Skip to main content

विचार

नाहि चिरा...नाहि पणती....

लेखक सौरभ वैशंपायन यांनी शनिवार, 23/08/2008 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
सैनिक स्वत: स्वतंत्र विचार करत नाहि. त्याने तो करावा अशी अपेक्षाहि नसते. तो शिस्त पाळतो, सज्ज राहतो. काहि ठराविक शब्दांचा उच्चार झाला कि तो यंत्रवत काम करतो. पण त्याचे मन सुद्धा यंत्राप्रमाणेच निर्विकार असेल का? नक्किच नाहि! युद्धाच्यावेळी त्याचा विचारांवर ताबा नसतो, शत्रुला मारायचे या एकाच विचाराने तो पिसाट झाला असतो. पण शीतयुद्धासारख्या परीस्थितीत वर्षानुवर्षे सतत दक्ष अवस्थेत त्याला ’तिष्ठत’ रहावे लागते. कधी आसामच्या किर्र जंगलात, कधी चटके लावणार्‍या थर किंवा कच्छच्या वाळवंटात आणि कधी-कधी सियाचीनसारख्या जगातल्या सर्वात उंच रणभूमीवर हाडं गोठवणार्‍या बर्फाळ थंडीत, तो सज्ज असतो.

आठवण........

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 20/08/2008 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
..आठवण माझी कधीतरी येईलच तुला तु कदाचीत रडशीलही हात तुझे जुळवुन ठेव तु सगळी आसवं तुझी त्यात सामावतील जो थांबला तुझ्या हातावर नीट बघ त्याच्याकडे एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल माझ्या आठवणी एखदयाला सांगताना तु कदाचीत हसशीलही जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता नीट वापर त्याला अडखळलेला तो शब्द मीच असेल कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला त्याच्या तेजाला तु निखरत राहशील मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल कधी जर सुटला बेधुंद गार वारा मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील मध्येच स्पर्शली तुला जर उबदार प्रेमळ झुळुक नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल........
Taxonomy upgrade extras

पण............

लेखक नम्रता वर्तक यांनी बुधवार, 20/08/2008 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
काहीतरी लिहावस वाटत पण........ शब्द सुचत नाही......... काहीतरी बोलावस वाटत पण........ जिभ वळत नाही......... थोड रडावस वाटत पण........ अश्रु येत नाही........... सुखदुखः वाटाविशी वाटतात पण........ चागली साथ मिळत नाही...........
Taxonomy upgrade extras

लवचिक

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 20/08/2008 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
५० वर्शे झाली मराठी भाशेच्या प्रेमामध्ये पडुन. तसुभरही कमी झालेले नाही. रोजच्या कामामध्ये इंग्रजीचा जास्त वापर असतो. मला आवडो वा न आवडो. पालकांची आवड. काय करणार? किती लवचीक. किति सर्वसमावेशक. किती अर्थपुर्ण. अर्थामध्ये अर्थ. त्या अर्थामध्ये आणखीन एक अर्थ. इंग्रजीला जोडा आणखीन एक अर्थ.

इनोदी आणि कारुण्यपूर्ण

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 20/08/2008 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
बिहार सरकार चे नवे धोरण पौष्टीक अन्न उंदीर खा. उपासमारी टाळा. सकाळ मधील ही बातमी वाचा http://esakal.com/esakal/08202008/Sampadakiya83E73329AB.htm बिहारचे आदिवासी कल्याणमंत्री जितन राम मांझी यांनी राज्यातील जनतेला उंदीर खाण्याचे आवाहन केले आहे बिहारी जनतेला सरकारमधील मंत्र्याने अशा प्रकारचे आवाहन करावे हे प्रशासनाचा कारभार किती बेअकलीपणे चालविला जात आहे हे दिसुन येते. देशात लोक पुरेसे अन्नधान्य मिळत नसल्याने अर्धपोटी, उपाशी राहत आहेत.

हू एम आय!

लेखक प्राजु यांनी बुधवार, 20/08/2008 02:52 या दिवशी प्रकाशित केले.
"चांगला धुतला त्या शोएब ला धोनी ने" असे उद्गार बर्‍याच वेळेला ऐकायला वाचायला मिळतात. इथे हे उद्गार एक भारतीय एका पकिस्तानी बद्दल बोलत असतो. कित्येक वेळेला सहज गप्पांमधून जेव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय सिमा प्रश्न येतो तेव्हा तेव्हा पाकिस्तान बद्दल वाईटच बोललं जातं. पाकिस्तानातून होणारि घुसखोरी, मुशरर्फ सरकारचा ओसामाबीन लादेन ला असणारा पाठींबा, दाऊद इब्राहिम ला पाकिस्तानात राहण्यासाठी आश्रय देण्याच्या बातम्या यांनी भारतीय मनात पाकिस्ताना बद्दल एक अढी निर्माण झाली आहे. भारतीय सामान्य जनता ही पाक सामान्य जनतेचा विलक्षण तिरस्कार करते.

आज १५ ऑगस्ट ना..!

लेखक उपटसुंभ यांनी सोमवार, 18/08/2008 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
आज १५ ऑगस्ट ना मित्रा. आनंदाने भरून आलाय ऊर. पण घरीच सुट्टी एन्जॉय करूया झेंडावंदनाचं ठिकाण आहे दूर.. आज १५ ऑगस्ट ना मित्रा, सांग भारतात स्टेट्स आहेत किती ? असतील पंचवीस तीस. आपल्याला स्टेट्स म्हणजे यु.एस. एवढंच माहिती..! आज १५ ऑगस्ट ना मित्रा, सांग वंदे मातरम कुणी बरं लिहिलंय ? कुणी लिहिलंय ते ठाऊक नाही पण ए. आर.
Taxonomy upgrade extras

तांडव..

लेखक प्राजु यांनी शनिवार, 16/08/2008 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
दिव्य तांडव सुरू जाहले करूनी ललकार नित्य होती वार जैसे घुमे तलवार.. वीज नभी ची लखलख करिते ढगांवरी वार कडाडकडकड अभ्र कोसळे सोसूनी प्रहार जलौघ बरसे वायूसंगे होऊनी बेजार कडकड गडगड मेघ नादती करूनी चित्कार 'जलद' चालला बरसत धारा टाकीत फुत्कार कसा जाहला हिरवाईचा त्यासी साक्षात्कार युद्ध होते ग्रिष्माशी, तो होता ऐसा स्वार जाती धावूनी हाक देण्या, अवनीची पुकार रिक्त जाहले मेघ सारे गाऊनी मल्हार मृदगंधाने भारली सृष्टी देऊनी हुंकार जिंकले ते युद्ध ऐसे झाला जयजयकार मंतरलेल्या सृष्टीमधूनी घुमला ओंकार.. - प्राजु

स्वातंत्र्य तर मिळाले, पण...??

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 15/08/2008 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्य तर मिळाले इंग्रज तर पळाले, पण... दहशतवाद जन्मला ...तो येथेच आहे. भ्रष्टाचार जन्मला ... तो येथेच आहे. स्वातंत्र्य तर मिळाले, स्वराज्य तर मिळाले, पण... महागाई वाढली .. ती जात नाही बेरोजगारी वाढली ..ती जात नाही स्वातंत्र्य तर मिळाले, लोकशाही तर मिळाली, पण... लोकसंख्या वाढली ... ती वाढतेच आहे बेईमानी वाढली .. ती वाढतेच आहे. स्वातंत्र्य तर मिळाले इंग्रज तर पळाले, पण... इंग्रजी येथेच आहे ... ती जाणार नाही गरीबी येथेच आहे ...ती जाणार नाही
Taxonomy upgrade extras