळेच होईल हे हिटलरला वाटले व त्याने असे केवळ स्वतःला वाटते म्हणून तसे केले. जर ज्यू नामशेष होऊन हिटलरचा विजय झाला असता तर इतिहासात त्याची हेटाळणी झाली असती का? चंगेझ खान जर शेवटापर्यंत अजेय राहिला असता तर केवळ "अल्फा मेल" इतकीच ओळख राहिली असती का? "
"हं म्हणजे प्रसिद्ध होण्यासाठी, काहीतरी करून दाखवण्यासाठी स्वतःवर दुर्दम्य विश्वास हवा. मग त्या विश्वासाला कोणी स्वार्थ म्हणाल तरी बेहत्तर.. मला हे पटलं आहे की यामुळे समाजाचं भलं होईल आणि म्हणून मी ते करीनच असा ऍटिट्युड हवा. आपलं बघ ना आपण सतत दुसऱ्यासाठी जगतो.. घरी आईला काय वाटेल, शेजाऱ्यांना त्रास होईल का?, जाऊ दे मित्र म्हणाला तर त्याचं मन कसं मोडायचं, बापानं कधी नव्हे ते काही सांगितलं आणि ऐकायचं नाही म्हणजे.. असं करतच आयुष्य जातं.. केवळ स्वतःला वाटतं म्हणून, स्वत:ला आवडेल तसाच एकही दिवस आपण घालवत नाही.. "केवळ इच्छा झाली म्हणून" असे कितीसे वागतो??? "
"शेवटी केवळ स्वतःच्या मर्जीने आयुष्य जगणारे आणि दुसर्याला जागायला लावणारे कोण? तर थोर परमार्थी आणि ससत दुसर्याचा विचार करत स्वतःचे असे काहि क्षण शोधावा लागणारा मी कोण तर स्वार्थी!!!! "
वाचने
8516
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
चिंतन
In reply to चिंतन by प्रियाली
सुरेख!
In reply to चिंतन by प्रियाली
कोलाज
In reply to कोलाज by ऋषिकेश
मस्त
In reply to मस्त by ३_१४ विक्षिप्त अदिती
संदर्भ
In reply to संदर्भ by प्रकाश घाटपांडे
श्रेष्ठ गंगाधर स्वामींनी दिले होते लाऊन.
In reply to चिंतन by प्रियाली
+१
In reply to चिंतन by प्रियाली
चालना
In reply to चालना by चित्रा
असेच
In reply to चिंतन by प्रियाली
+१
मस्त
स्सही रे !!!
In reply to स्सही रे !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
जियो
धन्यवाद
सुंदर..
स्वतःचा राहिला नाही
In reply to स्वतःचा राहिला नाही by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
सर्किटराव,
In reply to सर्किटराव, by चतुरंग
पुरावा काय ?
In reply to पुरावा काय ? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
ह्या लोकांचे टिकून राहिलेले
In reply to ह्या लोकांचे टिकून राहिलेले by चतुरंग
एकच चाल
(विषय दिलेला नाही)
आभार
In reply to आभार by ऋषिकेश
कोन रे त्यो ?
लेखन आणि